Tuesday, May 26, 2020

व. पु. ची एक भन्नाट कविता

व. पु. ची  एक भन्नाट कविता ---

माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं
आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत,
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं
घरादाराला कधीही ’लॉक'  नव्हतं..
*तरीही माझ जीवन सुखाचं होतं* ||१||

आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होतं
स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,
पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होतं
आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* ||२||

घरासमोर छोटंसं अंगण होतं
तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होतं,
दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होतं
विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ३ ||

आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा,
माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा-
दगडाने अंग घासणं फ़ारसं सुसह्य नव्हतं
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ४ ॥

पायात चप्पल असणं सक्तीच नव्हतं
अंडरपॅट बनियनवर फ़िरणं जगन्मान्य होतं
शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं
मोठ्यांना सायकलशिवाय दुसरं वाहन नव्हतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ५ ॥

शाळेत गुरुजनांप्रती आदर होता
घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता
छडी हे शिक्षकाचं लाडकं शस्त्र होतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ६ ॥

शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता,
नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता
कलांना "भिकेचे डोहाळे" असंच नाव होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ७ ॥

नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा
पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा,
शाळेचा युनिफोर्म थोरल्याकडूनच मिळायचा
तिन्हीसांजेला घरी परतणं सक्तीच होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ८ ||

वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या
पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा -
उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्य राज्य होतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ९ ||

पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे
घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे -
नॉनवेज खाणं हे तर माहितीच नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १० ||

शाळेत अभ्यासाला खूप महत्व होतं
नंबरावर बक्षीस/छड्या यांचं प्रमाण ठरत असतं,
कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हतं
वशिल्याने पास होणं माहितीच नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || ११ ||

गावची जत्रा  हीच एक करमणूक असायची -
चक्र-पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची,
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची
विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १२ ||

गावाबाहेरच जग हिरवागार असायचं
सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचं,
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं,
प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १३ ||

हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा
क्रिकेटच्या मॅचेस चाळीत व्हायच्या,
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या
डे-नाईट, ट्वेंटी- २० चं नावही नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १४ ||

प्रवास झालाच तर एस्टीनेच व्हायचा
गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
हॅन्डल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा
लक्झरी, फर्स्टक्लास एसीचं नावही नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १५ ||

दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी होती
चमनचिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात्र होती,
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती
लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होतं..
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १६ ||

जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची
बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
रेडीओ सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची
ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १७ ||

खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा
दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
पानात टाकणाऱ्याच्या पाठीत रट्टा बसायचा
हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १८ ||

मामाच्या गावाला कधी जाणं-येण होतं
धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होतं,
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होतं
भाऊबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || १९ ||

घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे
बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचं
प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || २० ||

पाव्हणे रावळे इ.चा घरात राबता असायचा
सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा
पंक्तीत श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं,
*तरीही माझं जीवन सुखाचं होतं* || २१ || 

आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लॅट आहे
मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे,
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दणदणाट आहे
फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
*कौटुंबिकसुसंवादाची मात्र वानवा आहे* || २२ ||

आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत
दूध, बूस्ट, काॅम्प्लानचा भरपूर मारा आहे,
क्लास, गाईड, कॅल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे
कपडे, युनिफोर्म क्रीडासाहित्य हवे तितके आहे,
*बालकांच्या नशिबी मात्र  पाळणाघर आहे* || २३ ||

आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे
सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
एक्स्ट्रा ऐक्टीविटीजना घरात सन्मान आहे
छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,
*आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे*||२४||

आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे
मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे
सध्या बाय वन गेट वनचा जमाना आहे..
म्हणून
*पैशांवर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे..*||२५||

     *🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*
चाक..



     प्रिया आणि समरच्या लग्नाला आता जवळजवळ तीन वर्ष होत आली होती. L0VE MARRIAGE च्या जमान्यात त्यांच ARRANGED MARRIAGE होत. सुरवातीला सगळं सुरळीत चालू होत. पण नंतर काही ना काही कारणामुळे खटके उडू लागले.

प्रिया बँक मध्ये कामाला होती तर समर एका परदेशी कंपनीत.

घरात सगळ्या सुख-सोई होत्या. नव्हता तो फक्त एकमेकांसाठीचा वेळ आणि एकमेकांना समजून घेण्याची समज.

भांडणाच कारण कधी गादीवर पडलेला ओला टॉवेल तर कधी किचनमध्ये सुरु राहिलेला पंखा.

आजकाल तर काहीही शुल्लक कारण पुरेसं होत होतं.

आज सकाळीही खिडकीवर विसरलेला कालचा चहाचा कप वादळ उठवून गेला.

दोघे एकमेकांशी तावातावने खूप भांडले नी काही न खाता उपाशी ऑफिसला निघून गेले.

आज नविन महिन्याचा पहिला आठवडा त्यामुळे ऑफिसमध्ये काम भरपूर असणार एखादे वेळेस लंचसाठी देखील वेळ मिळणार नाही हे.

प्रियाला माहित होत पण तरी देखील ती तशीच निघून आली.

आज ४ तारीख, म्हणजे दर महिन्याप्रमाणे आज पाटील आजी आजोबा पेंन्शन साठी बँकमध्ये येणार.

पाटील आजी आजोबा संपूर्ण बँकमध्ये कौतुकाचा विषय होता. दोघे जोडीने नेहमी येत, कडक इस्त्री केलेली कॉटनची साडी आणि तसाच कडक इस्त्रीचा कॉटनचा शर्ट.

दोघे सत्तरीच्या घरात होते, पण एकमेकांना खूप सांभाळत होते.

दरवेळी येताना बरोबर शबनम बॅग त्यात पाण्याची बाटली, छत्री, बिस्कीटचा पुडा आणि दोघांची डॉक्टरची फाईल न चुकता असे.

त्यांच्याकडे बघून प्रिया नेहमी विचार करत असे कि आपल्या नशिबात हे सुख का नाही.

नेहमीप्रमाणे आजोबांनी स्वतःचा फॉर्म भरला नी काउंटर वर दिला आणि आजीकडे तिचा फॉर्म घ्यायला वळले आणि नेहमी प्रमाणे आजी रिकामा फॉर्म घेऊन तशीच उभी होती.

'अगं काय हे, एक साधा फॉर्म भरता येत नाही तुला ? आणखी किती वर्ष माझ्याकडून भरून घेणार आहेस, आज शेवटचा भरतो आहे, पुढच्यावेळी तूच भर'.

'असू द्या ओ तुम्ही आहात ना, मग मी कशाला चिंता करू ?"' आजीचं गोड हसून उत्तर..

थोड्याफार प्रमाणात हा संवाद दर महिन्याचा होता.

आज काउंटरवर प्रिया होती, प्रियाच्या हातात फॉर्म देत 'बावळट आहेस' आजोबा पुटपुटले आणि आजी लाजली. 'इथेच थांब, मी मॅनेजरला भेटून येतो, जाऊ नकोस कुठे, हरवशील, वेंधळी आहेस तू' म्हणत आजोबा केबिन कडे गेले.

'आजी, अहो इतके बोलतात आजोबा तर शिकून घ्या ना फॉर्म भरायला, त्यात काहीच कठीण नाहीे' प्रिया वेळ काढण्यासाठी बोलली.

आजी हसली 'अग मला येतो भरता फॉर्म, पण मला तो येत नाही म्हणून ह्यांची होणारी ती प्रेमळ चिडचिड मला आवडते'.

'मी एकटी सगळं करू शकते, पण मी ते करू शकत नाही म्हणून हे जे जबाबदरीने करतात ते मला फार आवडत'.

'ह्या वयात आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो आणि मग ते स्वतःची काळजी घेतात मला ते हवं आहे'.

'संसारात दोघांनाही दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाऊन गाडी ओढायची असते" आजी गोड हसली.

कॅबिन मधून आजोबा बाहेर आले नी आजी त्यांच्या पाठीमागे चालू लागली.

दाराशी येत इथेच थांब मी रिक्षा घेऊन येतो म्हणून आजोबा निघाले नी आजी ने त्यांना मागून हाक मारून छत्री हातात दिली. सगळा प्रसंग गोड होता, 'किती प्रेम आहे ना आजींचे आजोबांवर' बाजूला बसलेल्या सरिताला प्रिया म्हणाली'.

अग दोघाचं बोल, आजीला उन्हाचा त्रास होतो म्हणून पाटील आजोबा तिला इथेच थांबवून चालत जाऊन रिक्षा आणतात, नेहमी बॅगमध्ये कोकम सरबताची बाटली घेऊन फिरतात, खूप काळजी घेतात ते एकमेकांची"
प्रियाला सकाळी घडलेला प्रसंग आठवला.

समरने काल लवकर आला तेव्हा दोघांसाठी चहा करून ठेवला होता आणि हे तो जेव्हा-जेव्हा लवकर यायचा तेव्हा-तेव्हा करत होता. आज समरशी शांतपणे बोलायचं प्रियाने ठरवलं.

तिने समरला फोन लावला "काही खाल्लस का ?' 'नाही गं आज एक महत्वाची मिटिंग आहे, तू काही खाल्लस का ? 'नाही, चल कामं होत राहतील काहीतरी खाऊन घे, उपाशी काम करत बसू नकोस, मीही ब्रेक घेते' संध्याकाळी जेवायला बाहेर जायचं ठरवून प्रियाने फोन ठेवला.

हळूहळू का होईना दोघांमध्ये वादाच्या जागी संवाद होऊ लागला, खटके उडत होते पण पूर्वीसारखं वातावरण नव्हतं.

ह्यात तीन-चार महिने गेले आणि आज पुन्हा सकाळी बेडवर ओला टॉवेल बघून प्रियाचा पारा चढला.

समरने सॉरी म्हणून टॉवेल उचलला पण तोपर्यंत प्रिया खूप चिडली होती "नोकर नाही मी इथे, नाही जमणार मला सारखं ऍडजस्ट करायला, इतका आळशी स्वभाव बरा नाही." रागारागात प्रियाने तयारी केली नी ती ऑफिसला निघून गेली.

काउंटर वर ती बसली होती आणि तिला दारातून पाटील आजोबा आत येतांना दिसले.

आज ते एकटेच होते आणि पेंन्शनचा दिवसही नव्हता. काहीतरी वेगळं काम असेल म्हणून प्रिया पुन्हा आपल्या कामात गुंतली.

शिपायाने, साहेबांनी आत बोलावलं आहे हा तिला निरोप दिला.

आत पाटील आजोबा बसले होते, "प्रिया पाटील आपल्या बँकचे सगळ्यांत जुने कस्टमर आहेत, त्यांना आज पर्सनली मदत कर, मी दुसऱ्या ब्रँच मध्ये चाललो आहे त्यामुळे Y0U CAN SIT HERE & HELP HIM WITH ALL THE F0RMALITIES' नायर साहेब निघून गेले.

'बोला आजोबा काय करायचं आहे". 'मला सावित्रीच अकाऊंट क्लोज करायच आहे, गेल्या आठवड्यात ती हार्टअटॅक नी घरी बसल्या जागी गेली'. कोणीतरी जोरात ओरडल्यावर जसं कान सुन्न होतात प्रियाच तसं झालं 'I AM S0RRY' च्या व्यतिरिक्त  ती काहीच बोलू शकली नाही. आजोबा बोलत होते "खूप काळजी घ्यायची माझी ती, सगळं वेळच्या वेळी, मी सुरुवाती पासून वेंधळा, पण ती प्रत्येक वेळी माझ्या चुका लपवायची माझ्या पाठीशी कायम उभी राहिली, तिला बहुतेक ती जाणार हे कळलं होतं, आज पर्यंत तिला कित्येक वेळा मी जेवण करण्यासाठी बाई ठेवू सुचवलं होत पण तिने कधीच ऐकलं नाही, पण एक १५ दिवसापूर्वी तिने जेवणासाठी बाई ठेवली तिला मला लागतं तसं जेवण शिकवलं, मी तिला चिडवलं देखील कि पाटलीनबाई आता बसल्याजागी ऑर्डर देणार"

आजोबांनी डोळ्याला रुमाल लावला, प्रियालाही रडू आवरलं नाही, F0RMALITIES पूर्ण करून आजोबा निघून गेले. प्रियाच लक्ष फोनकडे गेल, समरचा मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले होत होता .. 'सॉरी प्रिया मी आज पुन्हा टॉवेल विसरलो, I WILL TRY N0T T0 D0 IT AGAIN, पण यार तू त्यामुळे काही न खाता ऑफिसला जाऊ नकोस, I FEEL GUILTY, PLEASE D0N'T D0 THAT AGAIN. I HAVE BEEN PAMPERED, SP0ILED BRAT TILL DATE & I AM TRYING T0 CHANGE THAT, PLEASE GIVE ME TIME T0 CHANGE MYSELF, I PR0MISE I WILL CHANGE, I NEVER HAVE SAID THIS BEF0RE BUT I ALWAYS WANT Y0U IN MY LIFE, N0 0NE CAN UNDERSTAND MY M00D THE WAY Y0U D0, PLEASE'.

काहीवेळ प्रिया फोन कडे बघत राहिली आणि तिला पाटील आजीच वाक्य आठवलं 'आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो.' 'संसारात दोघांनाही दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाऊन गाडी ओढायची असते'

प्रियाने रिप्लाय सेंड केला..

'SORRY, I T00 L00SE MY C0NTR0L EVERY N0W & THEN, I WILL ALS0 TRY T0 W0RK 0N IT, Y0U T00 PLEASE GIVE ME TIME F0R THAT, I T00 ALWAYS WANT Y0U T0 BE THEIR IN MY LIFE, Y0U ARE MY ENTIRE SUPP0RT SYSTEM & WE B0TH WILL W0RK T0WARDS UNDER STANDING EACH 0THER'..

॥ तात्पर्य...॥

   तात्त्विक भांडण सर्वांशी होते, पण 'राग' कायम कुणाशीचं ठेवू नये.. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम 'भेद' ठेवू नये.. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात 'सुसंवाद' साधावा. 'अहंकार' हाच  या सर्वाचं मुळ आहे, तो विनाकारण  'बाळगुन जगू' नये..

      शेवटी 'मृत्यू' हे 'सुंदर शाश्वत वास्तव' आहे, त्याचे 'स्मरण' असावे भय नसावे.

आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर 'उरलेल्या" दिवसांचा 'आनंद' उपभोग घेण्यासाठी याचे 'स्मरण' ठेवू या.

       आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती 'जण आनंदात' आहेत याला खूप महत्व आहे.

    'एक हृदय' घेऊन आलोय जाताना 'लाखो हृदयात' जागा करुन जाता आलं पाहिजे क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या.. हो नं..!

Credit:-
आनंदयोगी....🙏🕉🙏
एकट्या स्त्रीने स्वतःला कसे वाचवायचे

1) रात्री उशिरा अति उंचीच्या अपार्टमेंटमध्ये लिफ्टमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत असताना एखाद्या स्त्रीने स्वतःला एक विचित्र पुरुषाच्या संगतीत एकट्याने सापडल्यास काय करावे?
          तज्ञांच्या मते: लिफ्टमध्ये आल्यानंतर……… जर आपल्याला 13 व्या मजल्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असेल तर, आपल्या मजल्यापर्यंत लिफ्टची सर्व बटणे दाबा.  प्रत्येक मजल्यावरील थांबलेल्या लिफ्टमध्ये कोणीही आपल्यावर हल्ला करण्याचे धाडस करणार नाही.

2) घरात एकटे असताना एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर काय करावे?????
          तज्ञांच्या मते: स्वयंपाकघरात पळा. मिरची पूड आणि हळद  कोठे ठेवली आहे हे आपणास माहित आहे आणि जेथे चाकू आणि प्लेट्स आहेत.  या सर्व गोष्टी प्राणघातक शस्त्रामध्ये बदलल्या जाऊ शकतात. काहीच नसल्यास प्लेट्स आणि भांडी सर्वत्र फेकणे सुरू करा. हे करणे थांबवू नका. किंचाळणे… लक्षात ठेवा की आवाज हा अशा लोकांचा सर्वात मोठा शत्रू आहे.  त्याला कोणालाही सापडायचे नसते.

 3) रात्री ऑटो किंवा टॅक्सी घेणे.
          तज्ञांच्या मते: रात्री ऑटोमध्ये जाण्यापूर्वी त्याचा नोंदणी क्रमांक नोंदवा. नंतर आपल्या कुटुंबास किंवा मित्राला कॉल करण्यासाठी मोबाइल वापरा आणि त्यांना ड्राईव्हरला ज्या भाषेने समजेल त्या भाषेत तपशील द्या.  जरी आपल्या कॉलला कोणी उत्तर दिले नाही तरी आपण संभाषणात असल्याचे भासवा.  आता ड्रायव्हरला माहित आहे की कोणाकडेतरी त्याचे तपशील आहेत आणि काही चुकल्यास तो गंभीर अडचणीत येईल.  तो आता तुम्हाला घरी सुरक्षित आणि सुरक्षीत घेण्यास बांधील आहे.  एक संभाव्य आक्रमणकर्ता आता आपला वास्तविक संरक्षक आहे.

4) जर ड्रायव्हर एखाद्या रस्त्यावर वळला आणि आपल्याला असे वाटते की आपण धोका क्षेत्रात प्रवेश करीत आहात…
          तज्ञांच्या मते: आपल्या गळ्याभोवती गुंडाळण्यासाठी आणि त्याला मागे खेचण्यासाठी तुमची पर्स किंवा ओढणी वापरा.  काही सेकंदात तो घाबरेल आणि असहाय्य होईल.  जर तुमच्याकडे पर्स नसेल किंवा चोरी केली असेल तर तुम्ही त्याला त्याच्या कॉलरद्वारे मागे खेचा.

 5) जर आपल्यास रात्री स्टोकिंग केले असेल तर…
          तज्ञांच्या मते: एखादे दुकान किंवा घराचा आसरा घ्या आणि आपली परिस्थिती स्पष्ट करा.  जर रात्रीची वेळ असेल आणि दुकाने उघडली नसेल तर एटीएम बॉक्स मध्ये जा.  एटीएम केंद्रांमध्ये नेहमीच CCTVअसतात.  ओळखीची भीती बाळगून, कोणीही आपल्यावर हल्ला करण्याची हिम्मत करणार नाही.

असं असलं तरी, मानसिकदृष्टय़ा जागरूक राहणे हे आपल्यापुढील महान शस्त्र आहे.

कृपया आपण ज्या स्त्रिया काळजी घेत आहात त्या सर्व स्त्रियांपर्यंत ती पसरवा आणि जागरूकता पसरवा कारण आपण सामाजिक आणि नैतिक कारणासाठी आणि आपल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे नक्कीच करू शकतो....

मित्रांनो कृपया ते आपल्या  MOMS… बहिणी… पत्नी आणि महिला मित्रांना नक्की पाठवा. हे दिलगीरी व्यक्त करणाऱ्या मित्रांपेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे.


 सर्व 🧕🏻महिला
                    
चुक आपली होती...


"ऐक ना...मला एका नोकरीचा कॉल आला आहे...चांगली कंपनी आहे..करू का जॉईन?"

अनुराधा च्या या वाक्याने गिरीश च्या चेहऱ्यावरचे भावच बदलले...

"हे बघ...स्रीस्वातंत्र्य, स्त्रीचं आर्थिक स्वातंत्र्य सगळं मान्य आहे मला...पण... नको करू नोकरी...प्लिज..."

"अरे पण का? नेमकं कारण काय?"

"माझी आई आज आपल्यात नाही...तीही शिक्षिका होती..नोकरी करायची...पण ती नोकरीला जात असल्याने आमचे खूप हाल झालेले गं... मला त्याची पुनरावृत्ती नकोय परत..."

"मला तर वाटलेलं की आई नोकरी करायच्या याचा अर्थ तू मला नाही रोखणार..."



"रोखलंही नसतं..पण विचार कर...तू आणि मी रोज बाहेर...यंत्रवत जीवन जगणार..घरात मुलांना वेळेवर सगळं कोण बघणार..मी म्हणत नाही तू दिवसभर घरकाम कर...पण घरात कोणीतरी घरातलं पूर्णवेळ असणं हे खूप मोठं समाधान देऊन जातं..."

"अरे आजकाल सगळेच तर करतात..."

"वाद नको...मी लहान असताना आई शाळेवर जायची...घराकडे पाहू वाटत नसे...अस्ताव्यस्त घर...वस्तू जागेवर सापडत नसायची..आईला कधी उशीर झाला तर आम्ही भूक भूक करत चिडचिड करायचो...बाबा आणि आम्हाला वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसे...आणि आईलाही किती कामं पुरायची... धावपळ व्हायची आईची...शाळेतून थकून आल्यावर बिचारी घर आवरे... तिचं थकणं आम्हाला बघू वाटायचं नाही..."

अनुराधा ला ते कुठेतरी पटलं..

"ठीक आहे...खरं आहे तुझं..मी नोकरी केली तर घराला घरपण राहणार नाही..."

"काय संबंध घर आणि नोकरीचा?"

मागून अचानक अनुराधा चे सासरे आले, त्यांनी सगळं बोलणं ऐकलं...

"गिरीश...चुकतोय तू...सुनबाई घराबाहेर पडतेय, नवं जग तिला समजेल...नवीन गोष्टी शिकेल... तिला अडवू नकोस..."

"पण बाबा...आई नोकरी करत असताना आपले झालेले हाल तुम्हाला आठवत नाहीये का? का पुन्हा ये रे माझ्या मागल्या?"

"चूक आईच्या नोकरीची नव्हती, ती आपली होती...आई नोकरी करते म्हणून आपण जरा तरी मदत करायचो का तिला? घरातल्या वस्तू आपण जागेवर ठेवत नव्हतो आणि चिडचिड मात्र तिच्यावर करायचो...चूक आईची नव्हती... चूक आपली होती..आपण स्वतःला शिस्त लावली नव्हती...घर आईनेच आवरावं...घरातलं एकेक काम फक्त तिनेच करावं... घर म्हणजे फक्त 'आई' अश्या समीकरणात आपण रहात होतो...आता बघ, अनुराधा जर नोकरीवर गेली तर आपणही स्वतःला शिस्त लावून घेऊ...प्रत्येकाने आपापली खोली साफ केली, आपापल्या खोलीला झाडू पोचा केला, जेवण झाल्यावर आपापलं ताट धुवून ठेवलं, मशीन मधले आपापले कपडे दोरीवर टाकले, आपापल्या वस्तू जागेवर ठेवल्या तर किती छान..एक तर आपल्याला चांगल्या सवयी लागतील.घरही स्वच्छ राहील आणि अनुराधाही बिनधास्तपणे नोकरी करू शकेल...बंटी ला स्वयंशिस्त लागेल...चार पदार्थ आपण शिकून घेऊ म्हणजे वेळ आली तर उपाशी राहणार नाही..."


"पटतंय बाबा..पण नोकरी करणं इतकं आवश्यक आहे का?"

"हो..आवश्यक आहे..तुझी आई नोकरी करत होती, जास्तीचे चार पैसे हातात पडत होते, त्याच जीवावर तुझं इंजिनिअरिंग करता आलं..तुझ्या आईला बाहेर पडल्यामुळे जगातल्या चार गोष्टी समजू लागल्या...त्याच तुम्हाला तिने शिकवल्या..म्हणूनच तुम्ही इतर मुलांपेक्षा स्मार्ट होतात..आईने तुमचा अभ्यासही घेतला आणि जगात कसं वावरावं याचे संस्कार दिले, म्हणून तुम्ही आज यश मिळवत आहात... मी जर तुझ्या आईला घरातच बसवून ठेवलं असतं तर...तू शिकलाही नसतास, आणि चार लोकांत बोलण्याची धिटाई तुझ्यात आलीही नसती..."

"बाबा...तुम्ही ग्रेट आहात...मी स्वतःला मॉडर्न म्हणवून घेत होतो पण तुमच्यासारखे आधुनिक विचार करण्याची माझी हिम्मत होत नव्हती..."



अनुराधा च्या डोळ्यात पाणी आलं..तिने चटकन सासऱ्यांचे पाय धरून आशीर्वाद घेतला..

आणि अशा प्रकारे सासरेबुवांनी दुसऱ्या एका रणरागिणीला उभं केलं...घर आणि नोकरी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी...
मृत्यू "वर  छान कविता..!



सजवत होते मला
मी शांत निजलो होतो..!
बहुतेक आसवांच्या धारेन
मी चिंब भिजलो होतो..!

शेवटची आंघोळ ती
होती गरम पाण्याची..!
ज्याला त्याला घाई
मला डोळे भरून पाहण्याची..!


ज्यांच्या खांद्यावर माझं
गेलं होत बालपण..!
त्यांनीच पुन्हा उचलून
घेतलं आज पण..!


जवळचे सारे होते
होतं कुणीतरी परकं..!
'न्हेऊ नका' मोठ्यानं
म्हणत होतं सारखं..!


आज वेगळंच
काहीतरी घडत होतं..!
वैऱ्याचं ही प्रेम
माझ्यावर पडत होतं..!


तिथपर्यंत नेऊन सुद्धा
माझ्यावर प्रेम लुटवत होते..!
जोरजोरात रडून
सगळे मला उठवत होते..!


अजून चार लाकडं द्या
म्हणजे तेवढ्यात भागेल..!
माझ्याच कुणीतरी विचारलं
अजून किती वेळ लागेल..!

सरणावर झोपूनही
मी मौन पाळलं होतं..!
जिव लावणाऱ्या माझ्यांनीच
मला जाळंल होतं..!


नशिबाला कुणाच्या हसू नये
नशिब कुणी विकत घेत नाही,
वेळेचे नेहमी भान ठेवावे
वाईट वेळ सांगून येत नाही !

बुद्धी कितीही तल्लख असली
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
बिरबल बुद्धीवान असला तरीही
राजा तो होऊ शकला नाही !

एक दुसर्‍यासाठी जगणे
याचेच नाव जीवन असते,
म्हणूनच वेळ त्यांना देणे
ज्यांचे तुमच्यावर प्रेम असते !

नाती तागडीत तोलू नये
पैश्याची ती गुलाम नसतात,
नात्यात फायदा बघू नये
ती तुम्हाला श्रीमंत करतात !

तुमच्याकडे मारुती असो वा BMW
रस्ते त्यांचे एकच असतात,
मनगटाला TITAN वा ROLEX असो
वेळ एकच दाखवत असतात !

मोबाईल APPLE असो वा SAMSUNG
तुम्हाला फोन करणारे बदलत नसतात,
Economy आणि Business Class
प्रवासाला वेळ सारखाच घेतात !

श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात
अर्धी श्रीमंती खर्चून जाते,
कमाई कमी जास्त असली तरी
जेवणात पोळी एकाच आकाराची असते !

🙏🏻🙏🏻🙏🏻 

पक्षी मरतांना कुठे जातात?



पक्षी मरतांना कुठे जातात?



आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन  कुठे आमच्या काँलनीच्या परिसरात मृतावस्थेत  पडलाय असे बघीतले नाही . किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही.

हां.. एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्‍याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षि आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही.

मग पक्षी काय अमर असतात का ? की त्यांना नैसर्गीक मरण यैतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दीले नाही.

अनेक पक्षी निरिक्षणांच्या साईट्स, पक्षीतज्ञांचे लेख सर्व काही शोधुन झाले पण कुठेही काही ठोस उत्तर मिळाले नाही.

आणि मग ह्या प्रयत्नातच एक रंजक लेख वाचायला मिळाला "Dying pattern of Birds"
ह्या लेखात काॅर्क बिशप ल्युसी  यांनी एक थोडी वादग्रस्त ठरु शकणारी थेअरी मांडलीय, लेखाची सुरवातच पक्षी मरण्यासाठी कुठे जातात अशी करुन बिशप ल्युसि ने सर्वांनाच  असे आव्हान दीलेय की कुणीही जगात नैसर्गीक मृत झालेल्या पक्षी पुरावा म्हणुन दाखवावा.  आजपर्यंत तरी त्याचे हे आव्हान कुणीहि स्विकारलेले नाही.

 लेखकाने मरण्याच्या कारणांची स्पष्ट वर्गवारी दीलिय, एकीकडे नैसर्गीक कारण दूसरीकडे शिकार, अपघात, मूद्दाम पक्षीहत्या अशी वेगळी कारणे. परंतु मजेची गोष्ट अशी की आजपर्यत तरी नैसर्गिक कारणाने मृत असा एकही पक्षी कुणी पुरावा म्हणून सादर करु शकले नाहीय,
पक्षी शास्त्रज्ञसुध्दा ह्या बाबतित ठोस सांगु शकत नाही. दरवर्षी पक्ष्यांची गणना करुन ते सरासरी पक्ष्यांचा मृत्युदर ठरवतात.
ह्या बिशप ल्युसींचा मधमाश्यांच्या जिवनक्रमावरचे संशोधन जगमान्य आहे, ते सांगतात मधमाशा मृत्यु समिप आला की खूप उंच वरच्या उच्च दबावाच्या हवेत स्वतःला घेउन जातात आणि तिथे दबावामुळे त्यांचे अक्षरशः नैसर्गीक विघटन होते आणि त्या नष्ट होउन जातात. यावरुन बीशप म्हणतात की पक्ष्यांना सुध्दा मधमाशाप्रमाणे अंतःप्रेरणेच एक इंद्रीय असावे जे त्यांना जाणीव करुन देते की आता शेवटचा क्षण आला आहे किंवा जिवनकाल संपत आलाय. आणि ही जाणिव हौताच पक्षि आकाशात स्वःतला उंच उंच घेउन जातात जो पर्यत त्यांचे विघटन होत नाही तो पर्यत ते वरती वरतीचचढत जातात. बीशप ची ही थेअरी मला तरी स्विकारार्ह वाटते  कारण दूसरे कुठलेच लाॅजिकल स्पष्टीकरण सध्या तरी नाही.
अजुनपर्यत तरी ह्या थेअरीला शास्त्रज्ञांकडुन कुठलेही खंडन झालेले नाही. ह्या एका गोष्टीवरुन आपण एक गोष्ट निश्चितच म्हणु शकतो की पक्षी मानवापेक्षा  उत्कांतीच्या पुढच्या पायरीवर आहेत की त्यांना ही जाणीव  होउ शकते की आपला अंत्यसमय आलाय जे माणसालाअजुनही अज्ञात आहे. पक्षी निश्चीत ठरवु शकतो की त्याने खूप जगुन झालेय,बघून झालेय आणि तो आनंदाने कसलिही खंत चिंता न बाळगता उंच उडून  शरीराचे  विघटन करुन टाकतो.न वयानूसार येणार्‍या व्याधी,न सोसायचे दुःख. आपल्या पेक्षा ते पुढेच आहेत कुठेही जाण्याचे, विहाराचे स्वातंत्र्य, कुठलीही सिमा नाही , पासपोर्ट नाही, पिल्ले मोठी झाली की त्यांच्यापासुन सहजगत्या स्वतःला सोडवुन परत कधीही न भेटणे सहज स्विकारणारी. आणि स्वतःच्या मृत्युची वेळ पण स्वतःच निश्चित करणारी... मोक्ष अजुन काय वेगळा असतो?

Thursday, May 21, 2020

Withdrawal होता आलं पाहीजे.....

Withdrawal होता आलं पाहीजे.....
    सहज, 'मैत्रिणीशी बोलतांना निघालेलं वाक्य'
     
साधं उदाहरण घ्या ना ....
      लग्न झाल्यावर मुलगी सासरी येते, ती कधीही माहेरच्यांना विसरू शकत नाही . नेहमीच तिचं मन आठवणीत रमलेलं असतं पण त्यासोबतच माहेरची अस्मिता आणि सासरची जबाबदारी पेलवावी लागते .
    कमी जास्त होणारच म्हणून प्रत्येक गोष्ट माहेरी सांगून संतूलन बिघडवायचं नसतं, तर माहेरी जे मिळालं ते इथे मिळेलच असे नाही म्हणून तुलना करून दुःखी व्हायच नसतं. तर थोडं- थोडं withdrawal व्हायचं असतं........     
   
   

              बऱ्याचदा आपल्याला खुप संधी मिळतात आपण स्वतःचा असा ग्रह करुन घेतो की माझ्या शिवाय दुसरं हे करू शकत नाही .
         अशीपण वेळ येते जेव्हा ती संधी दुसऱ्याला मिळते व आपण जळफडाट करतो पण आपण आपलं योगदान विसरून जातो, आपण केलेली कामगिरी विसरून स्वतःला केवळ त्रास करून घेतो ,आज आपण आहोत उद्या कोणीतरी असेल, बघुन स्वीकार करता आलं पाहीजे ...withdrawal होता आलं पाहिजे ..........
            कधी-कधी असेही असते आपण पात्रं असूनही बऱ्याच गोष्टी आपल्या वाट्याला येत नाही याचा अर्थ असा नाही की , आपण त्या व्यक्तीचा द्वेष करायचा,ज्याला ते मिळाले त्याचं कौतूक करता आलं पाहीजे .withdrawal होता आलं पाहीजे ......
    त्याची रेषा लहान करायची नसते तर आपली रेषा मोठी करायची असते .
           
     " गुंत्यात पडुन आयुष्य रंगहीन करण्यापेक्षा गुंता सोडवून उमेदीन जगता येणं फार कठीण नाही ."
     एखादया प्रसंगी आपल्याला कितीही बोलावसं वाटलं, राग व्यक्त करावासा वाटला तरी शांत राहायला जमल पाहीज, प्रत्येक वेळी बोलणचं महत्वाच नसतं तर Neutral पणं राहणं आलं पाहीजे.
     त्यासाठी थोडं थोडं withdrawal होता आलं पाहीजे.......
   आयुष्याचं प्रत्येक वळण खुप सुंदर आहे. त्या प्रत्येक वळणावर थोडं थांबता आलं पाहीजे , वयाचा प्रत्येक टप्पा भरभरून जगता आला पाहीजे तरच आपण आनंदी राहू.
       "आपलं व्यक्तीमत्व घडवणं आपल्याच हातात असतं" जगावे  असं की तुम्हाला बघून इतरांना तुमच्यासारख जगावं वाटेल, तुमच नाव निघताच तुम्हाला भेटायची, तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा होईल , तुम्हाला कुणाला सोडुन जायची ईच्छा होणार नाही.....
     आणि हो गेला तरी दुःख करत बसायचं नाही, काही नात्यांचं आयुष्यही तेवढचं असतं , पण त्यासाठी थोडं थोडंwithdrawal होता आलं पाहीजे........
       Connect होता आलं पाहीजे, अगदी मनापासून , शिकलं पाहीज, मिळणारे रिटर्न गिफ्ट पण खुप समाधान देणारे असते.
         "मला सांगा सुख म्हणजे काय असते?"चेहऱ्यावर आनंदी भाव असणे , सुंदर हास्य म्हणजे तुम्ही खुप सुखी किंवा आनंदी आहात असे नव्हे ,तर आनंदी भाव जगण्याचं बळ नक्कीच देतात.
      आयुष्यभर खुप वाचन करायचे implementation साठी वेळच ठेवायचा नाही,
       वाचन कमी असलं तरी चालेल ,कृतीत आणायला वेळ राखुन ठेवायला शिकता आलं पाहिजे. withdrawal होण म्हणजे राहून गेलेल्या गोष्टीसाठी वेळ देणं, स्वतः  जगण्यासाठी मुद्दाम सवड मिळविणे ......
      चला तर मग बघुया, जमतयं का तर!!!!
योग्य ठिकाणीच योग्य मूल्य आहे.

एके दिवशी वडील आपल्या मुलाला म्हणाले, "माझ्या आजोबांनी मला दिलेले हे घड्याळ आहे. हे जवळजवळ २०० वर्षे जुने आहे. मी ते तुला देतो, तु दागिन्यांच्या दुकानात जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे आणि ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पहा. "मुलगा दागिन्याचा दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला, आणि म्हणाला, "त्यांनी १५० रू ऑफर केले कारण ते फारच जुने आहे."  वडिल म्हणाले, "आता भंगाराच्या दुकानात जा."  मुलगा त्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येवून म्हणाला, "त्यांनी २० रू ऑफर केले कारण ते खूप खराब आहे. "वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात जायला सांगितलं. तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला.  "बाबा, क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्याच्या मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी ५ लाख रुपयांची ऑफर दिली." वडील शांतपणे स्मितहास्य करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचे होते की योग्य ठिकाणीच तुमच योग्य मूल्य आहे.

 स्वतःला चूकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य नसल्यास रागावू नका.

ज्यांना आपले मूल्य माहित आहे तेच आपली प्रशंसा करतात.

आपली किंमत जाणून घ्या, कारण हिऱ्याची किंमत फक्त जवाहिऱ्या करु शकतो इतर कुणीही नाही..
🌷🙏🌷

Friday, May 1, 2020

मित्रांनो जवळपास सर्वच देश आपल्या देशात काहीतरी उत्पादन घेतात आणि जगभरात निर्यात करतात.  पाकिस्तानात बनतात आणि त्या भारत  देशात आवडीने खाल्या जातात किंवा भरपूर खपतात सुद्धा. भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे पारंपारिक शत्रू असले तरी व्यापाराच्या बाबतीत सर्व संबंध बाजूला ठेऊन आपली आर्थिक परिस्थिती सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. ज्या देशाची निर्यात जास्त आणि आयात कमी त्या देशाची आर्थिक स्थिती चांगली मानली जाते.


  • सिमेंट :- भारत हा विकसनशील देश असल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी सिमेंट ची आयात केली जाते. मोठ्या मोठ्या इमारती, पूल, मेट्रो ची कामे, इंडस्ट्रीज सेटअप करण्यासाठी पाकिस्तानपेक्षा भारतातच सिमेंट चा वापर सर्वात जास्त केला जातो आणि हे सिमेंट आपल्याला पाकिस्तानातच निर्यात करतो आणि भरपूर नफा कमावतो. भारतातील कंपन्यांपेक्षा पाकिस्तानातील सिमेंट हे स्वस्त मिळते त्यामुळे कंपन्या पाकिस्तानच्या सिमेंटलाच जास्त पसंती देतात.

  • सैंधव मीठ :- सैंधव मीठ किंवा काळे मीठ आपण सर्वांनीच खाल्लं असेल. हे मीठ व्रत चालू असताना खाल्ले जाते. हे मीठ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले मानले जाते. सैंधव मीठ हे रक्तदाब, ऍनिमिया आणि पचनामध्येही फायदेशीर ठरते. हे सैंधव मीठ आपल्याला पाकिस्तानच निर्यात करतो.

  • चामडे :- चामड्याचा उपयोग भारतात भरपूर प्रमाणात केला जातो. चामड्याच्या बॅगा, कंबरेला लावायचा पट्टा, पाकिटं, जॅकेट ह्या सर्व गोष्टी चामड्याच्या बनतात. आपल्या देशात चामड्याचे उत्पादन भरपूर होते. पण काही प्रकारचे चामडे पाकिस्तानातून निर्यात केले जाते.

  • मुल्तानी माती :- मुल्तानी मातीच्या चेहेऱ्यावर होणाऱ्या वापराबद्दल सर्वांनाच माहिती आहे. मुल्तानी मातीचा उपयोग चेहेऱ्यावर तेज आणण्यासाठी केला जातो. सौंदर्यप्रसाधनांमध्ये केल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये मुल्तानी मातीचा वापर केला जातो जी पाकिस्तानातून निर्यात केली जाते आणि भारतात भरपूर आयात केली जाते.

  • सल्फर :- सल्फर चा उपयोग आरोग्यासाठी अनेक कारणांसाठी होतो. सर्वात जास्त ह्याचा उपयोग केसांच्या उत्पादनासाठी आणि त्वचेवरील फंगल इन्फेक्शन घालवण्यासाठी केला जातो. सल्फर च्या दगडाचा चुना आणि सिमेंट ची निर्यात सुद्धा पाकिस्तानातूनच होते.