Tuesday, September 14, 2021

अंगावर येणारे ग्राहक कसे हाताळावेत?

 अंगावर येणारे ग्राहक कसे हाताळावेत?


भारत पाकिस्तानचा सामना म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामाच. मग तो सामना वर्ल्डकप मधला असो, की इतर कुठलाही असो. कसोटी सामना असो की एकदिवसीय सामना असो. प्रचंड प्रतिसादात हे सामने होतात. असाच एक कसोटी सामना भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला जात होता. जगातले सर्वात नावाजलेले जलदगती गोलंदाज देणारा संघ म्हणजे पाकिस्तान. सगळ्यात बलाढ्य वाटणारी फलंदाजी करणारे फलंदाज भारताकडे असत. त्यामुळे केवळ राजकीय शत्रू म्हणूनच नाही तर खेळाच्या गुणवत्तेवर देखील भारत पाकिस्तानचे सामने अटीतटीचे होत असत.


त्या दिवशी भारताची फलंदाजी सुरू झाली. सचिन, सेहवाग व गांगुली सारखे दिग्गज फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांना जोश चढला होता. शोएब अख्तर तर फार जोरात बाऊंस चेंडू फेकायला लागला होता. आलेल्या प्रत्येक चेंडूवर हल्ला चढवून तो चेंडू सीमापार पाठवण्यासाठी सदैव सज्ज असलेला सेहवाग बाद झाला होता. तंत्रशुध्द फलंदाजी करत केवळ बॅटच्या कोनात बदल करून नजाकतीने व अगदी सहजपणे फटके मारत सहजपणे चौकार मिळवणारा सचिन सुध्दा बाद झाला होता. चेंडू बॅटवर यायच्या आधी टप्पा पडला तर पडला. मात्र चेंडू बॅटला लागल्यावर त्याला टप्पा पडायचा अवसर न देता थेट स्टेडियमच्या पत्र्यावर पाठवणारा गांगुली सुध्दा बाद झाला होता. भारताची अवस्था अतिशय केविलवाणी झाली होती.


धडाधड धावा काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणारे तितकेच शांत व संयमी असणारे द्रविड आणि लक्ष्मण ज्यावेळी खेळपट्टीवर नांगर टाकून उभा असतात, तेव्हा खरी बघण्यासारखी अवस्था असते. हे दोघेजण फार धावाही काढत नाहीत. लवकर बादसुध्दा होत नाहीत. असा अनुभव त्या काळातल्या प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाला होता. शोएब अख्तर सगळे चेंडू १४० ते १५० पेक्षा जास्त गतीने टाकायचा. त्याला वाटले होते की, हे दोघे बाद झाले की सामना आपल्या बाजूने झुकणार आहे. तो दात ओठ खात जोरदार पळत येऊन बाऊन्सर टाकायचा. द्रविड तेवढ्याच सन्मानाने बॅट बाजूला काढून यष्टीरक्षक कामरान अकमलकडे चेंडू जाऊ द्यायचा.


स्टंपवर येणारा चेंडू तेवढा बॅट घालून तटवायचा. उरलेले चेंडू फक्त सोडून द्यायचे. कसलाही बाऊन्सर टाकला तरी त्याचा कोणताही परिणाम द्रविडने स्वतःवर होऊ दिला नव्हता. खेळ फक्त बॉलर व विकेटकीपरमध्येच चालला होता. शोएब अख्तरच्या रागाचा पारा उन्हाच्या पाऱ्याबरोबर वाढायला लागला. कामरान अकमल आडवा तिडवा पडून चेंडू अडवताना अक्षरशः वैतागून गेला. तो दिवस खेळून काढल्यावर मैदानाबाहेर निघताना शोएब अख्तरची अवस्था पाहण्यासारखी झाली होती. द्रविडने अतिशय खिलाडूवृत्तीने कोणताही प्रतिकार न करता अख्तरला चांगलाच धडा शिकवला होता. कुणीतरी येऊन सुरूंग पुरावेत. दूर जाऊन सुरूंगाला बत्ती देण्याच्या आधीच एखाद्याने अगदी सहजपणे त्या सुरूंगाच्या वायरा मोकळ्या करून जाव्यात. त्यावेळी सुरूंगाचा आवाज होणार या अपेक्षेने कान लावणाराची जी फजिती होते. तीच फजिती राहुल द्रविडने शोएब अख्तरची करून सोडली होती. कामरान अकमलचा यात फुकट बळी गेला होता.


व्यवसाय करताना विनाकारण नडणारे ग्राहक, आपली काहीही चूक नसताना विनाकारण तक्रार करणारे ग्राहक, तसेच कायम असंतुष्ट असणारे ग्राहक जेव्हा आपल्यावर राग काढायला येतात. तेव्हा राहुल द्रविड नीती वापरायला पाहिजे. शिव्या देणाऱ्या माणसाला प्रत्युत्तरात शिव्यांची अपेक्षा असते. मारायला आलेल्या माणसाला प्रत्युत्तरात थोडा तरी मार अपेक्षित असतो. रागाच्या प्रत्युत्तरात राग, प्रेमाच्या प्रत्युत्तरात प्रेम अपेक्षित असते. बहुतेक वेळा सकारात्मक गोष्टींच्या मोबदल्यात नकारात्मक प्रतिसाद व नकारात्मक गोष्टींच्या बदल्यातसुद्धा नकारात्मक प्रतिसाद मिळतो. मात्र नकारात्मक गोष्टींच्या मोबदल्यात सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची किंवा तटस्थ प्रतिसाद मिळण्याची शक्यता दुर्मिळ असते.


उत्पादनांमध्ये व सेवांमध्ये काही दोष अथवा त्रुटी राहिल्यास आपण मान्य करायला पाहिजेतच. मात्र ग्राहक जर अवाजवी नखरे करायला लागला, तर त्याला असा उलट प्रतिसाद देऊन थंड करता आला पाहिजे. तो काहीही बोलला तरी त्याला नकारात्मक प्रतिसाद देऊ नका.


११ वेळा निवडून येऊन ५५ वर्षे आमदार राहिलेले सांगोल्याचे गणपतराव देशमुख यांच्याबद्दल अनेक लोक सांगतात की, “एखादा माणूस गणपतरावच्या ऑफिसात जाताना मारण्यासाठी तलवार घेऊन जरी गेला असला, तरी परत येताना आमदारसाहेबांची तारीफ करत व हसतच बाहेर येतो.” प्रत्येक उद्योजकाचा स्वभाव असा असला पाहिजे. नाही म्हणताना सुध्दा एवढ्या सौजन्याने नाही म्हणा की, समोरच्या व्यक्तीला त्याबद्दल तुमचा आदर वाटला पाहिजे.


पाठीचा कणा ताठ ठेऊनही प्रत्येकाला मान देता येतो. आयुष्यात सगळ्याच गोष्टी साध्य होत नाहीत. सगळेच ग्राहक खुश असणारी कंपनी सापडणार नाही. सगळेच पुरवठादार आपल्या म्हणण्यानुसार काम करतीलच असे नाही. एखाद्या गाडीच्या मागे लागलेल्या कुत्र्याला त्या गाडीवानाला पकडण्याचा प्रयत्न करायचा असतो. मात्र त्या गाडीचा अचानक ब्रेक लावला गेला तर काय करायचे? याचा विचार कुत्र्याने केला नसल्यामुळे ते माघारी निघून जाते. ग्राहक ज्यावेळी संतापाने येतो तेव्हा त्याला प्रतिहल्ला अपेक्षित असतो. त्याचे पूर्ण म्हणणे सांगून झाल्याशिवाय आपण तोंड न उघडता शांतपणे ऐकून घेतले तर आपण अर्धी लढाई तिथेच जिंकलेलो असतो. धन्यवाद.


✍️– अमोल चंद्रकांत कदम


🎯 व्यवसाय साक्षर व्हा....


🎯 उद्योजक बना.....


🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

देश आणि देशांची चलने

 देश आणि देशांची चलने








जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.


अफगाणिस्तान - अफगाणी


आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड


ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर


र्जॉडन - दिनार


ऑस्ट्रिया - शिलींग


इटली - लिरा


बोटसवाना - रॅंड


कुवेत - दिनार


बंगलादेश - टका


जपान - येन


बेल्जियम - फ्रॅंक


केनिया - शिलींग


बुरुंडी - फ्रॅंक


लिबिया - दिनार


ब्रिटन - पौंड


लेबनॉन - पौंड


बर्मा - कॅट


नेदरलॅंड - गिल्डर


क्युबा - पेसो


मेक्सिको - पेसो


कॅनडा - डॉलर


नेपाळ - रुपया


सायप्रस - पौंड


पाकिस्तान - रुपया


चीन -  युआन


न्यूझीलंड - डॉलर


झेकोस्लाव्हिया - क्रोन


पेरु - सोल


डेन्मार्क - क्लोनर


नायजेरिया - पौंड


फिनलॅंड - मार्क


फिलिपाईन्स - पेसो


इथोपिया - बीर


नॉर्वे - क्लोनर


फ्रान्स - फ्रॅंक


पोलंड - ज्लोटी


घाना - न्युकेडी


पनामा - बल्बोआ


जर्मनी - मार्क


पोर्तुगाल - एस्कुडो


गियान - डॉलर


रुमानिया - लेवू


ग्रीस - ड्रॅक्मा


सॅल्वेडॉर - कॉलन


होंडुरा - लेंपिरा


सौदी अरेबिया - रियाल


भारत - रुपया


सोमालिया - शिलींग


युगोस्लाव्हिया - दिनार


सिंगापुर - डॉलर


आइसलॅंड - क्रोन


स्पेन - पेसेटा


इराक - दिनार


साउथ आफ्रिका - रॅंड


इंडोनेशिया - रुपिया


श्रीलंका - रुपया


इस्त्रायल - शेकेल


सुदान - पौंड


इराण - दिनार


स्वित्झर्लंड - फ्रॅंक


जमैका - डॉलर


स्वीडन - क्रोन


सिरिया - पौंड


टांझानिया - शिलींग


थायलंड - बाहत


टुनीशीया - दिनार


युगांडा - शिलींग


यु.के. - पौंड





त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर


टर्की - लिरा


रशिया - रूबल


अमेरीका - डॉलर





युनायटेड - अरब प्रजासत्ताक


व्हिएतनाम - दौग


झांबीया - क्वाच्छा

Sunday, September 12, 2021

आरती संग्रह

 

.............................................. .....

*श्री गणपतीची आरती*


सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची | 

नुरवी पुरवी प्रेम कृपा जायची | 

सर्वांग सुंदर उटी शेंदुराची | 

कंठी झळके माळ मुक्ताफळाची | 

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती | 

दर्शनमात्रे मन:कामना पुरती जय देव जय देव || धृ || 

रत्नखचित फार तुज गौरीकुमरा | 

चंन्दनाची उटी कुंकुमकेशरा | 

हिरेजडीत मुगुट शोभती बरा | 

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || जय || २ || 

लंबोदर पितांबर फणीवरबंधना | 

सरळ तोंड वक्रतुंड त्रिनयना | 

दास रामाचा वाट पाहे सदना | 

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना | 

जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती | 

दर्शनमात्रे मन:कामना पुरती || ३ ||

...................................................


*श्री गणपतीची आरती*


शेंदूर लाल चढायो अच्छा गज मुखको | 

तोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको | 

हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको | 

महिमा काहे न जाय लागत हुं पदको || १ || 

जय जय जी गणराज विद्यासुखदाता | 

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता || धृ || 

अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी | 

विघ्नविनाशक मंगल मुरत अधिकारी | कोटीसुरजप्रकाश ऐसी छबी तेरी | 

गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी || जय || २ || 

भावभगतसे कोई शरणागत आवे | 

संतती संपत सबही भरपूर पावे | 

ऐसे तुम महाराज मोको अति भावे | 

गोसावीवंदन निशिदिन गुण गावे | 

जय जय जी गणराज विद्यासुखदाता || धन्य || ३ ||

...................................................


*श्री शंकराची आरती*


लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा | 

वीषे कंठी कला त्रिनेत्री ज्वाळा | 

लावण्यसुंदर मस्तकी बाळा | 

तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा || १ || 

जय देव जय देव जय श्रीशंकरा | 

आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा || धृ || 

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा | 

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा | 

विभूतीचे उधळण शितिकंठ निळा | 

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा | जय देव || २ || 

देवी दैत्यी सागर मंथन पै केले | 

त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले | 

तें त्वां असुरपणे प्राशन केलें | 

नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले | जय || ३ || 

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी | 

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी | 

शतकोटीचे बीज वाचे उच्चारी | 

रघुकुळटिळक रामदासाअंतरी || जय देव || ४ ||

...................................................


*श्री देवीची आरती*


दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी | अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी | वारी वारी जन्ममरणाते वारी | हरी पडलो आता संकट निवारी || १ || जय देवी जय देवी महिषसूरमथिनी | सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी || धृ || त्रिभुवन भुवनी पाहता तुजऐसी नाही | चारी श्रमले परंतु न बोलवे काही | साही विवाद करिता पडिले प्रवाही | तें तू भक्तालागी पावसी लवलाही || जय || २ || प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा | क्लेशापासुनि सोडावि तोडी भवपाषा अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा | नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा | जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी | सुरवरईश्वरवरदे तारक || ३ ||

...................................................


*श्री दत्ताची आरती*


त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा | त्रिगुणी अवतार त्रिलोक्यराणा | नेति नेति शब्द नये अनुमाना | सुरवरमुनिजन योगी समाधी न ये ध्याना || १ || जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव || धृ || सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त | अभाग्यासी कैची कळेल हे मात | पराही परतली तेथे कैचा हा हेत | जन्ममरणाचा पुरलासे अंत || जय || २ || दत्त येउनिया उभा ठाकला भावे सांष्टागेसी प्रणिपात केला | प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला | जन्ममरणाचा फेरा चुकविला || जय || ३ || दत्त दत्त ऐसे लागले ध्यान | हारपले मन झाले उन्मन | मी तू झाली बोळवण | एका जनार्दनी श्रीदत्तध्यान || जय देव || ४ ||

...................................................


*श्री विठोबाची आरती*


युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा | पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा || १ || जय देव जय देव जय पांडुरंगा || रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय देव || धृ || तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी | कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी | देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढे उभे राहती || जय || २ || धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा | सुवर्णाची कमळे वनमाळा गळा | राई रखुमाई राणीया सकळा | ओवाळिती राजा विठोबा सावळा || जय || ३ || ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती | चंद्रभागेमाजी सोडुनिया देती | दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णावा किती || जय || ४ || आषाढी कार्तिकी भक्तजन येती | चंद्रभागेमध्ये स्नाने जें करिती | दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती | केशवासी नामदेव भावे ओवाळिती || जय देव जय देव जय || ५ || 

...................................................


*येई हो विठ्ठले आरती*


येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

निढळावरी कर... 

निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।

ठेवुनी वाट मी पाहें ।।


येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।


आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।

पंढरपुरी आहे... 

पंढरपुरी आहे माझा मायबाप ।

हो माझा मायबाप ।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। १ ।।


पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।

सिग्नेचर लिरिक्स डॉट कॉम

गरुडावरी बैसोनि...

गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।

हो माझा कैवारी आला ।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। २ ।।


विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।

विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।

विष्णुदास नामा... 

विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।

हो जीवे भावें ओवाळी ।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ३ ।।


असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।

कृपादृष्टी पाहें... 

कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।

हो माझ्या पंढरीराया ।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ४ ।।

...................................................


*श्री विष्णूची आरती*


आवडी गंगाजळे देवा न्हाणीले | भक्तीचे भूषण प्रेमासुगंध अर्पिले | अहं हा धूप जाळू श्रीहरीपुढे | जंव जंव धूप जळे | तंव तंव देवा आवडे | रमावल्लमदासे अहं धूप जाळिला | एकारतीचा मग प्रारंभ केला | सोहं हा दीप ओवाळू गोविंदा | समाधी लागली पाहतां मुखारविंदा | हरीख हरीख हातो मुख पाहतां | चाकाटल्या ह्या नारी सर्वही अवस्था | सदभवालागी बहु हा देव भुकेला | रमावल्लभदासे नैवेद्य अर्पिला | फल तांबूल दक्षिणा अर्पीली | तयाउपरी नीरांजने मांडिली || आरती आरती करू गोपाळा | मी तू पण सांडोनी वेळोवेळा || धृ || पंचप्राण पंचज्योती आरती उजळिली | दृश्य हे लोपलें तथा प्रकाशांतळी | आरतीप्रकाशे चंद्र सूर्य लोपलें | सुरवर सकळीक तटस्थ ठेले | देवभक्तपण न दिसे कांही | ऐशापरी दास रमावल्लभ पायीं || आरती ||

...................................................


*नवरात्राची आरती*


आश्विनशुध्दपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो | प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो | मूलमंत्रजप करुनी भोवते रक्षक ठेवुनी हो | ब्रम्हा विष्णू आईचे पूजन करिती हो || १ || उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो | उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ || द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो | सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो | कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो | उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो | उदो || तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो | मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो | कंठीची पदके कांसे पितांबर पिवळा हो | अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो | उदो || ३ || चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो | उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो | पूर्ण कृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी हो | भक्तांच्या माउली सुर तें येती लोटांगणी हो | उदो || ४ || पंचमीचे दिवशी व्रत तें उपांगललिता हो | अर्ध्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो | रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो | आनंदे प्रेम तें आले सदभावे क्रीडता हो | उदो || ५ || षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो | घेउनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो | कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो | जोगवा मांगता प्रसन्न झाली भक्तकुळा हो | उदो || ६ || सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो | तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो | जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो | भक्त संकटी पडतां झेलुनी घेसी वरचेवरी हो | उदो || ७ || अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो | सह्याद्रीपर्वती राहिली उभी जगज्जननी हो | मन माझे मोहिले शरण आलो तुजलागुनी हो | स्तनपान देऊनी सुखी केलें अंत:करणी हो | उदो || ८ || नवमीचे दिवशी नवदिवसाचे पारणे हो | सप्तशतीजप होमहवने सदभक्तीकरुनी हो | षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो | आचार्य ब्राम्हणा तृप्त केलें कृपेकरुनी हो | उदो || ९ || दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लघनी हो | सिंहारूढ करी दारूण शस्त्रे अंबे त्वां घेउनी हो | शुंभनिशुभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो | विप्रा रामदासा आश्रम दिधला तो चरणी हो | उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो || १० || 

...................................................


*मारुतीची आरती*


सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी || कडाडिले ब्रम्हांड धाक त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी || १ || जय देव जय देव जय श्रीहनुमंता | तुमचेनी प्रसादे न भी कृतांता || धृ || दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द | थरथरला धरणीधर मानिला खेद | कडकडिले पर्वत उद्दगण उच्छेद | रामी रामदासा शक्तीचा शोध || जय || २ ||

...................................................


*श्री कृष्णाची आरती* 


ओवाळू आरती मदनगोपाळा | श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा || धृ || चरणकमल ज्याचे अति सुकुमार | ध्वजवज्रांकृश ब्रीदाचे तोडर ओवाळू || १ || नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान | हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन | ओवाळू || २ || मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी | वेधले मानस हारपली दृष्टी | ओवाळू || ३ || जडित मुगुट ज्याचा देदिप्यमान | तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन | ओवाळू || ३ || एका जनार्दनी देखियले रूप | रूप पाहतां जाहले अवघे तद्रूप | ओवाळू || ५ ||

...................................................


*श्री ज्ञानदेवाची आरती*


आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत || मनु वेधला माझा || आरती || धृ || लोपलें ज्ञान जगी | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग | नाम ठेविले ज्ञानी || १ || कनकाचे ताट करी | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबर हो || साम गायन

    करी || २ || प्रकट गुह्य बोले | विश्र्व ब्रम्हाची केलें | रामजनार्दनी | पायी मस्तक ठेविले | आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||

...................................................


*श्री एकनाथाची आरती* 


आरती एकनाथा | महाराजा समर्था | त्रिभुवनी तूंचि थोर | जगदगुरू जगन्नाथा || धृ || एकनाथ नाम सार | वेदशास्त्रांचे गूज | संसारदु:ख नाम | महामंत्राचे बीज | आरती || १ || एकनाथ नाम घेतां | सुख वाटले चित्ता | अनंत गोपाळदासा | धणी न पुरे गातां | आरती एकनाथा | महाराजा समर्था || २ ||

...................................................

श्री तुकारामाची आरती 


आरती तुकारामा | स्वामी सदगुरूधामा | सच्चिदानंदमूर्ती | पाय दाखवी आम्हा || आरती || धृ || राघवे सागरांत | पाषाण तारिले | तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकी रक्षिले || आरती || १ || तुकिता तुलनेसी | ब्रम्ह तुकासि आलें | म्हणुनी रामेश्वरे | चरणी मस्तक ठेविले || आरती तुकारामा || २ ||

...................................................


*श्री रामदासाची आरती*


आरती रामदासा | भक्त विरक्त ईशा | उगवला ज्ञानसूर्य || उजळोनी प्रकाशा || धृ || साक्षात शंकराचा | अवतार मारुती | कलिमाजी तेचि झाली | रामदासाची मूर्ती || १ || वीसही दशकांचा | दासबोध ग्रंथ केला | जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले || २ || ब्रम्हचर्य व्रत ज्याचे | रामरूप सृष्टी पाहे | कल्याण तिही लोकी | समर्थ सद्गुरुपाय || ३ || आरती रामदासा || 

...................................................


*घालीन लोटांगण वंदीन चरण*


घालीन लोटांगण वंदीन चरण।।  डोळ्यांनी पाहीन रूप तुझें।।  प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन।।  भावें ओवाळीन म्हणे नामा।। त्वमेव माता च पिता त्वमेव।।  त्वमेव बंधुश्‍च सखा त्वमेव।।  त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव।।  त्वमेव सर्वं मम देवदेव।।  कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा।।  बुद्धात्मना व प्रकृतिस्वभावअत्‌।।  करोमि यद्‌त्सकलं परस्मै।।  नारायणायेति समर्पयामि।  अच्युतं केशवं रामनारायणं।।  कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्‌।।  श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं।।  जानकीनायकं रामचंद्रं भजे।।  हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।  हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।


...................................................


सदा सर्वदा योग तूझा घडावा


तुझे कारणी देह माझा पडावा


उपेक्षू नको गूणवंता अनंता


रघूनायका मागणे हेचि आतां ।।१


कैलास राणा शिव  चंद्रमौळी


फणींद्र माथा मुकुटी झळाळी


कारुण्य सिंधू  भवदु:खहारी


तुजवीण शंभो मज  कोण तारी ।।२।।



मोरया मोरया  मी बाळ तान्हें


तुझीच सेवा करु काय जाणे


अन्याय माझे कोट्यानुकोटी


मोरेश्वरा ब तू घाल पोटी ।।३।।



ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे 


त्या त्या  ठीकांणी निजरुप  तुझे


मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी


तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ।।४।।



अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र


तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र


तया आठविता महापुण्यराशी


नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ।।५।।


...................................................

*अष्टविनायक नमन*


स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।

बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।

लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।

ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।

कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।


...................................................


*मंत्रपुष्पांजली*


ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।

ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।

 ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।

नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।

स मस कामान् काम कामाय मह्यं।

कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।

महाराजाय नम: ।

ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं

वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं

वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं

समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं

तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति

तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो मरूतस्यावसन् गृहे ।

आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।

एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।


तन्नोदंती प्रचोदयात् ।


मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।


।। गणपतिबाप्पा मोरया ।

।। मंगलमूर्ती मोरया ।




🚩🚩

Wednesday, September 1, 2021

तुमची फसवणूक होऊ शकते

 तुमची फसवणूक होऊ शकते

            😳


वाचायला सुरुवात करण्याआधी... आपले डोळे अलगद बंद करा... जीवनातील असा एक प्रसंग आठवा की तुम्ही कुणासाठी काहीतरी चांगले केले होते... त्यावेळी तुम्हाला कसे वाटले होते आणि तुम्ही ज्या व्यक्तीला मदत केली होती त्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय होती...


तीन धडे


एक यशस्वी उद्योजक नारायण मुर्ती यांनी सांगितले की :


जेव्हा मी लहान होतो, त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही. 


माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली. 


एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या. एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, “बेटा, तुला कोणती वाटी हवी आहे ती तू  घेऊ शकतो.”


 त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते! आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे. 


म्हणूनच मी ज्या  वाटीत अंडे होते ती वाटी निवडली! आम्ही जेवण करायला सुरुवात केली, तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास  सुरुवात केली. 


जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला. मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो. माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले, “बाळा, नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही. जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे. शेवटी तुमची हारच होईल.”


 दुसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले : एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले, “बाळा, तुला जी वाटी हवी असेल ती घे.”


ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली! मी अंड नसलेली वाटी निवडली. मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.


 पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, “बाळा, तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये कारण जीवनात खूप अनिश्चितता असते. कधी कधी, जीवन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो. अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये, फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही.”


तिसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले, एका  वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते. त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले, “बाळा, तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे?”


 या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की, “आधी तुम्ही घ्या कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे.”


माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर  एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली. जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही. परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली, तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो!


माझ्या वडिलांनी  प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले, "माझ्या बाळा, हे कधीही विसरु नकोस  की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस, तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते!”


मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो. हे खरेच आहे, की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे.. 


✍️नारायण मुर्ती

Saturday, August 28, 2021

तीन प्रकारची लोकं

 टायटॅनिक डुबताना सगळ्यात शेवटचा इलाज म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला. 

नऊ किलोमीटर अंतरावरच्या एका जहाजाने ते पहिले पण ते जहाज समुद्री जीवाचं तस्करी करणारे होते, त्यांनी विचार केला आपण मदतीला गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊन नुकसान होईल ते गेले नाही. 

अठरा किलोमीटरवर कॅलिफोर्निया नावाचे जहाज होते त्यांनीसुद्धा मदतीचा प्रकाश पाहिला, पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत सकाळी जाऊ असे म्हणून टाळले व सकाळी गेले तोवर जहाज बुडून चार तास झाले होते. 

68 किलोमीटर वर कॅथरीन नावाचं जहाज होते, त्यांनीही प्रकाश पाहिला व ते त्वरित मदतीसाठी धावले, पोहचले तोवर खूप उशीर झाला होता तरीपण त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले. 

आयुष्य पण असचं आहे 

आपल्याला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात 

1) त्यांच्या स्वार्थानुसार अजिबात तुमचा विचार नं करणारे 

2) त्यांच्या वेळेनुसार, सवडीप्रमाणे मदत करणारे 

3) कुठलाही विचार नं करता तुमच्या मदतीला बेधडक हात देणारे,

पहिल्या दोन प्रकारच्या व्यक्ती जर योगायोगाने आयुष्यात परत आल्यातर त्यांच्यासाठी परत भावनिक होने म्हणजे शुद्ध मूर्खपणा होय. 

3 ऱ्या प्रकारातली व्यक्ती चं मोल नं जाणणं म्हणजे आयुष्याचं स्वतःच्या हाताने मातेरं करणं होय.


Friday, August 27, 2021

व्यापार आणि दया

 भाजीवाली रोजच्या सारखी दुपारी दारात आली आणि ओरडून विचारले, "भाजी घ्यायची का मावशी?"

आई आतून नेहमी सारखी ओरडली, "काय आहे भाजीला?"


"गवार हाय, तंबाटी, पालक,...." एवढे बोलताच आई म्हणाली, "थांब आले"


दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, "पालक कसा?"


"रुपयाची गड्डी" (भाजीवाली)

"पन्नास पैशाला दे, चार घेते" (आई)

"नाय जमणार मावशी" (भाजीवाली)

"मग राहुदे" (आई)


भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. "बारा आण्याला देईन".

"नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते" (आई)

"नाय जमणार" (भाजीवाली)

आणि पुन्हा गेली


थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तीला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून परिक्षण करुन चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले. भाजीवाली भारा उचलायला लागताच तीला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, "जेवली का नाही?"


"नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेउन , मग सैपाक, मग जेवण" भाजीवाली म्हणाली


"थांब जरा. बस इथं. मी आणते." म्हणत आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळी पण दिली. पाणी पिऊन भाजीवाली गेली.


मला राहवलं नाही. मी आईला विचारले, "तु एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केली पण नंतर जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तीला खायला दिले."



आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले...


व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये



संग्रहित

🙏🌹🌹🙏

Tuesday, August 24, 2021

गांवांचा वेगळेपणा

● UNIQUE VILLAGES IN INDIA*

● गांवांचा वेगळेपणा ......


१)• शनिशिंगणापूर (महाराष्ट्र)

    संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.

    गांवात पोलीस चौकी,पोलीस ठाणे नाही.

    गांवात चो-या नाहीत.


२)• शेटफळ (महाराष्ट्र)

    प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य 

    असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.


३)• हिवरे बाजार (महाराष्ट्र)

    भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे. 

    ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही.

    सर्वाधिक GDP असणारं खेडं.


४)• पनसरी (गुजरात)

    भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव.

    गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,

    Wi-Fi सुविधाही आहेत.

    गांवातील सर्व 'पथदीप' सौरउर्जेवर चालतात.


५)• जंबुर (गुजरात)

    भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक

    "आफ्रिकन" वाटतात.

    [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]


६)• कुलधारा (राजस्थान)

    "अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही.

     घरे बेवारस सोडलेली आहेत.


७)• कोडिन्ही (केरळ)

     जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.


८)• मत्तूर (कर्नाटक)

    दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी

    "संस्कृत" भाषेचा अनिवार्य वापर करणारं गांव.


९)• बरवानकाला (बिहार)

    ब्रम्हचा-यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून 

    गांवात लग्न-सोहळाच नाही.


१०)• मॉवलिनॉन्ग (मेघालया)

      'आशिया'खंडातील सर्वात "स्वच्छ" गांव.

      पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील

      महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.


११)• रोंगडोई (आसाम)

      बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो,

      अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव.

       असं लग्न हा 'ग्रामसण'च असतो.


१२)• कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र)

        Korlai  village

       स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगिझ गेल्यानंतरही "पोर्तुगिझ:'" भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव.

१३)मधोपत्ती गाव( उत्तर प्रदेश)

 एका गावातून ४६ पेक्षा जास्त  IAS बनलेले हे गाव, ९० टक्के पेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे...

१४) झुंझनु (राजस्थान)

फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती...

६ हजार पेक्षा जास्त सेवानिवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू...

••••••••••••••••••••••••••••

●असाच वेगळेपणा जपणारी आणखीही गांवे असतील, माहिती मिळवा, आणि इतरानांहीमाहित करून द्या.

Sunday, August 22, 2021

चूको मत चौहान….

ही खालील घट्ना आपल्याला पाठ्य पुस्तकातून नाही शिकवली?
फक्त "मोहमद घौरी" याने श्री पृथ्वी राज चौहान याचे डोळे अफगाणिस्तान येथे नेऊन फोडले आणी शारिरीक छळ करून मारले...हेच शिकविले आहे...पुढे मोहमद घौरी चे काय झाले? त्या ला कोणी मारले...वाचा हा इतिहास...जो आपल्या पासून लपवला आहे???




चूको मत चौहान….

अफगाणिस्तानातील काबूलच्या अंधार कोठडीत एक नर-सिंह उद्विग्नपणे येरझाऱ्या घालीत होता…. ज्या हातांतील तलवारीने शत्रूंच्या टोळधाडीला पळता भुई थोडी करून चारीमुंड्या चीत केले होते तेच हात साखळदंडांनी करकचून बांधले गेले होते… पळत्या घोड्यावर मांड ठोकणाऱ्या पायात भारी भक्कम बेड्या टाकून त्यांना जायबंदी केले गेले होते…. त्याच्या फोडल्या गेलेल्या डोळ्याच्या खोबणीत आजही प्रतिशोधाचा अंगार प्रज्वलित होता… अशा या बहाद्दर वीराचे नाव होते "हिंदशिरोमणी पृथ्वीराज चौहान"!

अजयमेरूच्या (अजमेर) या राजपूत वीराने परदेशी इस्लामिक आक्रमक मोहम्मद घौरी ला सोळा वेळा पराभूत केले होते आणि प्रत्येक वेळी उदारपणा दाखवत त्याला जिवंत सोडले, परंतु सतराव्या वेळेस त्यांचा पराभव झाला, तेव्हा मोहम्मद घौरी ने त्यांना सोडले नाही. त्याने त्यांना बंदिवान करून काबुल-अफगाणिस्तानात नेले. सोळा वेळेस पराभूत झाल्यावर ज्या घौरीने दया म्हणून प्राणाची भीक मागितली तोच घौरी बंदी केलेल्या पृथ्वीराजांवर आसूड ओढत होता आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी अनन्वित छळ करीत होता. "प्राण गेला तरी बेहत्तर पण इस्लाम स्वीकारणार नाही" असे म्हणून डोळ्यास डोळा भिडवणाऱ्या पृथ्वीराजांचे डोळे फोडण्यात आले होते! 

पृथ्वीराजांचा इमानी राजकवी “चंद बरदाई”, आपल्या राजाला, पृथ्वीराजांना भेटायला थेट काबूलला पोहोचला! तेथील कैदेत असताना पृथ्वीराजांची दयनीय अवस्था पाहून चंद बरदाईच्या मनाला तीव्र धक्का बसला… आपल्या राजाचे असे हाल करणाऱ्या घौरीचा त्याने सूड घेण्याचे ठरवले… आपली योजना त्याने आपल्या राजांना सांगितली आणि विनंती केली कि, "हे राजा, आपण या घौरीला इतकेवेळा माफ केले, पण आता या सापाच्या अवलादीचा वध करण्याची वेळ आली आहे!" 

चंद बरदाई घौरीच्या दरबारात आला…. त्याने घौरीला सांगितले की, “आमचा राजा एक महाप्रतापी सम्राट आहे… तो एक महावीर योद्धा तर आहेच पण माझ्या राजाची तुला अवगत नसलेली एक खासियत म्हणजे, आमचे राजे ध्वनी-लक्ष-भेदनात प्रवीण आहेत! नुसत्या आवाजाच्या रोखाने बाण चालवून अचूक सावज टिपण्यात ते तरबेज आहेत! जर तुमची इच्छा असेल तर आपण त्याच्या शब्दभेदी बाणांची अद्भुत कामगिरी स्वतः पाहू शकता! 

यावर घौरीचा विश्वासच बसेना, तो म्हणाला, "अरे, मी तर तुझ्या राजाचे दोन्ही डोळे फोडले आहेत… मग तो आंधळा कसा काय धनुष्यबाण चालवणार?”
 
चंद बरदाई अदबीने उत्तरला, "खाविंद, तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष ही विद्या पाहू शकता… माझ्या राजांना इथे दरबारात बोलवा… काही अंतरावर लोखंडाचे सात तवे ठेवा…. आणि त्यांचा आवाज करायला सांगा…. माझे राजे आपल्या धनुष्यबाणाने त्या सातही तव्यांचे भेदन करतील!" 

घौरी कुत्सितपणे हसला नि म्हणाला, "तू तर फारच प्रशंसक आहेस तुझ्या राजाचा! पण एक लक्षात ठेव…. जर का तुझा राजा हि कला दाखवू शकला नाही, तर त्याच दरबारात मी तुझे आणि तुझ्या राजाचे डोके उडवून लावीन!” 

चंद बरदाईने घौरीची अट मान्य केली आणि बंदिगृहात आपल्या लाडक्या राजांच्या भेटीला आला. तिथे त्याने पृथ्वीराजांना घौरीसोबत झालेली बातचीत सांगितली, दरबाराची सविस्तर मांडणी विशद केली आणि दोघांनी मिळून आपली योजना आखली….

ठरल्याप्रमाणे घौरीने दरबार भरवला आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या राज्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना आमंत्रित केले…. भालदार चोपदार यांनी मोहम्मद घौरी दरबारात येत असल्याची वर्दी दिली…. आणि घौरी आपल्या उच्च आसनावर विराजमान झाला! 

चंद बरदाईच्या निर्देशानुसार सात मोठ्या लोखंडी तव्यांना ठराविक दिशेने व अंतरावर ठेवण्यात आले होते…. पृथ्वीराजांचे डोळे काढून आंधळे करण्यात आले असल्याने त्यांना चंद बरदाई च्या साहाय्याने दरबारात आणले गेले. घौरीला “शब्दभेदि बाणाचे दृश्य” नीट पाहता यावे म्हणून त्याच्या उच्च स्थानासमोरील मोकळया जागेत पृथ्वीराजांच्या बसण्याची सोय करण्यात आली होती… ते स्थानापन्न झाल्यावर त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण देण्यात आले…

चंद बरदाई घौरीला म्हणाला,"खाविंद, माझ्या राजांचे साखळदंड आणि बेड्या काढण्यात याव्यात, जेणेकरून त्यांना आपल्या या अद्भुत कलेचे प्रदर्शन करता येईल" 
घौरीला त्यात काहीच धोका वाटलं नाही कारण, एक तर पृथ्वीराज डोळ्याने ठार आंधळा… चंद बरदाई सोडला तर त्याचा कोणी सैनिक नाही… आणि माझे सारे सैन्य माझ्याजवळ दरबारात उपस्थित आहे! त्याने लगेच पृथ्वीराजांना मोकळे साकारण्याचे फर्मान सोडले. 

चंद बरदाईने आपल्या परमप्रिय राजाला चरणस्पर्श करून सावध राहण्याची विनंती केली… त्याने आपल्या राजाचे गुणगान करणाऱ्या बिरुदावल्या म्हंटल्या… आणि त्याच बिरुदावलीच्या माध्यमातून चंद बरदाईनेआपल्या राजाला संकेत दिला….. 

“चार बांस, चौबीस गज, अंगुल अष्ठ प्रमाण।
ता ऊपर सुल्तान है, चूको मत चौहान।“

अर्थात् चार बांस, चोवीस गज आणि आठ वित एव्हढ्या उंचीवर सुल्तान बसला आहे…. तेव्हा राजे चौहान… कोणतीही चूक न करता तू नेम साधून आपले लक्ष्य साध्य कर!

या सांकेतिक बिरुदावलीतून पृथ्वीराजांना मोहम्मद घौरीच्या बसण्याच्या अंतराचा अचूक अंदाज आला. 
 
चंद बरदाईने घौरीला पुन्हा विनंती केली," महाराज, माझे राजे हे आपले बंदी आहेत, त्यामुळे आपली आज्ञा झाल्याशिवाय ते शस्त्र चावणार नाहीत, तेव्हा आपण स्वतः त्यांना ऐकू जाईल एव्हढ्या उच्चरवाने माझ्या राजांना बाण चालवण्याची आज्ञा द्यावी"

घौरी या प्रशंसेने भारावून गेला आणि त्याने मोठ्याने उद्घोषणा केली, "चौहान चलावो बाण!... चौहान चलावो बाण!!.... चौहान चलावो बाण!!!"

घौरीचा आवाज ऐकल्या बरोबर पृथ्वीराज चौहान यांनी आपल्या धनुष्यावर चढवलेल्या बाणाची प्रत्यंचा ओढली आणि गौरीच्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला नि त्या बाणाने अचूकरित्या घौरीच्या छातीचा वेध घेतला! 

काय होतंय हे कळायच्या आत, "या अल्लाह! दगा हो गया” अशी किँकाळी फोडत मोहम्मद घौरीचा देह सिंहासनावरून खाली कोसळला! 

दरबारात एकाच गोंधळ उडाला…. सारे सरदार हादरून गेले… तीच संधी साधून चंद बरदाई धावत आपल्या प्राणप्रिय राजाच्या जवळ आला… त्याने घौरी मृत होऊन कोसळल्याची बातमी आपल्या राजाला सांगितली… आपल्या बहादूर राजाला वंदन केले… दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले… चंद बरदाई आणि पृथ्वीराजांना याची कल्पना होती कि, घौरी चा मृत्यू झाल्यावर त्याचे सैन्य आपल्याला छळ-छळ करून ठार मारणार… त्यामुळे आधीच ठरल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांवर वार करून वसंत पंचमीच्या शुभ दिवशी माता सरस्वतीला आपल्या प्राणांचे अर्घ्य दिले!

पृथ्वीराज चौहान आणि कवी चंद बरदाई यांची हि आत्मत्यागाची शौर्य गाथा आपल्या भारतीय मुलांना अभिमानाने कथन करणे, त्यांच्यापर्यंत पोचणे आवश्यक आहे, म्हणून आज आपल्यासमोर आणली आहे. आपण देखील ही शौर्यगाथा आपल्या मुलांसोबत शेअर कराल हीच अपेक्षा. धन्यवाद!

वंदे मातरम!
ज्येष्ठ कृष्ण

Monday, July 19, 2021

भगरीचे आरोग्यासाठी फायदे...

 

भगरीचे आरोग्यासाठी फायदे...❗


 भगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.


सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.


पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.

आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.


खरंतर भगर हे काही धान्य नाही. भगर म्हणजे शेतात आपोआप उगवणाऱ्या गवताच्या एका प्रकारच्या बिया.


हिंदीमध्ये याला ‘सामा चावल’ म्हणतात.

शिजलेल्या भगरीची चव सुद्धा काहीशी भातासारखीच असते.


भगर हे पटापट वाढणारे पीक आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ‘बी’ पेरल्यापासून केवळ पंचेचाळीस दिवसात भगरीचे पीक तयार होते.

भगर हे अख्या भारतभर उपासाच्या दिवशी केले जाते, पण ते केवळ उपासापुरते मर्यादित न ठेवता इतर वेळेस पण खाण्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण आता बघणार आहोत.


जाणून घेऊयात भगरीत असलेली पोषकद्रवे आणि त्याचा आपल्या शरीराला होणारा उपयोग

१. जास्त प्रमाणात प्रोटीन


भगरीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यापेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात. जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा अंगात शक्ती येते.

कॅलरी कमी असल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सुद्धा भगर उपयुक्त ठरते.


२. फायबर रिच फूड

भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात. 

आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्हायला फायबरची गरज असते.

म्हणूनच आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पचनाच्या तक्रारी कमी होतात.

भगर पचायला हलकी असते. भगर खाल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो दूर होतो, गॅसेस होत नाहीत आणि अपचनामुळे पोट दुखत असेल तर ते सुद्धा दुखायचे कमी होते.

आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पोट भरल्याची भावना सुद्धा लवकर येते आणि जास्त वेळासाठी टिकून राहते. त्यामुळे जेवण कमी जाते पण पोट भरते 

या कारणामुळेच वजन कमी करायचे असेल तर भगर हा एक चांगला पर्याय आहे.


३. लो ग्लायसेमिक इंडेक्स


भगर हे ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ आहे. ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ म्हणजे असे अन्न ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि असलेले कार्बोहायड्रेट पचायला अतिशय सोपे असते.

यामुळे सुद्धा वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भगर फायदेशीर आहे.

‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ असलेल्या अन्नामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

मधुमेह असणाऱ्या लोकांना या प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.

अर्थातच मधुमेह असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर असते.


४. ग्लूटेन फ्री


भगरीत ग्लूटेन नसते. ग्लूटेन म्हणजे आपण खातो त्या धान्यात आढळणारा एक चिकट पदार्थ.

आपण ज्या धन्याच्या पिठाला मळतो त्यात ग्लूटेन असते, उदाहरणार्थ गव्हाचे पीठ. पिझा, पास्ता, ब्रेड यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते.

ग्लूटेनमध्ये काही पोषक द्रव्ये नसतात, काही लोकांना ग्लूटेनची ऍलर्जी सुद्धा असते.

ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्यांना पोटात दुखणे, अपचन यासारखे त्रास होतात.

अशांसाठी भगर जे पूर्णपणे ग्लूटेन फ्री आहे हा एक उत्तम पर्याय आहे, जो पचायला हलका आहे हे आपण वर बघितलेच आहे.


५. जास्त प्रमाणात आयर्न


भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते. म्हणूनच आपल्याला जर ऍनेमियाचा त्रास (शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) सरल तर शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी भगर उपयोगी आहे.

इतर कोणत्याही धान्यात असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात आयर्न भगरीतून मिळते.

साधारण १०० ग्राम भगरीतून १८.५ एमजी आयर्न मिळते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी भगर हा आयर्नचा सर्वोत्तम स्रोत आहे.


६. व्हिटॅमिन्स आणि खनिजे यांचे प्रमाण जास्त


भगरीत व्हिटॅमिन ‘सी’, ‘ए’ आणि ‘इ’ जास्त प्रमाणात असतात.

तसेच भगरीत खनिजे सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.


७. सोडियम फ्री फूड


भगरीत सोडियम नसते ज्यामुळे बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो.


८. भरपूर अँटिऑक्सिडंट्स


साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.

अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातल्या पेशींची फ्री रॅडिकल्स नावाच्या धोकादायक मॉलिक्यूल पासून संरक्षण करतात.


मोठी माणसे भगर जरी उपसाला खात असले तरी बाळाला पहिल्यांदा बाहेरचे अन्न देताना, अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून भगरीची खीर करून दिली तर बाळासाठी तो उत्तम पोषक आहार ठरतो.

कारण ती पचायला अतिशय हलकी असते.

भगरीसारखे इतके सकस अन्न, फक्त उपवासासाठी न वापरता त्याचा रोजच्या आहारात उपयोग झाला पाहिजे.

त्यासाठी च  नवरात्रात नऊ दिवसांचा उपवास करताना, आपले पुर्वज शरीराला पोषक आहार मिळून ऊर्जा टिकून राहण्यासाठी भगरीचा वापर सर्वात जास्त करत होते.  


भगरीचे आरोग्यासाठी फायदे सांगणारा हा लेख आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.


❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

Saturday, July 10, 2021

राजा भोज मोठा दानशूर

राजा भोज मोठा दानशूर होता. त्याची एक सवय होती की जेव्हा तो दान देण्यासाठी हात समोर करी ✊ तेव्हा तो आपली नजर खाली 😞 झुकवून घेत असे.
          
ही बाब सर्वांनाच खटकत असे. असा कसा हा दानशूर राजा जो दानही देतो आणि ते देतांना त्याला लाजही वाटते.

जेव्हा राजा भोजची ही किर्ती संतश्रेष्ठ तुलसीदासांच्या कानी पडली, तेव्हा त्यांनी खालील चार ओळी लिहून त्या राजाला पाठवल्या -

ऐसी देनी देन जु
               कित सीखे हो सेन।
ज्यों ज्यों कर ऊँचौ करौ
                त्यों त्यों नीचे नैन।।

म्हणजे हे राजन, आपण हे असलं दान देणं कुठून शिकलात? जसजसे आपले हात दान देण्यासाठी वर येऊ लागतात तसतशी आपली नजर खाली खाली कां झुकू लागते?

बदल्यात राजा ने जे उत्तर तुलसीदासांना लिहून पाठवलं ते मोठं सुंदर होतं. ज्यांनी ज्यांनी राजाचं हे उत्तर वाचलं ते ते सर्व तर राजाच्या प्रेमातच पडले. इतकं सुंदर उत्तर आजपर्यंत कुणीही कुणालाच दिलं नसेल.

राजाने तुलसीदासांना उत्तरात लिहिलं -

*देनहार कोई और है*
                *भेजत जो दिन रैन।*
*लोग भरम हम पर करैं*
                   *तासौं नीचे नैन।।*

म्हणजे, देणारा तर तो कोणी दुसराच आहे. तो ईश्वर, तो परमात्मा तोच रात्रंदिवस  लोकांना दानधर्म करीत असतो. परंतु लोकांना मात्र वाटत असतं की दानधर्म मी, त्यांचा राजाच करतोय. आणि या विचारानं मला माझीच लाज वाटत असते आणि माझे डोळे आपोआप लवतात.
 तोच करतो आणि तोच करवून घेतो तू फक्त निमित्त आहेस, कशाला अभिमान बाळगतोस?

एक श्वासही नाही घेता येत तुला तुझ्या इच्छेनं, झोपेतही तोच आणि झोपेतून जागंही करतो तोच.........🙏*

Friday, June 11, 2021

आई कुठे काय करते...

 आई कुठे काय करते...


२०१७ साली झालेल्या ' Miss World ' contest  मधे  "हरियाणा" ची डॉक्टर मानुषी छिल्लर हिने विजेते पद पटकाविले होते .

शेवटच्या  निर्णायक राऊंड मधे तिला प्रश्न विचारण्यात आला होता की सर्वात जास्त पगार कोणत्या क्षेत्रातील लोकांना मिळाला पाहिजे ?? तेंव्हा तिचे ' winning '  उत्तर हे होते की   "सर्वात जास्त पगार " आई " ला मिळाला पाहिजे ". आईच्या कामाचे मोल नाही.

तिच्या या उत्तराने  तिने ती स्पर्धा तर जिंकलीच .बरोबर, जगात  एक नवीन विषय चर्चेला  दिला .त्यानंतर  फोर्ब्स  व्दारे  संचालित वेब साईट ' Salary • com  'वर research सुरू झाला . की एक आई जेवढं काम करते ,त्या कामांसाठी जर वेगवेगळी माणसे ठेवली ,तर त्यांना किती पगार द्यावा लागेल  ?? तेंव्हा सर्व गोष्टी लक्षात घेता , एका भारतीय आईला ७१,०००/ अंदाजे 

एवढा पगार मिळाला पाहिजे दरमहा.••••.असा निष्कर्ष निघाला.

 तिच्या  उत्तराने ही  गोष्ट जगासमोर उजागर झाली. जगासमोर भारतीय परिवार व त्यात आईची  भूमिका समोर आली. आदि काळापासून आई हेच  काम  करते आहे रोजच, वर्षानुवर्षे, न  थकता ,   न  थांबता  आनंदाने. कुठेही उपकाराची भावना  नाही. अहंपणा नाही .कंटाळा नाही. ती सुखी  घराची  किल्ली आहे .एकाच वेळी ती  असंख्य  departments  सहज सांभाळते. सकाळ ते संध्याकाळ असंख्य काम सहज करते.अगदी काटेकोरपणे बिनबोभाट . ती घरची   Administrative officer  आहे. वेळ पडली तर डॉक्टर,  टीचर , counsellor आहे आणि कधी कधी हिटलर ही होते. जवळ जवळ  सर्वळ मंत्रालय  तिच्या कडेच असतात . घराची गृहमंत्री , वित्त मंत्री  आहे  ती. थोडक्यात घराचा भक्कम आधारस्तंभ  आहे . 

       तज्ञ, कोणत्या तरी एकाच क्षेत्रात perfect असतात. तज्ञ असतात व त्यांच्या या expertise चे भरपूर पैसेही  मिळतात त्यांना .येथे प्रत्त्येक घरची आई प्रत्येक department किती कुशलतेने सांभाळते .

                  I   think she is The Best CEO in the world .

       जगाची रीतच आहे ही .  जून्या काळापासून चालत आलेली. कुठे न लिहीलेले नियमच आहेत ते .ही सर्व कामे करण्यात तिला आनंद आहे.  समाधान आहे .एखादं काम जरी नीट झालं नाही तर ती disturb होते‌ .म्हणजे  अगदी भरलेला डबा शाळेत जाताना मुलगा विसरला, तरी ती अस्वस्थ होते .माझी कुठे चूक झाली ?? याचा विचार करते .व पुन्हा असे होणे नाही .याची काळजीही  घेते.

       या सर्व कामाचा मला मोबदला मिळावा हा विचार तिच्या मनात ही येत नाही .

 काळ कितीही बदलू दे, आधुनिकता किती ही असू दे , "आई  "आईचं राहणार आहे तशीच कर्तव्यदक्ष. आपल्या घराला घरपण देणारी, जीव ओवाळून टाकणारी ,सांभाळणारी ती 

आई असते.❤️

Thursday, June 10, 2021

आहाराचा संबंध आजाराशी असतो

 पावसाळा हा ऋतू निसर्गात सर्वत्र हिरवळ पसरवणारा असला तरी येताना तो अनेक प्रकारचे विकारही घेऊन येतो. या रोगांपासून दूर राहण्यासाठी आपण काय खावे, कसे खावे आणि कसे राहावे यासाठी आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूची ऋतूचर्या सांगितली आहे.


पाऊस पडायला लागल्यावर हवेतला दमटपणा वाढतो आणि शरीरात वातदोषही वाढतो. या काळात आपला जठराग्नी मंदावतो आणि पचनशक्ती कमी होते. परिणामी पोटाचे विकार या ऋतूत खूप वाढतात. एवढेच नाहीतर गजबजलेल्या शहरांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता, प्रदूषण यांमुळे पोटाच्या विकाराबरोबरच सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, हिवताप, स्वाइन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ, उलटय़ा, जुलाब, विषमज्वर यांसारखे अनेक साथीचे रोगही बळावतात. त्यामुळे या सर्व विकारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे.


आहाराचा संबंध आजाराशी असतो. योग्य आहार तर कमी विकार त्यामुळे पावसाळ्यात आहारावर नियंत्रण ठेवले नाही तर विकारांना निमंत्रण नक्की आहे. पावसाळ्यात पचनशक्ती मंद असतेच, पण पुढे ‘ऑक्टोबर हीट’ म्हणजेच शरद ऋतू ज्यात पित्तदोषाचा प्रकोप होतो, त्या पित्ताची साठवणही पावसाळ्यात शरीरात व्हायला लागते. त्यामुळे पावसाळ्यातला आहार हा पचायल हलका, ताजा आणि गरमागरम असावा. आपल्याकडे चातुर्मासात पावसाळा असतो. शास्त्रकारांनी पचन नीट व्हावे यासाठीच चातुर्मासात विविध सणांच्या निमित्ताने उपाय करायला सांगितले आहेत. त्यायोगे पोटाला न पचलेले अन्न पचवायला वेळ मिळेल आणि उपासानिमित्ताने हलके आणि कमी प्रमाणात अन्न शरीरात जाईल. परंतु आपल्याकडे याच्या नेमके उलट घडते. उपवासाच्या थाळीत काय काय असते तर, साबुदाणा खिचडी, साबुदाणा-बटाटय़ाचे थालीपीठ किंवा वडे, शेंगदाण्याची आमटी, वेफर्स, बटाटय़ाचा चिवडा असलेली मिसळ! जुन्या पिढीची अजून एक पद्धत म्हणजे उपवास सोडण्यासाठी केली जाणारी श्रीखंड, खीर, पुरण, शिरा यांसारखी पक्वान्न्ो. असा उपवास शरीरासाठी नक्कीच फायदेशीर नाही.


उपवास करायचा असेल तर वरी तांदूळ, शिंगाडा पीठ, उपवासाची भाजणी, सुरण, लाल भोपळा, राजगिरा, फळे, सुंठ पावडर घालून गरम केलेले दूध, गोड ताक, घरचे लोणी, तूप या पदार्थाचा आहारात समावेश करावा.


मांसाहार शक्यतो या ऋतूत टाळायला हवा. पचनशक्ती कमी असताना तळलेले मासे, चिकन, मटण शक्यतो खाऊ नयेत. याऐवजी मूग, मटकी, मसूर, लाल चवळी, कुळीथ यांचा आहारात समावेश करावा. तुरीची आमटी शक्यतो दुपारच्या जेवणात खावी. उडदाची डाळ, बेसन, मैदा, छोले, राजमा, वांगे, बटाटा, पांढरी चवळी, वाल पावटा हे पदार्थ वातूळ म्हणजे शरीरातील विकृत वायू वाढविणारे आहेत. त्यामुळे त्यांचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करावा. पालेभाज्यांमध्ये लाल माठ, चवळी, शेवग्याचा पाला किंवा टाकळ्याच्या पानांची भाजी खावी. परंतु पालक, मुळा, मेथी, शेपू, अंबाडी यांसारख्या भाज्या खाणे शक्यतो टाळावे.


गरम गरम पोळी, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, आले. लसूण, हिंग, मोहरी, मेथी, हळद, कडुिलब, कोथिंबीर, ओला नारळ या सर्वाची फोडणी दिलेल्या फळभाज्या, आमसुलाचे सार किंवा सोलकढी, तूप, जिरे, लसणीचे फोडणी दिलेले ताक, डाळ-तांदुळाची खिचडी, दलिया, उकडय़ा तांदुळाचा भात, पुदिना, कोथिंबीर, आले, लसूण, जिरे यांची चटणी अशा पदार्थाचा रोजच्या जेवणात वापर करावा.


पावसाळ्यात उकळवून पाणी पिणे हे केव्हाही उपयोगी असते. अगदी फिल्टरमधून शुद्ध केलेले पाणी असले तरी १० ते १५ मिनिटे उकळवून आणि गाळून ते पाणी प्यावे. आहारातील अपथ्याप्रमाणेच पावसाळ्यातील बऱ्याच रोगांचे कारण हे दूषित पाणी असते. फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पदार्थ, पेय, सरबते, पाणी याचा वापर कटाक्षाने टाळावा. लोणची, पापड हेदेखील पावसाळ्यात शक्यतो खाणे टाळावे. वात आणि कफविकार असलेल्या व्यक्तींनी तर पावसाळ्यात कायम कोमट पाणी पिणे (तापवून थंड झालेले नाही) निरोगी आरोग्यासाठी खूपच उपयोगी पडते. चहा करताना त्यात आले, गवती चहाची पाने जरूर घाला. दूध पिताना पाव चमचा हळद आणि सुंठीची पावडर घालून ते कोमटच प्यावे. पाऊस सुरू झाला की पहिल्या पावसानंतर हापूस आंबा खाऊ नये.


लोक सर्व पदार्थ खातात म्हणून तुम्हीही खाऊ नका. आपले राहणीमान, पचनशक्ती कशी आहे, आपल्या प्रकृतीला काय चालते, आपल्याला वयोमानानुसार काय पचू शकते याचा सारासार विचार करून कधी, काय आणि कसे खावे हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे.

Monday, June 7, 2021

परत येण्याची वेळ

 परत येण्याची वेळ


आपण आयुष्याचे 40/50 वर्षे पुर्ण केली असल्यास,

“परत फिरण्याची” तयारी सुरू करा....आपल्याकडे असलेल्या, जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्याअगोदर ! 


का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे?

जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला टॉल्स्टॉयची प्रसिद्ध कथा आठवते..


परत येणे ..... कधीच सोपे नसते 


एक माणूस राजाकडे गेला. म्हणाला मी गरीब आहे ,

माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे.   

राजा दयाळू होता. त्याने विचारले: कोणत्या मदतीची आवश्यकता आहे?

माणूस म्हणाला: कसायला थोडी जमीन द्या. 

राजा म्हणाला: उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये. तु चालु शकशील, धावु शकशील तो संपूर्ण प्लॉट तुझा होईल. परंतु लक्षात ठेव, जिथुन धावणे सुरू करशील तिथेच  सूर्यास्तापर्यॅत तुला परत यावे लागेल, अन्यथा काहीही मिळणार नाही!


माणूस खुष झाला. तो सूर्योदय होताच पळायला लागला .. पळत राहीला ; सूर्य माथ्यावर चढला होता .. पण माणूस धावयचं थांबला नाही .. अजून थोडी मेहनत .. मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती ! 


संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं, त्याला परत यावं लागेल, नाहीतर त्याला काही मिळणार नाही! त्याने पाहिले की तो खुप दूर आला आहे .. आता परत यायचे होते .. सूर्य पश्चिमेकडे वळला होता .. तो थकला होता. परत पोहोचायचे होते.. पण वेळ वेगाने निघुन जात होती .. अजून थोडी मेहनत..न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला .. पण आता श्वास घेणं कठिण झालं होतं. तो खाली पडला  .. आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला ! 


राजा हे सर्व पहात होता. तो त्याच्या सहकार्यांसह तिथे पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला:


याला फक्त सात फुट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना  इतका पळत होता! 


आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत: ला ठेवून विचार करा. आपण तीच चूक करीत नाही ना ? आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा असीम आहेत! आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही. आणि जेव्हा आम्ही करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही.


मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो..आजपर्यंत मी कुठे पोचलो? मला कुठे जायचे आहे आणि मला किती दिवसात पोहोचायचे आहे? जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेन?  हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा! 


सूर्यास्ताची वेळ  लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत. अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आम्ही सर्व अभिमन्यूच आहोत. आम्हालाही कसे परत फिरावे  हे माहित नाही. 

थोडं थांबा, आजुबाजुला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचं राहुन गेलाय. किमान आज या एका क्षणापुरतं खुष व्हा.

🙏🏻🙏🏻



Tuesday, May 25, 2021

चालणे म्हणजे दुसरे हदय


चालणे म्हणजे दुसरे हदय

  .... 🚶🏾‍♀️🚶🏾‍♂️🏃🏾‍♀️🏃🏾‍♂️👩🏾‍🦯🧑🏾‍🦯🚶🏾‍♀️🚶🏾‍♂️🏃🏾‍♀️🏃🏾‍♂️


आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले "दुसरे हृदय" म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.

सर्वाँना हृदयाचे कार्य काय असते ते ठाउक असेलच.

हृदय म्हणजे शरीरातील एक पंप आहे. हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमण्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते, ते एका ठिकाणी साचून राहातं नाही.

पण शरीरात आणखीही एक पंप कार्यरत असतो.

होय. खर आहे.

*आपले पोटरीचे स्नायू हेच आपले दुसरे हृदय आहे.*

हृदयाचे काम काय तर रक्त वाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे. यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात.

रक्त असे गोल गोल सतत वाहत ठेवणे अत्यंत जरुरी आहे. तसे न झाल्यास आणि जर रक्त एकाच ठिकाणी साचून राहिले, तर शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात. हृदयाला शरीरात रक्त फिरते ठेवण्यास पायाच्या पोटरीचे स्नायू मदत करतात. जेव्हा आपण चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायूतील रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त हृदयाच्या दिशेने ढकलून दिले जाते. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच तशी केलेली आहे.


पायाच्या पोटरी मधील रक्त वाहिन्या ( नीला ) या एका प्रकारे रक्ताचा साठा करण्याचे काम करतात.

त्यांना " मसल विनस सायनस असे" म्हणतात.

ज्यावेळी पायाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी पायात साठलेले रक्त नीलांमधून वर, म्हणजे हृदयाच्या दिशेने ढकलले जाते. या पायांच्या रक्त वाहिन्या मध्ये विशेष प्रकारच्या झडपा असतात. या झडपा रक्त वाहण्याची दिशा ठरवितात. या झडपा, रक्ताला पायाकडून हृदयाकडे जाऊ देतात, परंतु हृदया कडून पायाकडे जाऊ देत नाहीत. आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावा मुळे रक्त हे खालच्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे. या झडपा, गुरुत्वाकर्षणामुळे  रक्त पायात साचू देत नाहीत आणि रक्ताला हृदयाच्या दिशेने जाण्यास भाग पाडतात. आपण जेव्हा चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात व हृदयास रक्ताभिसरण करण्यास मदत करतात.

घोट्याखालचा जो पाय असतो त्यात देखिल काही प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो.

आपण ज्यावेळी चालतो, त्यावेळी सर्वप्रथम तळपा यातील स्नायू आकुंचन पावल्याने तेथील रक्त वर हृदयाच्या दिशेने ढकलले जाते, नंतर जेव्हा पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी सर्व रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आणखी  पुढे ढकलले जाते आणि हृदयापर्यत पोहोचते.

रक्त वाहिण्यातील झडपा रक्ताला खाली येण्यापासून रोकतात. 

आपण एकाच ठिकाणी खूप वेळ स्तब्ध बसून राहिलो ( विमानात, कारमध्ये, खुर्चीत   बरेच तास ) तर पोटरीचे स्नायू आकुंचन पावू शकत नाहीत. रक्त पायातच साचून राहते आणि रक्ताच्या गुठळ्या ( DVT, deep vein thrombosis ) होण्याची शक्यता वाढते. म्हणून चालणे व पळणे किती महत्त्वाचे आहे ते कळते. 


एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात खिळून राहिला तर त्याला DVT होऊ शकते.

याचा अर्थ त्याच्या पायाच्या रक्त वाहिन्या मध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखतात, तसेच सूज देखिल येते. अश्या प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फफुसात जाऊन फसू शकतात ज्याने जीवाला धोका उद्भवू शकतो.


जर पोटरितील झडपा कोणत्याही कारणाने खराब झाल्या तरी देखील पाय दुखू शकतात. झडपा खराब झाल्या की रक्त पायात साचून राहते. पाय जड होणे, थकवा, पाय ठसठसणे,

घोट्यात सूज, फुगलेल्या पायाच्या नसा, पायात अचानक चमक येवून दुखणे,

खाज येणे, चमडीचा रंग बदलणे, पायात बरी न होणारी जखम होणे, इत्यादी त्रास होऊ शकतो.


*थोडक्यात - चालत रहा,* शक्य असल्यास धावत रहा.

निरोगी आणि सुदृढ रहा.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*👩🏾‍🦯🏃🏻‍♂️चाला आरोग्यासाठी.* 🚶🏾‍♀️🏃🏻‍♂️

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

       जर तुम्ही रोज पहाटे चालत असाल तर तुम्हाला जे फायदे सकाळी मिळतात ते पहाटे मिळणार नाहीत.

जर आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने चाललात तर तुम्हाला आरोग्यदायी असे अनेक फायदे मिळतील...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    ...होय सकाळी कोवळे ऊन येत असताना सहा/ साडेसहाच्या दरम्यान जर तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये चालायला सुरुवात कराल तर तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*सकाळी चालणे आवश्यक का आहे?*

      जेव्हा तुम्ही सकाळी चालायला जाता तेव्हा कोवळे ऊन जर असेल तर तुम्हाला विटामिन डी भरपूर प्रमाणात मिळेल,

त्यामुळे शरिरातील विटामिन डी ची कमतरता भरून निघेल.

दररोज सकाळी चालण्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळेल.

अंधारात ऑक्सीजन कमी उपलब्ध असल्यामुळे तो कमी मिळतो, कारण रात्री झाडे कार्बन डायऑक्साइड सोडतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियम सोबतच विटामिन डी खूप आवश्यक असते, जर तुम्ही योग्य प्रमाणात कोवळे ऊन तुम्हाला मिळाले तर शरीरात कॅल्शियम चा उपयोग योग्य पद्धतीने होऊ शकतो.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*स्ट्रेस / तणाव मुक्ती साठी उपयोगी.*

        मानसिक ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींना सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे अत्यंत उपयुक्त आहे, किबहुना आवश्यकचं आहे , यामुळे सकाळचे सकाळी चालण्याने मिळणारे सर्व फायदे डिप्रेशन कमी करण्यासाठी उपयोगी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर डायबिटीक आहात तर त्या व्यक्तीने कोवळ्या उन्हामध्ये जर फिरले तर डायबेटिस, ब्लडप्रेशर आणि हृदयरोग त्याचबरोबर मानसिक ताणतणाव दूर राहण्यास मदत होते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*सकाळीच का चालायचे?*

      सकाळी हवेमध्ये प्रदूषण कमी असते, वातावरणात शांतता असते, स्फूर्ती प्रदान करणारे असते, त्याचबरोबर शरीरास व्यायाम होतो. ज्याचा फायदा तुमची ऑक्सिजन लेवल वाढण्यासाठी होतो  यामुळे तुमची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि  प्रतिकारशक्तीही  वाढते, फक्त चालताना एकमेकांशी गप्पा मारू नयेत हे महत्त्वाचे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*चालण्याचे सर्वसाधारण फायदे.*

१) त्वचा चमकदार होते, 

२) हृदयाचा स्वास्थ्य चांगले राहते, 

३) मधुमेह नियंत्रणात राहतो, 

४) वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, 

५) मेंदूची कार्यक्षमता वाढते, 

६) झोप चांगली लागते, 

७) प्रतिकारशक्ती वाढते, 

८) कोलेस्ट्रॉल कमी होते, 

९) कॅन्सर चे पेशंटना उपयोगी, 

१०) मेंदूची कार्यक्षमता वाढते, 

११) प्रतिकारशक्ती वाढते, 

१२) हृदयाची कार्यक्षमता वाढते, 

१३) थकवा दूर होतो, 

१४) शरीरात स्फूर्ती येते, 

१५) कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत, 

१६) चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते.

१७) सर्व प्रकारच्या


 *आजारांपासून मुक्त राहण्यासाठी उपयुक्त.*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

           एकूणच तुमच्या संपूर्ण शारीरिक स्वास्थ्यासाठी दररोज सकाळी कमीतकमी (45 मिनिटे 90 मिनिटे) चालणे आवश्यक आहे....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*चालणे सुरू करताना काय आहे आवश्यक*

१) एक जोडी स्पोर्ट्स शूज,

२) शॉर्ट किंवा लेगिन्स, 

३) शॉर्ट टी-शर्ट, 

४) महिलांसाठी स्पोर्ट्स ब्रा हेअर बँड , 

५) स्पोर्ट्स वॉटर बॉटल 

आणि 

६) तुमचा उत्साह...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🚶🏾‍♀️🏃🏾‍♂️ *चाला आरोग्यासाठी....*🚶🏾‍♂️🏃🏾‍♀️

*( सुबह की हवा ; सव्वा लाख की दवा...)*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


*पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!* 


अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते.  वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते. 


 हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. 

चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तरुणांनी पण याचा फायदा घ्यावा. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. 


*वेगाने चालण्याचे फायदे -*


*1)* आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते. 

*2)* रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.

*3)* रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.

*4)* दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.

*5)* रोज कमीत कमी १ तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.

*6)* सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.

*7)* हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.

*8)*  चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.

*9)* सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.

*10)*  चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत

*11)* चालण्यामुळे झोपही चांगली लागते.

*12)* मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.

*13)*  वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम

*14)*  चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते

*15)* चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.

*16)*  दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.

*17)*  चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.

*18)*  झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.

*19)* नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.

*20)* नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.

*21)* नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

*22)*  नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.

*23)*  हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.

*24)*  नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.

*25)*  मोतीबिंदूची शक्यता कमी होते.

*26)* नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.

*27)*  नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.

*28)*  चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते

*29)*  दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते. 

*30)* नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.



➖➖➖➖🙏🏾🙏🏾➖➖➖

ज्येष्ठ नागरिक

  60+ ज्येष्ठ नागरिक सहसा पुढील गोष्टींचा अनुभव घेतात:


 1. घशात अन्न अडकणे


 2. मान दुखणे


 3. पायात गोळे येणे


 4. पायला मुंग्या येणे.


 विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी खाली दिलेले सोपे उपाय डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी  मदतीचे ठरू शकतात.


समस्या व‌ उपाय

 *१. घशात अन्न‌ अडकणे*


 आपल्याला फक्त "हात वर करणे" आवश्यक आहे.

 हात डोक्यापेक्षा वर सरळ ताणल्यास , आपल्या घश्यात अडकलेले अन्न आपसुक खाली जाण्यास मदत होईल.


 *२. मान दुखी*


 कधीकधी आपण मानेच्या दुखण्यासह सकाळी उठतो. याला चुकीची उशी वापरणे हे एक कारण असू शकते. अशा परिस्थितीत आपण फक्त आपले पाय उचलून जर बोट ओढून आपले पाय एका घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरूद्ध‌ दिशेने हलवले तर आराम मिळू शकेल


 *३. पायात गोळे येणे*


 जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळे अथवा‌ पेटके आले असतील तर आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात पेटके आले असतील तर आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरे वाटेल.


 *४. पायाला मुंग्या येणे*


  जेव्हा डावा पायास मुंग्या येत असतील तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला उजवा हात गोलाकार फिरवा, जेव्हा उजवा पाय मुंग्या येत असेल, तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला डावा हात गोलाकार फिरवा. याने‌ लगेच फायदा होईल.

 


 फक्त ही माहिती जतन करू नका.

कृपया ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा‌ संदेश‌‌ लवकर पोहोचवा

Saturday, May 22, 2021

स्त्रीआणि उत्तम संस्कार

 सुसंस्कृत स्त्रिया ज्या घरात असतात, तिथे उत्तम संस्कार होतात व अश्या कुटुंबात कधीच गरीबी येत नाही...


खुप छान आहे, वाचा सविस्तर…


● पहिले लक्षण आहे,आपआपल्या धर्म मार्गावर चालणारी म्हणजेच धार्मिक स्त्री...

जी स्त्री दररोज भगवंताचे व तुळशीची पूजा करते व त्याच बरोबर दररोज घरामध्ये देवाजवळ व तुळशी जवळ दिवा लावते व स्वयंपाक झाला की अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवते,व नंतर सर्वजण भोजन करतात या स्त्री मुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते व अशा वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व आनंदी असते...


● दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती…..

जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते,जास्त हव्यास करीत नाही तिचा पती देखील तिच्यावर आनंदी असतो, काही स्त्रीया जर शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असे वर्तन करतात. यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतींच्या नाकीनव येतात व कधी कधी त्यांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला कठीण व वाईट कामे देखील करावी लागतात व त्यामुळे त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात.म्हणून जर स्त्री समाधानी असेल व तिच्या गरजा लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करताना पतीला देखील जास्त कष्ट करावे लागत नाही व घरातील वातावरण आनंदी व समाधानी राहते...


● तिसरे लक्षण म्हणजे,स्त्री मध्ये धैर्य असावे,धाडस असावे…कोणतीही परिस्थिती असली तरी देखील न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद स्त्रीमध्ये असावी व कितीही वाईट परिस्थिती असली तरी स्त्री भक्कम पणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असायला हवी. जर अशी सय्यमी,धैर्यवान, जबाबदार आणि धाडसी स्त्री घरामध्ये असेल तर वाईट परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही...


● चौथे लक्षण म्हणजे राग न येणे….

तसे पाहायला गेले तर हा गुण असणाऱ्या स्त्रिया मिळणे अवघड आहे,कारण राग येणे हा स्त्री चा जन्मताचाच स्वभाव असतो.परंतु अति राग करणे, चिडचिड करणे, कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत, थोडा फार राग सर्वच स्त्रियांना येतो व तो यायलाच हवा.त्या रागाचा आतल्या आत मोठा साठा होऊन कधीतरी त्याचा मोठा स्फोट होऊ शकतो व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. जर स्त्री सारखी राग राग करीत असेल किंवा चीड चीड करीत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व भांडणे आणि वाद विवाद होत राहतात म्हणून स्त्रीने संयमित व शांत असावे...


● पाचवे लक्षण म्हणजे समजदार स्त्री…

जी स्त्री प्रत्येक गोष्टीत समजूतदार पणाने घेते व शांत पणे सर्व समजून घेते, जे आहे ते आहे व जे नाही ते नाही याचा शांतपणे विचार करून स्वीकार करते तसेच सर्वांशी चांगले वागते, गोड बोलते, त्यामुळे ते घर देखील सुखी व आनंदी असते, ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते, ती सर्वांशी चांगले बोलून त्यांच्यातील संबंध अधिक चांगले बनवते आणि सर्वांना समजून घेते त्यामुळे वेळ प्रसंगी ते सर्व लोक तिच्या कुटुंबियांसाठी धावून येतात...


जिथे कलह नाही, घरातील सर्व  सदस्य एकोप्याने राहतात,एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात, स्वच्छतेचं पालन करतात अश्या ठिकाणी सुख,शांती, समृद्धी आणि सफलता सदैव नांदत असते.

Saturday, May 8, 2021

डेल्टा-15 ची ही कहाणी



 अमेरिकेत "9/11‘ला दहशतवादी हल्ला झाला,

त्या वेळची एक हृदयस्पर्शी कथा आहे. दोन विमाने

वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवरवर आदळली आणि दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले, तर दुसऱ्या.मार्गावरून जाणारे आणखी एक विमान पाडण्यात आले. ही खबर मिळताच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. जगभरातून जी विमाने अमेरिकेकडे येत होती, त्या सगळ्यांनाच रेडिओ मेसेज केले गेले, की अमेरिकेला येण्याचे रद्द करा, जवळच्याच विमानतळावर विमाने लॅंड करा आणि पुढील आदेशाची वाट पाहा.


"डेल्टा-15‘ या विमानालाही असाच संदेश आला. हे विमान कॅनडाहून येत होते. विमानाचा मार्ग बदलण्याचे कारण काय हे कुणालाच समजले नाही. वैमानिकही याबाबतीत अनभिज्ञ होता. कॅनडातील एका गावातील विमानतळावर विमान उतरले, तेव्हा प्रवाशांना कळाले, की अमेरिकेकडे जाणारी आणखी 52 विमाने तेथेच उतरली आहेत.


या सगळ्या विमानांतील प्रवाशांची संख्या दहा हजारांवर होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावात हा विमानतळ होता, त्या गावची लोकसंख्याही दहा हजारांच्या आसपास होती. म्हणजे अक्षरशः गावाच्या लोकसंख्येएवढे पाहुणे तेथे आले होते.


वैमानिकाला पुढील आदेश मिळेपर्यंत तीन दिवस लागले. तोपर्यंत या पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी गावावर होती. गावातील प्रशासनाने व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. सर्व शाळा बंद केल्या. जवळपासच्या घरांतून पलंग, खुर्च्या, जेवणाचे सामान प्रत्येक शाळेत पोचविले.


पाहुण्यांची उत्तम सोय करण्यात आली. या सर्व व्यवस्थेचे संयोजन रेड क्रॉस सोसायटी करीत होती.


"डेल्टा-15‘मध्ये एक गर्भवती तरुणीही होती. तिची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले. तीन दिवस गावातील लोकांनी पाहुण्यांना गावभर फिरविले. बोटीमधून त्यांच्या सहली काढल्या. एकूण काय, गावाने पाहुण्यांना एकटे वाटू दिले नाही. आल्या प्रसंगाची झळ त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, याची दक्षता घेतली. 


तीन दिवसांनंतर पुन्हा वैमानिकाला संदेश आला. त्याला अमेरिकेला परतायची परवानगी मिळाली होती. प्रवासी विमानात चढू लागले, तसे गावकऱ्यांना व प्रवाशांनाही रडू आवरेना. तीन दिवसांत त्यांच्यात एवढा स्नेह निर्माण झाला होता, की आता स्वगृही जायचे असूनही प्रवाशांचा पाय निघत नव्हता.


एवढ्या लोकांच्या आदरातिथ्याचा ताण पडला, तरी त्याचा त्रास गावकऱ्यांना वाटला नव्हता. गावकऱ्यांनी सर्व खर्च आपसांत वाटून घेतला. अशा कठीण प्रसंगात आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो अशी सर्वांची भावना होती.


विमानात गेल्यानंतर एका प्रवाशाने वैमानिकाला सांगितले, की "मी जे बोलणार आहे ते आपल्या नियमात बसत नाही. मला माझ्या सहप्रवाशांशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. विशेष बाब म्हणून मला बोलण्याची परवानगी द्यावी.‘


सहसा वैमानिक अशी परवानगी देत नाहीत. परंतु तो प्रसंगच इतका हळवा होता, की वैमानिकालाही प्रवाशांच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. ती परिस्थितीच अशी होती, की वैमानिकाने त्या प्रवाशाला बोलायला मनाई केली नाही. 


प्रवासी म्हणाला, "या गावाने तीन दिवस आपली एवढी सेवा केली आणि आपल्याला एवढे सांभाळले, की मला वाटते आपण सर्वांनी त्यांचे कायम कृतज्ञ राहायला हवे. आपण सर्वांनी आपापल्या शक्तीनुसार काहीतरी पैशांची मदत माझ्याकडे द्यावी. मी एक निधी उभारणार आहे. त्यात हे पैसे टाकून या गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी, असे माझ्या मनात आहे. मी जो ट्रस्ट उघडणार आहे त्याचे नाव 'डेल्टा-15‘ हेच ठेवणार आहे."


बघता बघता एकेक प्रवासी पुढे आला. ज्याने त्याने यथाशक्ती जमेल तेवढी रक्कम त्या प्रवाशाकडे सुपूर्द केली. सर्व प्रवाशांकडून आलेली रक्कम मोजली असता, थोडे थोडके नव्हे, तर तब्बल चौदा हजार डॉलर जमले होते. ज्याने हा प्रस्ताव मांडला होता, तो स्वतः अतिश्रीमंत उद्योजक होता. त्याने आपल्या पदरचे तेवढेच पैसे त्या गंगाजळीत घातले. नंतर त्याने वैमानिकाच्या मदतीने ज्या डेल्टा कंपनीचे विमान होते, त्या कंपनीलाही भरघोस निधी देण्याची विनंती केली. विमान कंपनीचे विमानही वाचले होते आणि त्यातील प्रवासी सुखरूप होते. त्यांना काही इजा झाली असती, तर कंपनीला मोठी भरपाई द्यावी लागली असती. विमान अमेरिकेला सुखरूप परतल्यावर कंपनीनेही त्या दानशूराच्या रकमेत भरीव

निधी घातला.


'डेल्टा 15‘ हा ट्रस्ट सुरू झाला, तेव्हा त्यांच्याकडे चक्क दीड कोटी डॉलर गोळा झाले होते.


दरवर्षी ट्रस्टच्या वार्षिक अहवालात किती मुले ट्रस्टच्या पैशातून शिकली हे प्रसिद्ध होत गेले. ज्या लोकांनी ट्रस्टसाठी पैसे दिले होते, त्यांना कॅनडाच्या त्या गावात काढलेले तीन दिवस आठवले. ट्रस्टसाठी आपण दिलेल्या पैशांचे चीज झाले, असे त्यांना वाटले व ते समाधान पावले. कॅनडामधील ते छोटेसे गाव आनंदाने हरखून गेले. ट्रस्टच्या पैशांच्या मदतीने त्या गावातील अनेक मुले विविध क्षेत्रांतील नामवंत म्हणून प्रसिद्ध झाली. अशी ही 'डेल्टा-15‘ची हृदयस्पर्शी कहाणी.


आपल्याकडे असा काही आणीबाणीचा प्रसंग आला, की आलेल्या पाहुण्यांना कसे लुटले जाते, त्यांचा गैरफायदा कसा घेतला जातो, त्यांच्यासाठी दिलेली मदत दुसरीकडे कशी वळवली जाते, याच्या कथा आपण वर्तमानपत्रातून वाचतो आणि मनोमन दुःखी होतो. मग तो दुष्काळ असो, प्रलय असो अथवा दुसरे कुठले अस्मानी संकट असो. आपली मनोवृत्ती मदत करण्यापेक्षा लुटण्याकडे आहे, असे वारंवार सिद्ध होते.


'डेल्टा-15‘ची ही कहाणी कदाचित आपल्या देशातही असेच देशप्रेम जागृत करेल एवढीच अपेक्षा आहे



नीला सत्यनारायण यांचा दिनांक 7/04/2021 "सकाळ" मधला लेख.

बस कंडक्टर आणि म्हातारी

 आणि म्हातारी अमर झाली सत्य घटनेवर आधारित


रात्री बराच वेळ झाला होता. देवगडला जाणारी शेवटची बस वेळ होऊनही सुटत नव्हती. बस स्थानक तसे संपुर्ण रिकामे झाले होते. दोन चार प्रवाशी इकडे तिकडे रेंगाळत होते. या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की बस अजुन का सुटत नाही.


तेवढयात एकाने निरोप आणला की बसचे एक चाक पंक्चर आहे. तो काढला की गाडी सुटेल. बरोबर दहा वाजता बस निघाली. जवळ जवळ सर्वच प्रवाशी देवगडला जाणारे होते. एका हातात बोचके धरुन बसलेल्या म्हातारी जवळ मात्र जेव्हा वाहक तिकिट फाडण्यास आला तेव्हा रस्त्यावर कातवन फाटा असलेल्या व तेथुन तीन चार किलोमिटर दूर असलेल्या गावाचे तिकिट मागु लागली.


बस वाहक विचारात पडला. या म्हातारीचे वय झालेले, एकटीच उतरणारी, पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहचेल? 


तो थोडासा म्हातारीवर रागावलाच की, 'तु एकटी, तुला नीट दिसत नाही, चालता येत नाही, एवढा उशीर का केला ? लवकर उजेडात निघुन जायचे ना ?'


म्हातारीला नीट ऐकु पण येत नव्हते. काही तरी उत्तर तीने दिले. वाहकाने तिला त्या गावाचे तिकिट दिले व आपल्या स्थानावर येवुन बसला.


इतर प्रवाशी पेंगुळले होते. चालकाने दिवे बंद केले. वाहक मात्र म्हातारीचा विचार करीत होता. त्या फाट्यावर तर आपण तिला उतरुन देवु पण धड चालता न येणारी, व्यवस्थीत रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन चार किलोमीटर या पाणी पाऊसाच्या दिवसात घरी कशी पोहचेल ? रस्ता खाचखळग्यांनी व खड्डांनी भरलेला, मध्ये एखादा नाला वाहत असेल तर ? कुत्रे किंवा एखादया प्राण्याने या म्हातारीवर एकटे पाहुन हल्ला केला तर ?


तेवढयात म्हातारी उतरणार होती त्या गावचा फाटा आला. वाहकाने घंटी वाजविली. चालकाने बस थांबविली. 


वाहक उठला आजीबाईचे बोचके एका हातात व दुसऱ्या हातात तीचे बखोटे धरून तिला गाडीखाली उतरण्यास मदत केली. थोडा त्रागाही केला.

बाहेर डोळयांना काहीही दिसत नव्हते. त्याने ते बोचके डोक्यावर घेतले व म्हातारीचे परत बखोटे धरून चालायला लागला तो एकाच विचाराने की म्हातारीला एकटे न सोडता घरापर्यंत सुरक्षित घरी पोहचविणे.


म्हातारीलाही नवल वाटले. शक्य तेवढे ती ही त्याच्या पाऊलांबरोबर पाऊल टाकु लागली.


इकडे बस चालक व प्रवाशींची 'दहा पंधरा मिनिटे झाली हा वाहक गेला कुठे ?' अशी काव काव सुरु झाली. चालकाने बसखाली उतरुन बसला फेरी मारली की चक्कर वगैरे येवुन पडला की काय ? नंतर त्याच्या लक्षात आले की तो त्या म्हातारीला सोडायला गेला असेल. संताप झाला त्याचा. प्रवाशीही संताप करु लागले. अशा निर्जनस्थळी बस सोडुन हा निघुन गेला. काही म्हणाले 'चला हो, त्याला राहु द्या' वगैरे वगैरे.


इकडे म्हातारीने त्या वाहकाला विचारले, 'बा तुझे नांव काय रे ?'

'तुला काय करायचे आजी माझ्या नांवाशी... मी महादू वेंगुर्लेकर.'

'कोणत्या डेपोमध्ये आहे?'

वाहक- 'मालवण.'

आजी - 'मुलेबाळे?'

वाहक- 'आहेत दोन.'


तेवढयात आजीचे पडक्या अवस्थेतील जीर्ण घर आले. दोन चार कुत्रे भुंकत पळाले. वाहकाला म्हातारीने कुलुपाची किल्ली दिली. त्याने कुलुप उघडुन दिले व तसाच धावत पळत बसच्या दिशेने माघारी पळाला.


ती म्हातारी त्या घरात व गांवात एकटी राहत होती. तिला जवळचे म्हणुन कोणीच नातेवाईक नव्हते. तिच्यावर प्रेम करणारे चौकशी करणारे काळजी करणारे असे कोणीही तीच्या आजुबाजुला फिरकत नसे.


ती ही फारशी मग कोणाच्या जवळ जात नसे. कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तीला वाटायचे, हा स्वार्थी आहे. याचा माझ्या इस्टेटवर डोळा आहे. ते वयोमानानुसार तिला वाटणे स्वाभाविक व सहजही होते.

गांवा लगतच ज्याला ग्रामीण भाषेत पांढरी म्हणतात तसे चार बिघा शेताचे तुकडे तिच्या मालकीचे होते. ते दरवर्षी कोणास तरी पेरण्यास देऊन त्या मोबदल्यात पैसे घेवुन आपला उदरनिर्वाह करायची.


असेच एक दिवस म्हातारी थोडी जास्तच आजारी पडली. तिने गांवचे सरपंच व ग्रामसेवक यांना बोलाविणे पाठविले. त्यांनाही म्हातारीने असे अचानक का बोलाविले म्हणुन नवल वाटले.

ते घरी आले. म्हातारी उठुन बसली व त्यांना म्हणाली, "दादा कागद काढा. हे दोन अडीच तोळे सोने, माझी पांढरी व हे घर महादू वेंगुर्लेकर, कंडक्टर, याच्या नावावर लिहुन द्या व हे वीस हजार रुपये जमविले आहेत त्यातुन मी मेल्यावर क्रियाकर्म करा. मी जास्त दिवस काही जगणार नाही"

सरपंच व ग्रामसेवक अबोल झाले. काय भानगड आहे, कोण हा महादू वेंगुर्लेकर कंडक्टर ? त्याला सर्व म्हातारी का देतेय ? असेल काही नाते असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला.

दोन तीन दिवसात म्हातारी वारली. 


सरपंच व ग्रामसेवकाने तिच्या सांगितल्या प्रमाणे सर्व क्रियाकर्म पार पाडले. सर्व आटोपल्यावर मग त्यांनी महादू वेंगुर्लेकर कंडक्टरचा मालवण बस स्थानकावर शोध घेतला. त्याला भेटुन सर्व वृत्तांत सांगितला.


साधारण वर्षभरापूर्वीचाच बस मध्ये घडलेला प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सारे आठविले. म्हातारीने त्याच्यासाठी केलेले ऐकुन तर त्याला रडुच कोसळले.

त्याने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली. त्यांना नवलही व आनंदही वाटला. त्यांनी वाहकाला ठरल्या तारखेला त्या गांवी येण्याचे आमंत्रण दिले.


वाहक महादू वेंगुर्लेकर गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले. सरपंचाने त्यांच्या गळ्यात फुलाचा हार घातला. वाजतगाजत त्याला गांवाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेले. तेथे सर्वजन विराजमान झाल्यावर तो शेताचा व घराचा नावावर करण्याचा कागद व म्हातारीने दिलेले अडीच तोळे सोने त्याच्या समोर ठेवले.

महादू वेंगुर्लेकरच्या डोळ्यातुन अश्रुच्या धारा लागल्या. 


मी केलेल्या एका छोटयाश्या मदतीची म्हातारी एवढी किंमत देवुन गेली. त्याला काहीच सुचत नव्हते.


बाजुलाच मुलांचा गलका त्याला ऐकु येत होता. त्याने विचारले, 'येथे शेजारी हायस्कुल भरते का?'


सरपंचाने, 'हो, शाळेला स्वतःची जागा व इमारत नाही. त्यामुळे कातवन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तोडक्या मोडक्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात.' असे सांगितले.

वाहक म्हणाला,'का?गावठाणची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का कोनी देत शाळेसाठी?'


सरपंच म्हणाले, 'गांवठाणची जागा नाहीच व शेत देण्यास कोणीच तयार होत नाही.'


वाहक महादू वेंगुर्लेकर ताडकन खुर्चीवरुन उठले व टेबलावरील शेताचा कागद सरपंचाला देत म्हणाले, "हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत. हे घर पण विक्री करा. त्यातुन येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि हे सोने हे विकुन शाळेला छान दरवाजा बांधा व त्यावर म्हातारीचे सुंदर नांव टाका"

टाळ्यांचा कडकडाट झाला. सरपंच व ग्रामस्थ भारावुन गेले. "दरवाज्यालाच काय हायस्कुलला म्हातारीचे नांव देवु"


वाहक महादू वेंगुर्लेकर यांनी त्यांचे आभार मानुन निरोप घेतला. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे सारा गाव बघतच राहिला. 


झोळी फाटकी असुन सुद्धा गांवाचे सारे काही तो गांवालाच देवुन गेला होता व एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला.


एखाद्याला केलेली छोटीमोठी मदत कधीही वाया जात नाही. त्याच्या काळजात ती घर करुन जाते. समोरचा कृतघ्न झाला तरी चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडु नका.


माणसाने माणसांशी माणुसकीने वागावे हे विस्मृतीत जाऊ नये म्हणून अशा पोस्ट परत परत एक मेकांना पाठवत राहू.



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

लेखक :अज्ञात

Friday, April 30, 2021

जुन्या काळातील लग्न

 जुन्या काळातील लग्न


     लग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अमुक एक रुपया, तमूक तमूक दोन रुपये, अशा प्रकारे. ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल, त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून, मिळालेल्या सायकलवर ऐटीत  टांग टाकून आणि मिळालेले हॅंडो सँडो चे घड्याळ हातामध्ये सगळ्यांना दिसेल दिमाखात दाखवत, गावात पूर्ण फेरफटका मारायचा, त्यावेळेस त्याची शान काही औरच होती. आत्ताच्या नवरदेवांना त्याच्या शंभर पट मिळाले, तरी त्याची सर येणार नाही हे नक्की.


लग्नाच्या दोन दिवस अगोदर सर्वांसोबत बुंदी बनविण्यासाठी केलेले जागरण, किंवा लापशी वा भात बाजेवर टाकून नंतर वाढायला घेतांना अक्षरशः वापरलेले फावडे, पिण्यासाठी नदीवरून बैलगाडीने टिपाड भरून आणताना पूर्ण ओलेचिंब होणे, हे सर्व इतिहास जमा झालेय.


लग्नाआधी मुला-मुलीच्या वडिलांसोबत त्यांना घालावयाची आंघोळ, त्यानंतर सर्वांना आग्रहाने धरून आणून कपाळभर भरलेला  मळवट, त्यावरून लावलेली चमकी सगळे नव्या पिढीला पटणार देखील नाही.... कालाय तस्म..


"आली ईईईईई लग्नघटी समीप नवरा"  ... अशी आरोळी कानावर पडली की बूड झटकायला सुरुवात करायची. नंतर वाजवा रे वाजवा .... असे बामन म्हणला, की मंडपाच्या बांबूला पाठ लावून बसायचे ... जेणेकरून  "तदेव लग्नम सुजनम तदेव..  ताराबलम चंद्रबलम" ऐकायच्या आत मुठीत कोंबलेल्या रंगीत अक्षता नवरानवरीच्या अंगावर बचकन फेकून पायाला रुतणारे ढेकळ बाजूला करायचे .... पहिली पंगत !


गावातल्या लग्नात जेवायची ही गंमत ज्यांनी अनुभवली असेल, त्यांना कोणत्याही महागड्या हॉटेलात अजिबात मज्जा येणार नाही. तिकडे नवरा नवरी होमाभोवती गिरक्या मारे पर्यन्त पत्रावळी वाला पंगतीत फिरायला सुरुवात करतो । (पत्रावळी म्हणजे पळसाची पाच सहा पाने काड्यांनी शिवून बनवलेले ताट) या पत्रावळी निम्म्या तरी फाटलेल्या असत त्यामुळे दोन जोडून घ्याव्या लागत. पत्रावळी वाटणारी मंडळी विशेष क्रूर आणि निष्ठूर का असत कोण जाणे ! फाटलेली पत्रावळ बघून सुद्धा मुद्दाम दुसरी पत्रावळ देत नसत ... आणि जर दिलीच तर तीही एकदम तुकडा झालेली. जणू लग्न यांच्या घरचे असते, अशा थाटात तुच्छ कटाक्ष टाकून बघत.


पत्रावळ ढेकळांवर ठेवली की ती सरळ कधीही राहत नसे. त्यासाठी खाली ढेकळांची खास सेटिंग करावी लागे. कशीबशी पत्रावळ सेट केली, तर वारा येई आणि ही बया इकडेतिकडे उडू लागे. त्यासाठी एक वजनदार ढेकूळ पत्रावळीवर ठेवावा लागे. पत्रावळी स्थानापन्न झाल्या, की मीठ वाढणारा अतिशय घाईत असणारा येई आणि कुठल्याही भिंतीवर निर्लज्जपणे थुंकल्यासारखा बरोबर मध्यभागी मिठाची बचक सोडे. याना पत्रावळीला काठ असतात हे माहीत नसावे. त्याच्या मागोमाग बुंदी वाढणारे झांजपथक येते. जिथे मीठ वाढलंय त्यावर नेम धरून बुंदी वाढायची असा प्लान करून आलेले असत, दुष्ट साले. सगळी बुंदी खारट होऊन जाई.


मीठ आणि बुंदी कष्टपूर्वक वेगळे करेपर्यंत मोठया टोपलीत भात घेऊन दोघेजण पळत येत. दोघांच्या हातात भात वाढायला चहा प्यायच्या बशा असत. एकाच वेळी दोन पंगती वाढताना टांग्याला जुंपलेल्या बिगरखांदी बैलांसारखे शिवळा ताणत पुढे पुढे धावत. बुंदीच्या अंगावर सांडलेला भात बाजूला करेपर्यंत वरणाची बादली येई. वरण वाढणारी मंडळी बिनडोक असत. भाताचे कितीही छान आळे बनवले तरी तो वरण नावाचा द्रव आळ्याच्या बाहेर ओतायचा चंग बांधून आलेले असत. भाताचा कोथळा फोडून बाहेर वाहणारे वरण आवरता आवरता जेवणारा घामेघुम होऊन जाई.


वरणाची बादली पुढे सरकल्यावर मागून झणझणीत वांगं उसळीची बादली नाचत येते. उसळीत घुसवलेले वग्राळे तर्रर्रर्ररीसकट बाहेर येई आणि पत्रावळीवर उताणे होई. यामुळे नुकताच कालवून ठेवलेला वरणभात आणि निसून ठेवलेली बुंदी मिठाच्या ढिगाऱ्यासह ओलेचिंब होई.


काड्यांनी शिवलेल्या पत्रावळीने एव्हाना दम तोडलेला असे. तिच्या फटीमधून वरण आणि उसळीचा रस्सा ढेकळात झिरपू लागतो.... एखादा ओघळ पत्रावळीचे काठ ओलांडून थेट वाढणाऱ्याच्या पायांखाली लोटांगण घालतो.. त्यात जरका सोसाट्याचा वारा आला तर गम्मत नका विचारू...


शेताच्या बांधावरचा पाचोळा, घरामागच्या उकिरड्यावरची राख आणि नुकतीच कापून फेकलेल्या हरळीची पाने कालवलेल्या भातावर येऊन बसत. आता भातातून बुंदी निवडायची की हरळीची पाने या संभ्रमात असलेला जेवणारा "वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे" ही राकट, चिडलेल्या आवाजातली आरोळी ऐकतो आणि पहिली बुंदीची बचक तोंडात सारी.


बुंदी खाताना मंडपाच्या छताकडे बघायला लागे. त्यामुळे खाली पत्रावळीत गुपचूप येऊन पडलेली मणभर भाताची बशी बघायला चान्स नाही. मागून तिच्या अंगावर तुटून पडणारा वरणवाला सरकारी काम असल्यासारखा भडकन वरण ओतुन पळूनही जाई..


काही मिनिटातच पत्रावळीतून जसे पाणी खाली झिरपते, तसाच खालचा ढेकूळ पत्रावळीत झिरपून वर येऊ लागे. आधीच बुंदी आणि उसळीत रंगलेला भात ढेकळाच्या नामस्मरणात कधीच सावळा विठठल बने.... 


बाराचे लग्न अडीच ला लागलेले असते, त्यामुळे खाणारे पत्रावळीच्या दुर्दशेकडे न बघता एकामागे एक ढिगारे संपवत इतस्ततः पसरलेले मीठ बोटांवर चोळून पत्रावळीची घडी करत.. ती पुन्हा उडू नये म्हणून तिच्या बोकांडी मोठा ढेकूळ ठेवत आणि पाण्याच्या टँकरकडे धावत. एकाच पाईपला ठिबक सिंचनच्या दहा नळ्या जोडून चिखलात रुतलेला हा स्थितप्रज्ञ पाईप अर्धे पाणी खाली सांडवत असे...


पहाटे ५ वाजता भरून आणलेला थंड पाण्याचा टँकर एव्हाना अंघोळीच्या पाण्यासारखा गरम झालेला असे. प्लास्टिकच्या रंगीबेरंगी ग्लासातून दोन घोट पाणी पिऊन नवरा नवरीला आशीर्वाद देत लोक आल्या मार्गाला लागत..... येताना खिशात लपवलेला प्लास्टीकचा ग्लास म्हणजे त्यांना ऑस्कर पुरस्कार वाटत असावा...


२-५ रुपये आहेर केल्याच्या बदल्यात पोटभर धूळयुक्त जेवण आणि एक प्लास्टिकचा ग्लास..😊


 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  


टीप:  आपल्या सारख्या नव्या-जुन्या पिढीने..... हे सगळं अनुभवणं कदाचीत राहूनच गेलं... असेल.... किमान नवीन पीढ़ीला सेंड करा.... वारसा, वहीवाट, चालीरीती, इतिहास जिवंत राहील.!

Saturday, April 17, 2021

विद्वत्तेवर कधीच गर्व करू नये

       कालिदासांना ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली. 


कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे. 


वृद्ध स्त्री म्हणाली प्रवासी तर फक्त दोनच आहेत एक चंद्र 🌕आणि दुसरा सूर्य🌞 जे दिवस रात्र चालतच असतात. 


कालिदास म्हणाले मी  अतिथी आहे. पाणी मिळेल ? 


वृद्ध स्त्री म्हणाली अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत एक धन आणि दुसर तारुण्य ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ? 


कालिदास म्हणाले मी सहनशील आहे. आता तरी पाणी मिळेल ? 


वृद्ध स्त्री म्हणाली, 'अरे सहनशील तर तर फक्त दोनच आहेत ! एक धरती 🌍आणि दुसरं झाडं 🌵धरती जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचं देखील ओझं घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारला तरी ती मधुर फळच देतात.


कालिदास आता हतबल झाले,     


कालिदास म्हणाले मी खूप हट्टी आहे. 


वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, हट्टी तर फक्त दोनच आहेत एक नखं💅🏻ं आणि दुसरे केस, कितीही कापले तरी परत वाढतातच. 


कालिदास आता कंटाळले  आणि  


कालिदास म्हणाले मी मूर्ख आहे. 


वृद्ध स्त्री म्हणाली मूर्ख तर  फक्त दोनच आहेत एक राजा ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो आणि दुसरा दरबारातील पंडित जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.  


कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवणी करू लागले. 


वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज एकूण कालिदासांनी वर पाहिलं तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती, कालिदास आता नतमस्तक🙏👏👏 झाले. 


सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, स्नमान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले. 


तात्पर्य: विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका. वाचनात आलेला हा एक सुंदर लेख ! लिहिणाऱ्याचे आभार.🙏🙏


एक सत्य

 😊😊😊


८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो पण कुठलाच जीव उपाशी रहात नाही आणि माणुस पॆसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही ! ..


*🌷🌺रामकृष्णहरि 🌷*🙏🙏

Copy paste.

Saturday, February 20, 2021

इतिहासात एक असं वर्ष होऊन गेलं आहे जेव्हा एका वर्षातले ११ दिवस अचानक गायब करण्यात आले होते.

 येणारा नवीन दिवस चांगला असेल या आशेने आपण रोज नव्याने जगत असतो. पण, इतिहासात एक असं वर्ष होऊन गेलं आहे जेव्हा एका वर्षातले ११ दिवस अचानक गायब करण्यात आले होते.

हे वर्ष होतं १७५२ आणि महिना होता सप्टेंबर. हे खरंच घडलं आहे.



ब्रिटन, अमेरिका आणि इतर इंग्रजी देशातील लोक हे २ सप्टेंबर १७५२ रोजी झोपले आणि सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा तारीख होती १४ सप्टेंबर १७५२. त्या काळात लोकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. प्रत्येक गावात दंगली झाल्या होत्या.

त्या काळात आजच्या सारखा सोशल मीडिया तर नव्हता; नाही तर ही घटना किती तरी दिवस ट्रोल होत राहिली असती. यंदाच्या वर्षात अनेक महिन्यांच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे कदाचित आपल्याला हा ११ दिवस म्हणजे छोटा काळ वाटू शकतो.

पण, त्या काळात झालेला लोकांचा विरोध हा यासाठी होता की, त्या काळात जन्म झालेले, मृत्युमुखी पडलेले आणि लोकांनी त्या दरम्यान ठरवलेले लग्न यांची कुठेच नोंद होणार नव्हती.

कॅलेंडर मधून गायब झालेल्या या ११ दिवसांचा काळ हे खूप confusing होतं. त्यासोबतच, ब्रिटन सरकारने अजून एक बदल जाहीर केला होता. १७५२ च्या आधी नवीन वर्ष हे २५ मार्चपासून सुरू व्हायचं.

ते बदलून नवीन वर्ष आतापासून १ जानेवारी ला सुरू होईल आणि ३१ डिसेंबरला संपेल हा बदल सुद्धा त्याच वेळी जाहीर करण्यात आला होता. हे दोन्ही बदल एकाच वेळी लोकांना पचवायचे होते जे की सोपं नव्हतं.

नवीन कॅलेंडर नुसार एखाद्या व्यक्तीचं जर २६ एप्रिलला लग्न झालं असेल तर ती तारीख आता कोणती असेल? किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर २ फेब्रुवारी १७१० रोजी झाला असेल तर ती तारीख आता कोणती असेल?असे असंख्य प्रश्न लोकांना पडले होते.

अर्थात, कमी करण्यात आलेल्या या ११ दिवसांनी एक उत्तम रिवाज निर्माण केला आहे. भरपगारी रजा, म्हणजेच ‘पेड लिव्ह’ ही संकल्पना या सप्टेंबर महिन्यात अस्तित्वात आली आहे.

कारण १७५२मधील सप्टेंबर महिना केवळ १९ दिवसांचा होता आणि याकाळात कर्मचारी वर्गाला पूर्ण महिन्याचा म्हणजे ३० दिवसांचा पगार देण्यात आला.

म्हणजेच ११ दिवस काम न करता ‘पगारी सुट्टी’चा अनुभवच जणू काही या मंडळींनी घेतला…

हा सगळा घोळ काय आहे?

पारंपारिक पद्धतीने ज्युलियन कॅलेंडर वापरलं जायचं. ज्युलियन कॅलेंडर हे ज्युलियस सीझर यांच्याद्वारे ४६ B.C.मध्ये आमलात आणलं गेलं होतं. हे कॅलेंडर पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या प्रदक्षिणेनुसार तयार करण्यात आलं होतं.

ज्यामध्ये ३६५ दिवस कॅलेंडर आणि दर चार वर्षांनी येणारं लीप इयर हे मान्य करण्यात आलं होतं. या पद्धतीनुसार नवीन वर्ष हे २५ मार्च पासून सुरू होत असे.

कालांतराने असं लक्षात आलं की, ज्युलियन सिस्टीम मुळे सोलार वर्ष हे दर १३१ वर्षांनी १ दिवसाचा उशीर होत असे. हा फरक ४०० वर्षात ३ दिवसांचा पडत होता.

325 A.D. ते 1582 A.D. मध्ये हा फरक दहा दिवसांचा झाला होता.

जगातील सर्व प्रमुख देशांनी एकत्र येऊन हे मान्य केलं की, ज्युलियन सिस्टीम ही लीप इयरची मोजणी बरोबर करत नाही. दिवस मोजायची अजून एक पद्धत होती जी की पोप Gregory यांनी १५८२ मध्ये सुरू केली होती.

ही पद्धत इंग्लंड ला मान्य नव्हती. जो बदल जगातील इतर देशांनी ५ ऑक्टोबर १५८२ रोजी मान्य केला तो बदल इंग्लंड ला १७५२ च्या सप्टेंबर मध्ये मान्य करावाच लागला कारण दिवसांचं अंतर वाढून ११ दिवसांपर्यत वाढलं होतं.

चर्च ऑफ रोम ला असलेल्या विरोधामुळे हा बदल इंग्लंड ने आधी मान्य केला नव्हता. इंग्लंड सोडून इतर ब्रिटिश देशांनी हा बदल १०० वर्षा आधीच मान्य केला होता.

१५८२ ते १७५२ या काळात जॉर्जियन आणि ज्युलियन या दोन्ही प्रकारचे कॅलेंडर फॉलो केले जायचे. ज्यामुळे प्रचंड घोळ व्हायचे.



वंशावळ तयार करणाऱ्या व्यक्तींना इंग्लिश देशातील व्यक्तीची वंशपत्रिक तयार करताना १५८२ ते १७५२ या काळातील व्यक्तींची माहिती परत परत चेक करून घ्यावी लागायची.

तारीख लिहिताना त्या काळात O.S. (old style) आणि N.S. (New Style) या दोन पद्धती वापरल्या जायच्या. १७५१ च्या कॅलेंडर मध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत काही तारखा या रिपीट झाल्या होत्या.

१५८२ मध्ये बदल मान्य करणाऱ्या देशांमध्ये फ्रांस, इटली, पोलंड, पोर्तुगाल आणि स्पेन हे अग्रस्थानी होते. हा बदल सर्वात शेवटी मान्य करणारा ‘टर्की’ हा देश होता. त्यांनी हा बदल १९२७ मध्ये मान्य केला होता.

इंग्लंड मध्ये हा बदल घडवून आणण्यासाठी कॅलेंडर act पास करण्यात आला होता. या act ला The Calendar (New Style) Act 1750 हे नाव देण्यात आलं होतं.

या बदलामुळे १७५१ हे वर्ष फक्त २८२ दिवसांचं मान्य करण्यात आलं होतं. पण, हा बदल मान्य करणं गरजेचं होतं म्हणून २ सप्टेंबर १७५२ ला हा निर्णय घेण्यात आला होता.

विलियम होगार्थ यांनी त्यांच्या एका चित्राद्वारे “Give us 11 days” हा निषेध व्यक्त केला होता. १७५५ मध्ये काढलेलं हे पेंटिंग खूप गाजलं होतं. पण, या सर्व विरोधासमोर तत्कालीन ब्रिटन सरकार झुकलं नाही.