Saturday, April 29, 2023

कथा एका अजरामर गाण्याची

 जरी "सुन्या सुन्या" हे गाणे 'उंबरठा" चित्रपटातले असले तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच ते लिहिले होते.


जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत

होते आणि त्यांनी बाळासाहेबांना संगीतकार म्हणून

निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबांना सांगीतले कि

गीतकार तुम्ही निवडा.

बाळासाहेबांनी सुरेश भटांना मुंबईत बोलावून घेतले (ते

मुळचे नागपूरचे). त्यांना कथा वगैरे सांगून ४-५ गाणी लिहा असे सांगितले. त्यांना हॉटेल मध्ये राहायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले. १-२ दिवस गेले पण भट साहेबांनी एक हि गाणे लिहिले नाही. पंडितजींनी त्यांना विचारले तर ते म्हणाले "कुछ

सुझ नाही राहा है तो क्या लिखू!!!" ( ते बाळासाहेबांशी

नेहमी हिंदीत बोलत असत) ४ दिवस झाले पण नो

चेंज !!

जयश्री बाई थोड्या अस्वथ होवू लागल्या कारण हॉटेलचे बिल वाढतंय आणि चित्रपटाचे बजेट कमी. पण भट साहेब जैसे थे !!


७ दिवस झाल्यावर जयश्री बाई म्हणाल्या "मला नको

तुमचे हे भट साहेब. जावू द्या त्यांना परत नागपूरला "

बाळासाहेबांनी हे सांगितल्यावर भट साहेब थोडे नाराज

झाले पण म्हणाले "ठीक है, मेरा रेल्वे का टिकट दो, मैं निकलता हू" बाळासाहेबांनी त्यांचे तिकीट काढून आणून दिले रूम खाली केली, जयश्री बाई हॉटेल चे बिल भरू लागल्या

तेव्हा ते म्हणाले " आप मत भरो ये मेरा दोस्त है न बाळ, ये भरेगा मेरा बिल", बाळासाहेबांनी हॉटेलचा बिल भरलं आणि टक्सी

बोलाविली. टक्सीत बसल्यावर भट साहेबांनी अचानक पणे बाळासाहेबांकडे एक कागद मागितला. ते म्हणाले माझ्याकडे नाही. भट साहेब म्हणाले त्या हॉटेल

वाल्याकडून एक

बाळासाहेबांनी हॉटेलात परत जावून एक जुने बिल

आणले त्या बिलाच्या मागे भट साहेबांनी फक्त १५

सेकंदात एक गाणे लिहिले अगदी झरझर शब्द होते "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की

अजूनही चांद रात् आहे!!"


सगळी कडवी लिहून झाल्यावर त्यांना थोडे शांत वाटले.

त्यांनी तो कागद बाळासाहेबांकडे दिला. बाळासाहेब ती

कविता वाचून स्तब्ध झाले.

त्यांनी ती कविता लगेच जयश्री बाईना आणि धुरी साहेबाना दाखविली. जयश्री बाईच्या डोळ्यातून पाणी

वाहू लागले. त्यांनी १५००० रुपयांचा चेचक फाडून भट साहेबांच्या

हातात ठेवला पण भट साहेबांनी त्याचा स्वीकार केला

नाही. ते म्हणाले "यह मेरी अमानत है और मैं मेरी

अमानत कभी बेचता नही रखो आप इसे भट साहेब

तसेच निघून गेले.


पुढे जयश्री बाईचा तो चित्रपट काही बनला नाही आणि ते गाणे बाळासाहेबांकडे राहिले.

कालांतराने जब्बार पटेल यांनी "उंबरठा" हा चित्रपट

बनवायला घेतला. त्याचे संगीत बाळासाहेबांकडे दिले आणि गीते दिली भटांना. बाळासाहेबांनी भटांना हे गाणे दाखवले आणि त्यांना विचारले हे गाणे वापरू या का?" भट साहेब म्हणाले तुम्हारी इच्छा',


ते गाणे मग जब्बार पटेलांना ऐकवले आणि त्यांना पण

आवडले. फक्त त्यांनी एका शब्दावर आक्षेप घेतला. शब्द होते

"कळे न मी पाहते कुणाला कळे न हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे कुणीतरी आरश्यात आहे


पटेलांनी भटांना सांगितले की तो "कुणीतरी शब्द नको मला, कारण ती एक विवाहित स्त्री आहे (चित्रपटाची


नायिका) लोक काय म्हणतील?


परत गाडी अडकली. बाळासाहेबांनी २-३ शब्द सुचविले


पण त्यावर भट साहेब रागावून म्हणाले "तुम अपना काम करो, मेरे काम में दखल अंदाजी न करो.


रेकॉर्डिंग ची वेळ आली. भट साहेबाना शब्द सुचेना


आणि जब्बार पटेल तयार होईनात, चाल, सेटअप


आणि लता दीदी सगळे तयार होते.


इतक्यात शांता शेळके लता दीदींना भेटायला स्टुडिओ मध्ये आल्या त्यांनी थोडी चौकशी केल्यावर त्यांना कळले कि एका शब्दाची अडचण आहे. त्या लगेच


म्हणाल्या "अरे काय कठीण आहे त्यात. 'कुणीतरी "


ऐवजी "तुझे हसू घल. त्या क्षणाला सुरेश भटांनी वाह, शांता वाह" असे उदगार काढले. शांता बाईंचे ते शब्द गझलच्या त्या


ठेक्यात एकदम चपलख बसले.


कळे न मी पाहते कुणाला कळे न हा चेहरा कुणाचा


पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरश्यात आहे एका टेक मध्ये बाळासाहेबांनी आणि लता दिदींनी


ते गाणे रेकॉर्ड केले आणि अजरामर गाण्याचा जन्म

झाला


हे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर स्मिता पाटील लता दीदींच्या पायावर धाय मोकलून रडल्याची आठवण सुद्धा बाळासाहेबांनी सांगितली.


अशी उत्स्फूर्त कविता करणारा कवी महान, सहज शब्द सुचविणारी ती कवयित्री महान, अजरामर चाल आणि अजरामर आवाज. एका शब्दासाठी गाणे अडवून ठेवणारा तो दिग्दशर्क महान आणि पडदया वरची ती नायिका आणि तो नायक केवळ महान महान आणि

महानच.

Saturday, April 15, 2023

आरोग्यं धन संपदा

 डॉक्टरांच्या हातात रिपोर्ट होते. निदान झालं .... नॉन ALCOHOLIC लिव्हर सिरॉसिस .. व्यसनापासून हजारो हात लांब असलेला मी .. लिव्हर खराब झालं होतं.. फक्त ३ महिन्याचा अवधी ... मुलगा आणि मुलगी तयार झाली त्यांचं लिव्हर द्यायला. पण ... मुलीचा आणि माझा ब्लड ग्रुप match नाही झाला.... १ पर्याय संपला... मुलाची लिव्हर साईझ ३५ हवी होती .... ती फक्त २९ होती... (अश्या केस मध्ये donar १% सुद्धा कमी असता कामा नये) दुसरा पण पर्याय संपला.. मग सुरु झाला माझा प्रवास !

.

मीही एक डॉक्टर... डर्मीटोलॉजिस्ट... खर तर एक हजाम सुद्धा... डॉक्टरकी करता करता काहीतरी वेगळं करायचं आयुष्यात म्हणून लंडन ला जाऊन हेअर कट चा कोर्से केला. पुण्यात आल्यावर ८० एक ९० च्या दशकातील पुरुष्यांसाठी भारतातील पाहिलं Beauty parlour सुरु केलं. लोकांनी वेड्यात काढलं. पुरुषांसाठी palour हि संकल्पनाच त्यावेळी लोकांच्या पचनी पडत नव्हती. हळू हळू लोक केस कापायला का असेना यायला लागले ... बघता बघता एकाच्या दोन ..दोनाच्या चार अशा ११ शाखा भारतात् चालू केल्या... अनेकांना रोजगार मिळाला... क्लिनिक ... palour वेळ पुरेनासा झाला. 

...

पण .... पण नियतीला कुठेतरी हे मान्य नव्हतं .. म्हणूनच तर लिव्हर खराब होणे यासारखा भयंकर आजार मला झाला. वाटलं ... मीच / मलाच का ??? पण ,,, कुणीतरी दाता आपल्याला लिव्हर देईल .... याची वाट पाहण्याशिवाय माझ्या हातात काहीच उरल नव्हतं (डॉक्टर असूनही) वेळ कमी होता फक्त ३ महिने .... २ महिने होऊन गेले... तिसरा महिना उजाडला. या केस मध्ये हातापायाच्या काड्या झाल्या होत्या, जलोदर झालं होत (पोटात ३२ लिटर  पाणी होत) वाटू लागलं आपला प्रवास संपला. 

...

पण इथेही नियतीने तिची किमया दाखवली. एका accident मध्ये ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच लिव्हर मला देण्याचा निर्णय झाला. ८ ते १० अतिशय हुशार ... जगातल्या मोठं मोठ्या युनिव्हर्सिटी मधून शिकून आलेले ... ध्यासाने झपाटलेले डॉक्टर .. ५.३० तासांच्या अथक प्रयत्नांनी ( लिव्हर ट्रान्सप्लांट करणे हे कमीत कमी २४ तासांचे operation ... आणि कमीत कमी २५ रक्ताच्या बाटल्या लागतात हे आधी वर्ल्ड रेकॉर्ड होत) यशस्वी झालं तेही एकही रक्ताचा थेंबही न देता. 

..

खर तर आपल्या डोळ्यात कचरा जरी गेला (Foreign Body) तरी आपलं शरीर तो कचरा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असते. इथे शरीरात एक (Foreign Body) लिव्हर बसवल होत. शरीर ती Foreign Body बाहेर फेकण्याच्या प्रयत्नात असते, म्हणून जोपर्यंत शरीर ते accept करत नाही तोपर्यंत शरीराची संपूर्ण प्रतिकारशक्ती निकामी केली जाते. 

...

त्याच काळात बाकी कसलं इन्फेकशन झालं तरी तेहीं शरीराला कळत नाही म्हणून घरात बायको आणि मूलं ... जेवायला देतानाही मास्क. हँडग्लोव्हस ... संपूर्ण steralize होऊन येत, दिवसाला ४२ गोळ्या. डॉक्टरांना थोडासा व्यायाम सुरु करू का विचारलं... पोटावर फक्त १०४ टाके होते म्हणून त्यांनी नकार दिला. 

...

पण मी हट्ट केला तर ... सायकलिंग करू शकता म्हणाले. थोडं थोडं बागेत जाऊन सायकलिंग सुरु केलं. तीथेच एक सायकलिंग करणारा ग्रुप भेटला. १ वर्ष गेलं. पुणे एक गोवा अशी सायकलिंगची स्पर्धा होती. ३१ तासाच्या आत ६०० किमी अंतर कापायचे होते. मी म्हणालो मला घ्यायचा आहे सहभाग. माझा विश्वास पाहून एक महिला आणि एक तरुण मुलगा तयार झाले. ६०० किमी चे अंतर . त्यात मी १८३ किमी चे अंतर सायकलिंग केले. 

...

आज चार वर्ष झाली. योग्य आहार, व्यायाम आणि सर्वात महत्वाचे इच्छाशक्ती.... हि त्रिसूत्री कधीच नाही सोडली. पुन्हा जोमाने कामाला लागलो. माझं क्लिनिक आणि माझं passion असलेलं Parlour .... पुन्हा ४ शाखा पुण्यात सुरु केल्या. papillon mens parlour हे नाव पुन्हा पॉप्युलर झालं. पण हे सगळं पुन्हा करताना घरच जेवण ... ५० मिनिटे उकळलेलं पाणी .. आणि खूप सारी पथ्ये !

..

माझ्याकडे आज खूप पैसा आहे. पण पैसा असूनही जगात कुठेच अस शॉप नाही जिथून मी हृदय, किडनी, फुफ्फुस, हात, पाय विकत घेईल. माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे खूप श्रीमंत आणि नशीबवान आहात. निसर्गाने दिलेले सगळे अवयव तुमच्याकडे आहेत. त्याची काळजी घ्या. व्यसन करून छातीच खोक करून घेऊ नका. कुणीतरी अज्ञात (गव्हरमेंट कायद्यानुसार अवयव देणारा आणि घेणारा हे कधीच कुणाला कळत नाही) माणसाच्या घरच्यांच्या अवयव दानाच्या योग्य निर्णयामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे. मरणाच्या पश्चात कर्मकांडात अडकून शरीराची माती होण्यापेक्षा हृदय, किडनी, फुफ्फुस, डोळे इ. दान करून कुणालातरी जीवदान द्या.

...

*ही छोटी गोष्ट आहे पॅपिलॉन नावाने जेंट्स पार्लर सुरु करणा-या डॉ. विनय कोपरकर यांची* ... *यातून काय घ्यायचं हे आपलं आपणच ठरवुया..*

🙏🏻🙏🏻👍🏻

Cp

Thursday, January 19, 2023

मिलेटस्/Millets म्हणजे काय

 मिलेटस्/Millets म्हणजे काय?

        मिलेटस् म्हणजे भरडधान्ये वा तृणधान्ये, ज्याला इंग्रजी भाषेत Millets वा small seeded grass असे म्हणतात. Millets म्हणजे मोटा अनाज. या Millets ला Nutricereals वा Superfood असे म्हटले जाते.

       मिलेटस् चा इतिहास 5000 ते 6000 वर्षे पूर्वीपासूनचा आहे. आपल्याला भरडधान्ये म्हटले की लगेचच फक्त दोन धान्ये डोळ्यासमोर येतात , ती म्हणजे गहू (wheat) आणि तांदूळ (paddy rice). त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज होती , त्याला अनुसरून पहिली हरितक्रांती घडविण्यात आली , गव्हाचे तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ लागले, वेगवेगळ्या जाती वाण आणले गेले अन् देशाची पोटाची भूक भागविण्यात आली. परंतु परिणामी आपली आरोग्यदायी भरडधान्ये तृणधान्ये या हरितक्रांतीच्या धबगड्यात वेगाने बाजूला फेकली गेली. तसेच हि भरडधान्ये म्हणजे डोंगर कड्याकपारीत राहणाऱ्या गरीब लोकांचे अन्न म्हणून हिणवले गेले आणि आपल्या सारख्या लोकांच्या जेवणाच्या थाळीतील खाण्याची जागा घेतली गव्हाच्या चपाती पोळीने मैदा पाव बिसकुटाने तांदळाच्या भाताने अन् इथूनच आरोग्याच्या समस्यांचे दुष्टचक्र सुरू झाले. तत्कालीन सरकार व प्रशासन शास्त्रज्ञ यांच्यासमोर भल्यामोठ्या लोकसंख्येला पोटाला अन्न देणे हे महत्त्वाचे होते अन् ती तत्कालीन प्राथमिकता होती.

       आता आपले डोळे उघडले आहेत, आता आपण परत आपल्या पन्नास वर्षापूर्वीच्या अन्नाकडे वळायचे आहे आणि परत आपल्याला पूर्वीच्या प्रमाणे सुदृढ व्हायचे आहे , जैवसाखळी/ Biodiversity निर्माण करायची आहे.

मिलेटस् प्रोत्साहन, मानवी आरोग्य व्यवस्थापन अन्  जैवसाखळी/Biodiversity पुनर्रस्थापना, पर्यावरण,अर्थकारण यामध्ये मिलेटस् ची भूमिका काय हे समजून घेऊया.

--  संपूर्ण देशभर असणारी दुष्काळी परिस्थिती व शेतीच्या पाण्याची उपलब्धता पाहता हे भरडधान्ये पीक कुठेही येऊ शकते अगदी एकदोन पाण्यामध्ये वा फक्त पावसाच्या पाण्यावर सुद्धा , खते औषधे किटकनाशके रसायने लागत नाहीत म्हणजे पर्यावरणप्रिय शेती असे समजूया. मिलेटस् /भरडधान्ये शेती म्हणजे जंगल फार्मिंग/naturally grown & minimum care crops अर्थात कसलीही इनपुटस न देता, अगदी तीनचार महिन्यात छान पीक काढणीस तयार होते. म्हणजे अल्प भांडवल ,उत्तम आरोग्यदायी अन्न, जनावरांना चारा असा चौफेर फायदा.

     1 किलो गहू तयार करण्यासाठी 10,00 लिटर पाणी लागते, 1 किलो तांदूळ (paddy rice) तयार करण्यासाठी 8000 ते 9000 लिटर पाणी लागते. परंतु 1 किलो मिलेटस् /भरडधान्ये तयार करण्यासाठी फक्त 200 लिटर पाणी लागते , म्हणजे मिलेटस् च्या तुलनेने गव्हाला तांदळाला जवळजवळ चाळीस ते पन्नास पट पाणी लागते. तसेच 1 किलो गहू तांदूळ मध्ये चार लोक पोट भरू शकतात परंतु 1 किलो भरडधान्ये/मिलेट मध्ये बारा लोक पोट भरू शकतात , म्हणजे तुम्ही तुलना करा किती मोठी फुड सेक्युरीटी आपण निर्माण करू शकतो, आता यामागील अर्थकारण पाहुया. साधारणपणे 80 ते 150 रूपये किलो ह्या दराने बाजारात मिलेट/भरडधान्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत, म्हणजे यातून शेतकऱ्यांचे फार मोठे अर्थकारण साधता येणार आहे. 

वेगवेगळी मिलेटस्/भरडधान्ये अन् त्यांचे आरोग्यदायी फायदे

       गहू आणि तांदूळ(paddy rice) यामध्ये ग्लुटेन नावाचे एक प्रोटिन असते, जे पचायला जड असते, ज्यामुळे डायबिटीस व लठ्ठपणा वा इतर आजार बळावले जातात. 


आता मिलेटस् /भरडधान्येच का खायची:-- कारण त्यामध्ये ग्लुटेन नसते, हे गहू तांदूळ मध्ये असणारे ग्लुटेन निरनिराळ्या आजारांना रोगांना आमंत्रण देते. भरडधान्यात असणारे मुबलक फायबर्स पोट साफ करण्यासाठी मदत करतात , जेणेकरून पोटाचे विकार दूर होतात , कारण बहुतेक आजारांचे मूळ कारण पोट साफ न होणे हे आहे. परिणामी डायबिटीस लठ्ठपणा रक्तदाब कैंसर सांधेदुखी वा इतर विविध शारीरिक विकार. हे आजार विकार दूर करण्यासाठी  मिलेटस् फारच हमखास गुणकारी आहेत.

    मिलेटस् ग्लुटेन फ्री फुड आहे, सध्या सर्वञ चर्चा आहे ना ते हेच , म्हणजेच भरडधान्ये आपण आहारात समाविष्ट केल्याने हे जीवनशैलीचे आजार विकार रोग आपण सहज टाळू शकतो , Industrial food काय कामाचे हे आपण स्वतःला विचारणार आहोत का नाही. 


मिलेटस् / भरडधान्ये खालीलप्रमाणे

1) ज्वारी/ Sorghum millet - प्रकृतीने थंड , उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी खावी, Glutein free, भाकरी लाह्या पोहे बनवून खाऊ शकतो. 


2) बाजरी/ Pearl Millet -- उष्ण प्रकृतीचे ,बाजरीची भाकरी  हिवाळ्यात खावी. कैल्शियम आयर्न मुबलक , गरोदर माता स्तनदा माता यांनी जरूर बाजरी खावी , फायबर्स खूपच असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. 


3) नाचणी/ रागी / Finger Millets - नाचणीला Nutrients Powerhouse असे म्हणतात. नाचणीचे दूधही/Ragi milk तयार करता येते आणि ते खूप पौष्टिक असते 


4) राळे वा कांगराळे/ Foxtail millet - राळ्याचा भात खिचडी पोहे असे पदार्थ बनतात. मेंदू आजार विकार , गरोदर मातांच्यासाठी खूप चांगले ,अस्थिरोग/हाडांचे रोग व विकार , स्पाईन/मज्जारज्जू संदर्भातील आजार विकार यात फायदेशीर 


5) वरी वा वरीचे तांदूळ वा भगर / Barnyard Millet  - उपवासासाठी, अल्प उष्मांक अन्न / low calorie food, कैल्शियम आयर्न खूप जास्त प्रमाणात , फायबर्स खूप जास्त म्हणजे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर,लिव्हर किडनी पित्ताशय/gall bladder आजारात फायदेशीर , endocrine glands functioning मध्ये महत्त्वाचा रोल व शुद्धिकरणासाठी 


6) कुटकी /Little millets - डायबिटीस, थायरौईड ,नपुंसकता ह्या विकारात फायदेशीर , कुटकीचा भात पोहे पापड बनतात. 


7) हिरवी कांगणी/ Browntop millets/ Green millets - हिरव्या कांगणीत सर्वाधिक 12.5 % फायबर्स असतात , मुळव्याध पाईल्स अल्सर मध्ये जादुई परिणाम , मज्जारज्जूचे विकार आजार ,ह्या ब्राऊन टोप मिलेटची लापशी फारच छान बनते. spine disorders & diseases मध्ये फायदेशीर, 


8) कोदरा / Kodo millets/ Himalayan millet- 

पंजाब मध्ये पूर्वी खूप खात होते, शीख धर्मगुरू गुरूनानकजी कोद्र्याचा भात भाकरी साग खात होते, आता बोटावर मोजण्याइतकी शेती केली जातेय कोद्र्याची पंजाब मध्ये ,रक्त शुद्धिकरण, हाडीताप(fever), Bone marrow disorders मध्ये फायदेशीर ( अस्थिमज्जा आजार विकार), मंदाग्नी प्रदिप्त करतो म्हणजे पोटात पाचकरस digestive enzymes वाढवतो भूक वाढवतो. 


9) राजगीरा/ Sudo millets/ Amaranthus - राजगीरा चे लाडू, वडी , राजगीरा दूधात टाकून खाल्ला जातो, लहान मुलांना फार पौष्टिक 


  गहू तांदूळ(Paddy) आणि भरडधान्ये यांत मूलभूत फरक काय

  -- गहू तांदूळ आणि भरडधान्ये यांत पिष्टमय पदार्थ /स्टार्च , फैटस्, काहीअंशी प्रोटिन्स सेम असतात , परंतु भरडधान्ये मध्ये फायबर्स/तंतुमय पदार्थ खूपच असतात , जे गव्हामध्ये फक्त 1.2% असतात , तर तांदूळ /paddy मध्ये 0.2% इतके असतात , खरी ग्यानबाची मेख येथेच आहे, तसेच भरडधान्यात विटामिन्स खनिजे फायटोकेमिकल्स प्रचंड प्रमाणात असतात गव्हाच्या अन् तांदूळाच्या तुलनेने. मिलेटस् मधील फायबर्स आणि पिष्टमय पदार्थाचे एक विशिष्ट linking असते ज्यामुळे मिलैटस् खाल्ल्यावर हळूहळू रक्तात साखर सोडली जाते, म्हणजे रक्तात साखरेचा पूर येत नाही अन् आरोग्य संवर्धन होते.उलट गव्हाच्या अन् तांदळाच्या सेवनाने रक्तात साखरेचा पूर येतो अन् चिञविचिञ आरोग्य समस्या आजारांना विकारांना सामोरे जायला लागते , आधुनिक वैद्यकीय शास्त्र त्याला जेनेटिक डिसओरडर म्हणते.

हे सर्व आपण टाळू शकतो फक्त मिलेटस् खाद्य संस्कृतीकडे पुन्हा वळून. तसेच मिलेटस् हे ग्लुटेन फ्री अन्न असल्यामुळे स्वादुपिंडाला बळ मिळते, स्वादुपिंडाचे शुद्धीकरण होते, ग्लुटेन फ्री अन्न म्हणजे लिव्हर किडनीचा विमा असेच समजा. 


मिलेटस् असे खा

        मिलेटस् पासून पीठ पोहे भाकरी धपाटे खिचडी पुलाव बिर्याणी डोसे बिसकुट बनवता येतात. फक्त मिलेटस् खरेदी करताना एक काळजी घ्यावी , मिलेटस् पोलीश / polished केलेले नसावेत, ते त्याच्या नैसर्गिक रंगात असावेत. 


मिलेटस् अशा पद्धतीने वापरा

      सर्वप्रथम हलके स्वच्छ पाण्याने धुवून घ्या म्हणजे त्यावरील माती कचरा निघून जाईल. नंतर मिलेटस्/भरडधान्ये आठ ते दहा तास पाण्यात भिजवून घ्यावेत , नंतर सुकवून वाळवून वापरावेत.

          एक गोष्ट निश्चितपणे भरडधान्ये /तृणधान्ये/millets ला परत पुनर्रवैभव करून देणे हे मानव व मानवी आरोग्य व अखिल जीवसृष्टीसाठी क्रांतिकारी पाऊल आहे.

🌱अन्नाईची पुण्याई!🌱


जुन ते सोनं!

पोट सफा तर हर रोग दफा!

सर्वात महत्वाची बाब म्हणजे फायबर युक्त अन्नाची आज सर्वांना गरज भासत आहे!

ते म्हणजे भरडधान्य होय!

------------------------------


Copy Paste.