Saturday, September 20, 2025

पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...

 पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...


टप्पा १:- १९५०  ते १९७५


या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती. 

सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३०  एकर जमिनीचे मालक... 

मोठे वाडे...  

दांडगा रुबाब... 

निसर्गावर चालणारी शेती... 

अगदी १० वी-१२ वी शिकलेले सुद्धा शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले. तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळावायचे. 

अनेक पदवीधर PSI, Dy. SP, तहसीलदार त्या काळात झाले. 

नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती...

उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती.

हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता. 


टप्पा २:- १९७५ ते १९९५ 


देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला, १९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली.

शेतीची विभागणी सुरु झाली, २० एकराचे मालक ५ एकरावर आले.

बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले.

शेती आता भांडवलदाराची होऊ लागली.

विहिरी, मोटारी, पाईप लाईन आल्या.

पाणी उपसण्याची स्पर्धा सुरु झाली.

राजकारण गावागावात घुसलं.

पुढारपणाच्या  नादात अनेकांनी जमीनी कवडी मोलाने विकल्या.

बाई-बाटलीत अनेकजण बरबाद झाले. 

स्पर्धा वाढली.

आता नोकरी सोपी राहिली नाही.


हायस्कुलवर नोकरीचा दर २० लाख झाला.

वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरवात झाली.

२० एकराचा मालक मोकळा झाला व गावच्या कट्ट्यावर विड्या फुकू लागला, पोरं बेकार फिरू लागली.


टप्पा ३:- १९९५ -२००९ 


हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ.

परराज्यातून मोठया प्रमाणात लोक आले.


मोठे उद्योग यांनी काबीज केले.

हॉटेल शेट्टी लोक, दूध, पेपर, भाजीपाला, टॅक्सी, पाणीपुरी, किरकोळ दुकानदारी आदि उत्तरेतील लोकांनी काबीज केली.

सहकारी कारखाने, बँका, पेट्रोल पम्प, बिअर बार, दारू दुकानें चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली.


मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडणे, बोअर मारणे, स्पर्धा परीक्षा तयारी करणे, भरतीला जाणे, पोराला हायस्कुल वर चिटकवणे ह्यातच गुंतलेला दिसला.

२० एकर जमीन वाटण्या होऊन, मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडतं नव्हते.

अजूनही पाटीलकी व  जमीनदारीच्या दिवा स्वप्नात रमला होता.


टप्पा ४:- २००९ ते २०२०  


ग्लोबलायझेशन झाले, जगाचे पैसे भारतात आले.

पुणे, मुंबई, इतर शहराजवळील जमिनींना किंमती  आल्या.

मग काय?

जमिनी विकायची स्पर्धाच सुरु झाली.

राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा 'मुळशी पॅटर्न' झाला.

जमीनदारी संपली, पोरं बेकार किंवा पुणे-मुंबईत ८-१० हजारांच्या नोकऱ्या करू लागली.

आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही.

खरी, बिकट गरिबी सुरु झाली.

पोरांचा वापर शंभर-दोनशे देऊन राजकारणात सुरु झाला.

बापाकडे लग्नाला पैसा नाही.

मग पोरी हात धरून पळून जाऊ लागल्या.

गावचा जमीनदार हमाली करू लागला.

व्यापारी तृतीय म्हणायचे त्यांचेकडेच हे बडे जमीनदार, त्यांची पोरं ही वॉचमन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर अश्या नोकऱ्या करू लागली व जयंती साजरी करणेसाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली.


टप्पा ५:- २०२० ते २०३०


इथून पुढील काळ फक्त पैश्याचा असेल.

ज्यांचेकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार.

नोकरी हा विषय संपला आहे.

नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल.

उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल.

पैसा न कामविणाऱ्याकडे एक गुंठासुद्धा शिल्लक राहणार नाही.

शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल.


अजून वेळ गेली नाही.

शेती सांभाळा शेती बरोबर जोडधंदे करा.

नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा.


जो चूक करतो तो माणूस,

तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस,

जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस.


अजुन वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्याच चुका पुन्हा होणार नाहीत हे पहाण्यासाठी.


आपल्या माणसाला साथ द्या,

आपल्या माणसाला मोठ करा.

आपल्या माणसाचे पाय ओढणे थांबवा.

आपणच आपल्या माणसाला साथ दिली पाहिजे.


(सत्य परिस्थितीवर आधारीत असलेला हा लेख सोशल मीडियावरून घेतलेला.)

दररोज लहान मुलांना घेऊन रामरक्षा म्हणावी..



रामरक्षां पठेत्प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम् । शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज: ॥४॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती । घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल: ॥५॥

जिव्हां विद्यानिधि: पातु कण्ठं भरतवंदित: । स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक: ॥६॥

करौ सीतापति: पातु हृदयं जामदग्न्यजित् । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय: ॥७॥

सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु: । ऊरू रघुत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत् ॥८॥

जानुनी सेतुकृत्पातु जङ्‌घे दशमुखान्तक: । पादौ बिभीषणश्रीद: पातु रामोSखिलं वपु: ॥९॥

एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठॆत् । स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥

हे श्लोक म्हणावे

 हे श्लोक म्हणताना त्या मुलाच्याअवयावर श्लोका प्रमाणे हाथ ठेवावे.. म्हणजे श्लोकात सांगितल्या प्रमाणे ती व्यक्ती त्या प्रमाणे त्या अवयवाचे रक्षण करते. 

वाईट नजरे पासून रक्षण होतं.

माझी आजी, आई हे श्लोक आम्ही भावंड लहान असताना म्हणतं असे.. मी देखील माझा मुलगा लहान असताना म्हणायचे..

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Friday, June 20, 2025

जुनी लोकं हुशार होती की नाही हेच कळत नाही!


जुनी लोकं हुशार होती की नाही हेच कळत नाही!

हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा  केळीच्या कमळातील, पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी स्लो किंवा हळू हळू निष्क्रिय होत जाते. त्यामुळे जुनी लोक केळीच्या पानावर जेवण घायचे कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर टाकले की तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा.

पण आज उलट झालंय प्लास्टिक व थर्मोकोल मुळे महा भयानक परिस्थिती ओढवत आहे, नाल्या जॅम होऊन पूर येत आहे. शहरी भागात खेडोपाडी लग्नात प्लास्टिक कोटिंग पत्रावळी, द्रोण मग त्यात गरम पदार्थ टाकल्याने ते पोटात अन्न द्वारे जाऊन कॅन्सर वाढवत आहेत.

कृपया वेळ आली आहे, "जूनं ते सोनं " आहे, हे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे सिद्ध झाले आहे.

केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात.
 
केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.
 
केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.

त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.
         
सगळ्याच भारतीय परंपरा टाकाऊ नसतात. किंबहुना भारतीय परंपरांमागे असलेला निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांकडे पाहू लागले आहेत. भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे. निसर्गपूजेतून निसर्गरक्षणाचा विचार त्यामागे आहे. आपल्या संस्कृतीत सूर्य, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती ही निसर्गाचं ‘दोहन’ करायला शिकवते;’शोषण’ नव्हे. उदा. आपण गाईचं दूध तेवढं काढून घेतो, पण गाईला मारून टाकत नाही. गाईलाच मारून टाकणं हे झालं ‘शोषण’ आणि गाय जिवंत ठेवून दूध, गोमुत्र आणि शेण आपल्या उपयोगासाठी घेणं म्हणज़े ‘दोहन’.

अशाप्रकारे निसर्गातील संसाधनांचा उपभोग घेताना त्यांची पुनर्भरण क्षमता अबाधित ठेवणं हे भारतीय परंपरांचं मूलतत्व आहे. गंमत अशी की, या परंपरा लोक केवळ परंपरा म्हणून वा धार्मिक भावनेने पाळत होते. त्यामागचं शास्त्र उमगलेलं नव्हतं. आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे शस्त्रीय कसोट्यांवर या परंपरांची उपयुक्तता पडताळून पाहणं आणि आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत त्यांचं महत्व पटवून देणं शक्य झालं आहे.

शिवाय, उपयुक्त परंपरा आणि निरूपयोगी परंपरा कोणत्या ते ओळखणंही शक्य झालं आहे. ‘केवळ परंपरा म्हणून नव्हे तर अमुक एक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे म्हणून ती करावी’ हा एक नवा विज्ञानवादी दृष्टीकोनही मिळाला आहे.
 
केळीच्या पानावर जेवणं ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते.

काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे तर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.
 
केळीच्या पानावर जेवण्याचे शरीराला होणारे फायदे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहेत. केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो जो नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो. जेवण जेवून झालं की पान गुरांना घातलं जातं. ते गुरांचंही अतिशय आवडीचं अन्न आहे. म्हणजे निसर्गाकडून वस्तू घेऊन उपयोग झाल्यावर ती निसर्गालाच परत द्यायची. यामुळे भांडी घासायचे श्रमही वाचतात, पाणीही वाचतं आणि भांडी घासायला साबण न वापरल्यामुळे घरगुती सांडपाण्याचं उत्सर्जनही कमी होतं. हल्ली कुठलाही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रम असल्यास सर्रास प्लास्टीकच्या वा थर्माकोलच्या डिश खाण्यासाठी वापरल्या जातात. खाऊन झाल्यावर या डिश कचर्‍यात फेकून दिल्या जातात. यामुळे किती कचरा वाढतो? केळीचं पान हा याला एक चांगला पर्याय आहे. ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. खेडेगावांमध्ये केळीची पानं घरच्या घरीच उपलब्ध होतात. शहरामध्ये ती विकत घ्यावी लागतात, पण उपलब्ध असतात.

शहराच्या आजुबाजूच्या केळी बागायती करणार्‍या शेतकर्‍यांना केळ्यांबरोबरच केळीची पानं विकणं हे एक चांगलं उदरनिर्वाहचं साधन होऊ शकतं. मुंबईत दादर आणि इतर काही रेल्वे स्टेशनांच्या बाहेर दहा रुपयांना चार वगैरे अशा किमतीत केळीची पानं मिळतात. त्यामुळे ती ‘महाग’ नक्कीच नाहीत. घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टीक डिश वापरण्यापेक्षा केळीची पानं वापरण्यात अशक्य काहीच नाही.

केरळ मध्ये जेवणासाठी  व जेवण पॅकींग साठी केळीच्या पानांचा वापर सुरू पण झाला आहे... पण आपण कधी सुधारणा करणार ? वेळ कुणासाठी थांबत नाही.

डॉ. कल्याणकर किरण, M.D. (ayu) आयुर्वेदिक, कॅन्सर तज्ञ.
स्वायु कॅन्सर केयर सेंटर.
श्री विश्व गणेश आयुर्वेद पंचकर्म खारघर नवी मुंबई.
(कॉपी पेस्ट)

Thursday, May 22, 2025

देवं चैवात्र पंचमम्



"अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् । विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ॥"

कुठल्याही कार्याच्या यशस्वी होण्यासाठी पाच गोष्टी आवश्यक असतात: एक म्हणजे अधिष्ठान (स्थान किंवा शरीर), दुसरा कर्ता (कर्म करणारी व्यक्ती), तिसरा करण (साधने, साधने किंवा उपकरणे), चौथा विविध प्रकारचे प्रयत्न किंवा क्रिया, आणि पाचवा व अंतिम म्हणजे दैव (दैवी इच्छा किंवा प्रारब्ध). भगवद्गीतेच्या या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की कोणतेही काम केवळ माणसाच्या प्रयत्नांवर अवलंबून नसते, तर त्यामध्ये इतरही अनेक घटक कार्यरत असतात. या सर्वांत शेवटचा घटक म्हणजे दैव, ज्यावर मानवाची सत्ता नसते. म्हणूनच आपण आपल्या कृतीचे परिणाम पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही; त्यात काहीतरी अदृश्य शक्ती (दैव) कार्यरत असते. हा श्लोक आपल्याला विनम्रतेचा, संयमाचा आणि कर्तृत्वाच्या मर्यादांचा विचार करण्यास प्रवृत्त करतो.

🙏🙏

Sunday, May 18, 2025

जिभेला कधीच सुरकुत्या पडत नाहीत.

जिभेला कधीच सुरकुत्या पडत नाहीत.
जीभेला चिरकाल यौवन प्राप्त झालेले आहे
माणूस हवा तेवढा वृध्द होवो, देहावर कितीही सुरकुत्या पडोत, डोळ्यांनी दिसत नसू दे, तरतरी नाश पावू दे, पण जीभ कधीच म्हातारी होत नाही.तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच टिकून राहतो ! 

जीभेचं रूप-स्वरूप बरंच लहान आहे, पण या लहानशा इंद्रीयावर विजय मिळवणं कठीणातलं कठीण काम आहे

 मुख-म्यानात राहणारी जीभ ही दुधारी तलवार आहे. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस चौकीदार बसविलेले आहेत. पण जीभ अशी जबरी आहे की, कालांतराने दातांनादेखील उखडून टाकते तशीच तोडूही शकते,

कुणाला ती घायाळ करते,
तर कुणाच्या जखमाही बुजवून टाकते.
तिच्यातून अमृत झरते,
तसेच हलाहल विषदेखील निर्माण होते.
जिभेची जमीन अशी विचित्र आहे की, तिथे फुले फुलतात तसेच काटेही उगवतात.

अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात. पण जिभेला असे यौवन प्राप्त झालेले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याशा जिभेवर ताबा मिळविणे हे दुष्कर काम आहे आणि जे लोक जिभेवर उत्तम ताबा मिळवू शकतात तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात.

🤫 कटु, पण त्रिकाल सत्य...

Tuesday, February 11, 2025

नकळत घडले ते

ऐका नं....


आम्ही पाचजणी पश्चिम महाराष्ट्रातील...बाळबोधी
घरातील मुली.घरातील वडीलधाऱ्या नी सांगितले
त्याच्या गळ्यात माळ घातली...मग सासुरवास
सहन केलेल्या....अशा टिपीकल काकू हं....

एक सुप्त इच्छा...आज सगळ्यांनी हाॅटेलमध्ये जायचे.मस्त चायनीज खायचे... खूप गप्पा ,धमाल
मस्ती करायची....भेटायचेच ठरले.
तशा आंम्ही फारशा हाॅटेलमध्ये गेलो नाही.
कधीतरी नवरा किंवा मुलाबरोबर...ते पण
मसाला डोसा,इडली असे साऊथ  इंडियन पदार्थ
खाल्ले असतील....पण चायनीज खायचे...ते पण
मैत्रिणींच्या बरोबर... आॅर्डर आपण करायची...
वेगळेच थ्रिल अनुभवायचे होते...

 मुलगा  एकदा बोलताना ऐकण्यात होते.
ते हाॅटेल....तिथे खास चायनीज मिळते..
तिथेच गेलो.

आता खरी गंमत सुरू.,..

आंम्ही सगळ्यांनी जीन्स...टाॅप...पायात शूज
अगदी पाॅश मध्थे तयार झालो...आम्ही काकू
असलो तरी सगळ्या ग्रॅज्यूएट,वर्किंग वुमेन
पूर्वीच्या हिराॅईन साधना,शबाना,वहिदा
अशाच हो आम्ही ..!!!!

हाॅटेल मध्ये आंम्ही **चिकन नुडल्स**
मागवले.....ते इतके प्रचंड आले...त्यातून
खूप आॅईली होते....या वयात अॅसिडिटीचा
त्रास....मग काकू लोकांनी...
** लॉंग आयलंड आईस  टी**
मागवला...
आता धमाल बघा....  यामध्ये virgin मागवले
असते तर ???.....पण,,,, इथे माहिती कुणाला????
आता त्या ** लॉंग आयलंड आईस टी *** मध्ये
व्होडका असते....हे काकूंना माहिती नाही...
काकू लोकांनी ते पिऊन घेतले..
आता मजा...
काकूंना आता नावेत बसल्यासारखे वाटायला
लागले.... खूप सुखद ,,अदभुत असे काहीतरी
वाटायला लागले....मग
सीमाकाकू रडायला लागल्या....त्यांना देवानंद
आवडायचा....पण आई-वडिलांनी त्यांना
चांगला नवरा नाही मिळवून दिला....वगैरे बोलायला
लागल्या.... थोड्याफार फरकाने प्रत्येकीचे हेच
दु:ख असल्याने सगळ्यांनी नवरे लोकांना
शिव्या घातल्या....आता त्या नावेतून विमानात
बसल्या...विमान टेक आॅफ झाले होते.....
वीणाकाकूंना  तिथे आलेली एक ख्रिश्चन स्री
त्यांच्या नवऱ्याची स्टेनोटायपिस्ट वाटली....त्यांनी
दंगा सुरू केला...त्या तिच्याशी भांडायला लागल्या.
तिच्या झिंज्या उपटल्या...नीताकाकूंना शम्मीकपूर
खूप आवडायचा...त्या " या...हूsss"चाहे कोयी मुझे
जंगली कहे...असे ओरडत होत्या...मी मनसोक्त
सासूबाई,नणंद यांना शिव्या घालत होते...
आता मॅनेजर आमच्या जवळ आला....
वेटरला विचारले..." तु काकूलोकांना काय दिलेस..???'
पण आॅर्डर काकू लोकांनी दिली होती....तो हतबल
झाला...

मग मॅनेजर माझा फोन उचलतो...त्यावर
My son...लिहिलेल्या आयकाॅनवर क्लीक करतो...
पलिकडून मुलगाच बोलत असतो... मॅनेजर घडलेला
प्रकार सांगतो....मुलगा धावत येतो....आधी बिल पे
करतो.... आमच्याकडे येतो....
मेंटल हॉस्पिटल बरे एवढी आमची अवस्था...
आंम्ही धडपडत मुलाच्या मदतीने ऊठत....
दारापर्यंत येतो....pull,,,push च्या गोंधळात
अडकतो.....मुलाला पण आवरत नव्हतो...
मग मॅनेजर ला  शिव्या घातल्या.....

मग मुलाने आम्हाला धरून कारमध्ये बसवले...
त्यातून काही काकू लोक पलिकडचे दार ऊघडून
बाहेर जात होत्या.तोंडाने अखंड बडबड....पण
मुलगा शांतच...त्याने काकू लोकांना परत कारमध्ये
बसवून दरवाजे लाॅक केले...
अशाप्रकारे बरगळत...कारण कोण काय बोलते
कुणालाच पत्ता नाही...अशा प्रकारे वरात घरी आली.

सुनबाई गुणाची हो ...तिने सगळ्यांना लिंबूपाणी दिले.
आणि झोपवले....

खूप वेळाने मी जागी झाले...डोके जाम जड झाले होते.
ऊठून बाहेर च्या खोलीत गेले...
पतीराजांनी हसत विचारले...
" काय मग विमान लॅड झाले का..???"
ते  व मुलगा जोरात हसायला लागले...
बोलले...तुझ्या मैत्रीणी घरी पोचल्या गं...त्यांना ऊबर
करून दिली....
मग
त्यांनी वरील सगळा प्रकार सांगितला....
आंम्ही सगळे जाम हसत होतो,.....
पण
एक थ्रील अनुभवले....नाहीतर काकू लोकांना
असले काही जमणार होय....जे आमच्याही
नकळत घडले ते...???
समाप्त.....

Credit:-

Unknown writer

Sunday, December 29, 2024

अधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी

  


१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !

२) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !

३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !

४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !

५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !

६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !

७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !

८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !

९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !

१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !

११) जागा लहान फ़र्निचर महान !

१२) उचलला मोबाईल लावला कानाला !

१३) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !

१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं 

१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !

१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी

१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !

१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !

१९) चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला

२०) आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा !

२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !

२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !

२५) सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना 

२६) वशिल्याच्या नोकरीला शिक्षण कशाला

२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले !

२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !

२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बराहोता !

३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता !

३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार !

३३)न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला!

३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !

३५) पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये !

३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !

३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही!

३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा !

३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल !

४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही !

४१) रिकामा माळी ढेकळ फोडी !

४२) घरोघरी मॉडर्न पोरी !

४३) ओठापेक्षा लिपस्टीक जड !

४४) नाकापेक्षा चष्मा जड !

४५) अपुर्या कपडयाला फॅशनचा आधार !

४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !

४७) गोष्ट एक चित्रपट अनेक !

४८) काम कमी फाईली फार!

४९) लाच घे पण जाच आवर !

५०) मंत्र्याच पोर गावाला घोर !

५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे !

५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !

५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !

५४) रिकामी मुलगी शृंगार करी!

५५) प्रेमात पडला हुंडयास मुकला !

५६) दुरुन पाहुणे साजरे !

५७) ऑफीसात प्यून शहाणा !

५८) सत्ता नको पण खैरनार आवर !

५९) एक ना धड भाराभर पक्ष !

६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !

६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !

६२) तोंडाला पदर गावाला गजर !

६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !

६४) रात्र थोडी डास फार !

६५) शिर सलामत तो रोज हजामत

६६) नेता छोठा कटआऊट मोठा !

६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!

६८) दैव देते आयकर नेत !

६९) डीग्री लहान वशिला महान!


* कॉपी पेस्ट...😀😀😀*