Sunday, April 26, 2020

मराठी -

माझा लय जीव हाय ह्या इच्यावर. मस्त, मोकाट, उंडारल्या खोंडासारखी भाषा! लावल तितके अर्थ कमी! पंढरपूरच्या घाटापासून ते पुण्यातल्या पेठेपर्यंत किती कळा तिच्या अंगात!

नाकातून आवाज आला की लगेच कळतं की कोकणातून लेले किंवा नेने आलेत. "रांडेच्या" म्हणले की लगेच कोल्हापुरी पांढरा रस्सा आठवतो. " का बे छिनालच्या" म्हणलं की सोलापूरची शेंगा चटणी आणि "पोट्ट्या" म्हणल की नागपुरी सावजी जेवण. पोरीच्या तोंडून "मी तिथे गेलो" ऐकू आल की सांगली आणि "भेंXX" म्हणलं की मुंबई!! "काय करून राहिला?" म्हणलं की नाशिक, "का करूलालाव?" म्हणलं की लातूर आणि "विषय संपला" म्हणलं की पुणे!! हेल काढून बोललेला नगरी किंवा बीडचा आणि "ळ" चा "ल" केला की कोकणी! एका वाक्यात माणसाचं गाव कळतं.

हिंदी बोलताना तर मराठी माणूस लगेच कळतो. आमच्या इतकी हिंदीची चिंधी कुणीच केली नसेल. मराठी माणसाचे हिंदी आणि मुसलमान बागवान लोकांची मराठी म्हणजे विष विषाला मारते त्यातला प्रकार. "हमारी अडवणूक हो रही है" हे मराठी हिंदी आणि "वो पाटी जरा सरपे ठिवो" ही बागवानी मराठी ऐकून मी लय खुश होतो राव! मराठी खासदार आणि राजकारणी लोकांचं मराठी ऐकून तर हिंदी पत्रकारांना घाम फुटत असावा.

एकाच गोष्टीला प्रतिशब्द तर किती? बायको, पत्नी, सौभाग्यवती, अर्धांगिनी, सौ, खटल, कुटुंब, बारदान, बाई, गृहमंत्री, मंडळी इत्यादी सगळ्याचा अर्थ एकचं! "इ" सारख्या आडवळणी शब्दापासून पण सुरु होणारे कितीतरी वेगवेगळे अर्थाचे शब्द.. जसे की "इस्कोट", "इरड करणे", "इरल", "इकनं". "ग्न" ने शेवट होणारे चार शब्द मराठीत आहेत ... लग्न, मग्न, नग्न आणि भग्न. किती मस्त क्रम आहे ना? हे "ग्न" बाबत आमच्या मास्तरच ज्ञान!

इदुळा, येरवा, आंवदा, कडूस पडाय, झुंजूमुंजू, दोपार, सांच्याला, रातीला, तांबडं फुटायला यातून जो वेळ कळतो त्याची मजा am, pm ला कधीच येणार नाही. कोरड्यास, आमटी, कट, शेरवा, तर्री, शॅम्पल यातला फरक कळायला महाराष्ट्र उभाआडवा बघावा लागतो. खेकडा कुठला आणि चिंबोरी कुठली? उंबर कुठलं आणि दोड्या कुठल्या? शाळू, ज्वारी आणि हायब्रीड यातला पोटभेद कळायला रानातली मराठी लागते. कडवाळ कुठलं न मका कुठली हे शेरातला शाना कदीबी सांगू शकत नाय!

खाण-पिणं असू द्या, जनावरं-जित्राब असु द्या, शिव्याशाप असू द्या, लाडाची नाव असू द्या, वेळ-काळाची गणित असू द्या, हुमान-कोडी असुद्या, ओव्या-अभंग असू द्या, अंगाई असू द्या, सणवार असू द्या, झाडाझुडुप असू द्या, शेतीची औजार असू द्या, कापडं-चोपड असू द्या नाहीतर अजून काही, मराठी प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. प्रत्येक गावात, शहरात, कामात, धंद्यात ... सगळीकडे मराठीचा वेगळा बाज असतो, अंदाज असतो आणि लकब असते. दिवसातन 5 वेळा कपडे बदलणाऱ्या अवखळ, सुकुमार पोरीसारखी ही भाषा सगळीकडे नवनवे रंग उधळत असते.

माय मराठी... तुझ्यावर लय जीव आहे बाये!!! अशीच उंडारत राहा... वारं पिलेल्या खोंडासारखं!



Special thanks....
Unknown writer
Source:- whatsapp
Image:- nationalchronical.in
बाळा तुझे नाव नाही सांगितलेस"?



टाळ्यांच्या कडकडाटातच तो तरुण खाली बसला. तरुण कसला, १५ वर्षांचा मुलगाच तो! तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग! पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं..! त्या कडकडाटातही श्रोत्यांचे आवाज येतच होते.

कुणी म्हणत होतं, "काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं..? अंहं! कधीच ऐकलं नव्हतं!!"

त्यावर एकजण म्हणाला - "दुसरा लोकमान्य होणार हा, लिहून घ्या!!" तर तिसऱ्याचे, "पण केवढा सुकुमार आहे नाही? देखणा.. राजबिंडा!" यावर चौथा, "हो ना, वाटतंय की आपल्या या छोट्याश्या दहिवली गावात कुणी राजपुत्रच अवतरलाय. देखणा, विद्वान आणि खिळवून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा धनी..!"

लहानग्यांची आणि किशोरांची वक्तृत्वस्पर्धा होती ती. होता होता स्पर्धा संपली. सूत्रसंचालकाने तसे घोषित केले आणि त्यासोबतच स्पर्धेच्या अध्यक्षांना विनंतीही केली - निकाल संपण्यापूर्वी दोन शब्द बोलण्याची!

अध्यक्षमहोदय बोलायला उभे राहिले. एकवार सगळ्यांवरून नजर फिरवली त्यांनी. मऊशार भात खाताना अचानकच खडा लागावा, तशी त्यांची नजर मघाशीच्या "त्या" मुलावर अडली! एक नि:श्वास सोडून ते बोलू लागले,

"आमच्यावेळी अश्या स्पर्धा फारश्या होत नसत. पण जेव्हा व्हायच्या, त्यावेळी आम्ही अतिशय उत्साहाने भाग घ्यायचो. चार-चार दिवस खपून स्पर्धेची तयारी करायचो आणि बेधडक बोलायचो! आजदेखील सर्वांचीच भाषणे उत्तम झाली. साजेशी झाली. परंतू हल्ली काही मुलांमध्ये आळस फार भरलाय. वक्तृत्वस्पर्धेतली भाषणे पालकांकडून लिहून घेऊ लागलीयेत ती मुलं. पाठ केलेलं उसनवार भाषण म्हणून टाळ्या मिळवल्या जातायत.

आमच्या अनुभवी नजरेतनं अश्या हुशाऱ्या सुटत नाहीत. इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी मांडूच शकत नाही, हे लागलीच लक्षात येते. पण काय करणार? स्पर्धेचे नियम आहेत. काही बंधनं आहेत. ती पाळण्यासाठी मला अश्याच एका मुलाला प्रथम क्रमांक देणं भाग पडतंय. पण माझी अशी इच्छा आहे की, इथून पुढे त्याने स्वत:हून तयारी करून स्पर्धेत उतरावे. भले साधेच भाषण करावे, पण स्वत:चे करावे".

बोलता बोलता त्यांनी "त्या" मुलाच्या दिशेने हात केला, "बाळ पुढे ये.."

सगळ्यांच्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या. त्याची चर्या शांत होती. परंतू नीट पाहिले असते तर त्याच्या कानांच्या पाळ्या लाल झालेल्या दिसल्या असत्या, नाकपुड्यांची थरथर जाणवली असती! पण टाळ्यांच्या गजरात अश्या सूक्ष्म तपशीलांकडे कुणाचे लक्ष जाते?

तो पुढे आला. अध्यक्ष महोदयांनी त्याच्या हातात प्रथम क्रमांकाचे बक्षिस दिले. पुन्हा एकवार टाळ्यांचा कडकडाट झाला. आवाज जरासा थांबल्यावर "त्या"ने अध्यक्षांच्या दिशेने पाहिले आणि मनातली खळबळ आवाजात किंचितही जाणवू न देता म्हणाला,

"महोदय, आपली काही हरकत नसेल तर मी थोडंसं बोलू का"?

"अवश्य! बोल ना.."

बक्षिसपत्र बाजूला ठेवले आणि पुन्हा एकवार तो व्यासपीठावर जाऊन उभा राहिला. सभागृहात टाचणी पडली तरी कानठळ्या बसतील अशी शांतता पसरली. सगळ्यांचे लक्ष "तो" काय बोलतो याकडे लागलेले. खोल श्वास घेऊन तो बोलू लागला,

"मला पारितोषिक मिळाले हा माझा सन्मान आहे. त्याबद्दल मी सन्माननीय व्यासपीठ, स्पर्धेचे संयोजक आणि उत्तम श्रोतागण यांच्या सगळ्यांच्या चरणी प्रथमत:च कृतज्ञता व्यक्त करतो".

क्षणभर थांबला. पण पुन्हा निर्धारपूर्वक बोलू लागला,

"परंतू मा. अध्यक्ष महोदयांना वाटते की, ते भाषण मी लिहिलेले नाही - पालकांनी लिहून दिलेय. ते म्हणतात की, इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी कसे मांडू शकेल? मी त्यांना विचारू इच्छितो की अध्यक्ष महोदय, तुम्ही उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वयाच्या १५ व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही असाच कोटीक्रम लावणार आहात काय? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली नसून ज्ञानेश्वरांच्या आई-अण्णांनी त्यांना लिहून दिलीये - कारण इतक्या लहान मुलाला असे प्रगल्भ विचार सुचणेच शक्य नाही - असेच म्हणणार आहात काय"?

अवघी सभा दचकली. "त्या"ने अध्यक्षांकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली,

"तरीदेखील अध्यक्ष महोदयांना शंका असेल तर मी संयोजकांना विनंती करतो की, मला याच क्षणी - आत्ताच्या आत्ता वक्तृत्वासाठी एखादा विषय द्या आणि तयारीसाठी घटकाभराचा वेळ द्या. आणि मी माझा अभ्यास पणाला लावून त्याही विषयावर भाषण करून दाखवतो की नाही पहाच! मगच ते बक्षिस मला द्यायचं की नाही ठरवा"!!

अभावितपणे कुणीतरी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि पाहाता-पाहाता सारे सभागृह पुन्हा एकवार टाळ्यांच्या गजराने कुंद होऊन गेले. इतका वेळ धीराने बोलणारा "तो" आता मात्र घाबरला. आपण चुकून या व्यासपीठाच्या मर्यादेचा भंग तर नाही ना केला? एवढे विद्वान अध्यक्ष महोदय, पण आपल्या या उद्धट वर्तनाने चिडले तर नसतील ना? त्याने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाहिले. त्यांची नजर स्थिर होती. परंतू सूर्य उगवण्यापूर्वी नभांत जशी हळूवार लालिमा चढत जाते, अगदी तश्याच हळूवारपणे त्यांच्या चर्येवर हास्यप्रभा फाकू लागली होती! शांत चेहऱ्याचे रुपांतर हळूहळू प्रसन्नतेत झाले आणि हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी त्याला जवळ येण्याचा इशारा केला. तो अवघडून आला तर त्यांनी त्याला मिठीच मारली. त्याच्या पाठीवर थाप देत ते बक्षिसपत्र - "काळ" या गाजणाऱ्या नियतकालिकाचे वर्षभराचे मोफत सभासदत्व - त्याच्या हाती दिले. म्हणाले, "बाळा तू आज माझे डोळे उघडलेस. विद्वत्ता, बुद्धिमत्ता वयावर अवलंबून नसते, तर ती व्यक्तीच्या मेहनतीवर आणि अभ्यासावर अवलंबून असते, हे तू आज मज पढतपंडिताला दाखवून दिलेस. या बक्षिसावर अधिकारच आहे तुझा. फक्त तुझा!!"

सारी सभा अवाक होऊन पाहात होती. तो आनंदाने उत्साहित होऊन व्यासपीठावरून उतरला. गर्दीतून वाट काढत जाऊ लागला.

तेवढ्यात अध्यक्षांनी हाक मारली, "अरे बाळा, मला तुझे नाव नाही सांगितलेस"?
हाक ऐकताच तो थबकला. वळाला. त्याची छाती अभिमानाने फुलून आली होती. त्याने मान उंचावली आणि म्हणाला,
                           
"माझं नाव विनायक दामोदर सावरकर"!!!



Special thanks....
Unknown writer
Source:- whatsapp
Image:- theweek.in
थोडा विचार तर कराल.......


If:
A B C D E F G H I J K LM N O P Q R S T U V W X Y Z

is equal to:

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26

Then,

H+A+R+D+W+O+R+K
=8+1+18+4+23+15+18+11
*= 98%*

*K+N+O+W+L+E+D+G+E*
=11+14+15+23+12+5+4+7+5
*=96%*

*L+O+V+E*
= 12+15+22+5
*= 54%*

*L+U+C+K ;*
=12+21+3+11
*= 47%*

None of them makes 100%.
Then what makes 100%?

Is it Money?
.
.
.
NO!

M+O+N+E+Y
= 13+15+14+5+25
*=72%*

Leadership?
.
.
.
NO!

L+E+A+D+E+R+S+H+I+P
=12+5+1+4+5+18+19+8+9+16
*=97%*

Every problem has a solution, only if we perhaps change our

   
"ATTITUDE"...

A+T+T+I+T+U+D+E
1+20+20+9+20+21+4+5
*= 100%*

It is therefore OUR ATTITUDE towards Life and Work that makes
OUR Life 100% Successful.

Amazing mathematics

Beautiful msg to share:
Do you agree that we have 26 alphabets in English, as given below

A = 1 ; B = 2 ; C = 3 ; D = 4
E = 5 ; F = 6 ; G = 7 ; H = 8
I = 9 ; J = 10 ; K = 11 ; L = 12
M = 13 ; N = 14 ; O = 15 ; P = 16
Q = 17 ; R = 18 ; S = 19 ; T = 20
U = 21 ; V = 22 ; W = 23 ; X =24
Y = 25 ; Z = 26.*

With each alphabet getting a number, in chronological order, as above, study the following, and bring down the total to a single digit and see the result yourself

*Hindu -*
*S  h  r  e  e   K  r  i  s  h  n  a*
19+8+18+5+5+11+18+9+19+8+14+1
=135
*=1+3+5 = 9*

*Muslim*
*M  o  h  a  m  m  e  d*
13+15+8+1+13+13+5+4
= 72
*= 7+2 = 9*

*Jain*
*M a  h a v  i  r*
13+1+8+1+22+9+18
  =72
*= 7+2= 9*

*Sikh*
*G  u  r  u   N  a  n  a  k*
7+21+18+21+14+1+14+1+11
=108
*=1+0+8 = 9*

*Parsi*
*Z  a  r  a  t  h  u  s  t  r a*
26+1+18+1+20+8+21+19+20+18+1
=153
*=1+5+3 = 9*

*Buddhist*
*G  a   u  t  a  m*
7+1+21+20+1+13
=63
*= 6+3 = 9*

*Christian*
*E  s   a  M  e  s  s  i   a  h*
5+19+1+13+5+19+19+9+1+8
=99
9+9=18
1+8 = 9

Each one equals with number  9

THAT IS NATURE'S CREATION WHICH  SHOWS THAT GOD IS ONE !!!


Special thanks
Unknown writer
Source:- whatsapp
Image:- pinterest (internet)
वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका.


चिमणीचे सगळे काम आटोपले, ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. 'गेला असेल कुठेतरी... येईल परत' …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं... अनेक दिवस उलटली.... चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?' कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
- 'तुला राग नाही आला माझा?'
- का यावा?
- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?
- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.
- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.
- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'
चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -
- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.
चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे... पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.
- म्हणजे ?
- म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या गावीच नसतं अगं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात... त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही …. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो …'थांब मला जर करिअर करुदे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.
त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते गावीही नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. आपण फार एकटे झालेले असतो.... !!
- आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?
- वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका.




Special thanks
Unknown writer
Source:- whatsapp
Image source:- m.lokmat.com
खरी संपत्ती


एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला, तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार....
जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागले

तेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार.
तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही.
आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...
जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील स्त्रियांपर्यंत गेली.

ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू, पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा, पण माझ्या वडिलांची अंतयात्रा थांबवू नका, मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन .....

आता तो  माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला .. की खरे पाहता गोष्ट अशी आहे की वारलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे, परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला...
आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली,
आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. .

आशय ......
मुलगी असणारे खुप भाग्यवान आहेत कारण मुली आपल्या आईवडिलांनाच आपली दौलत समजतात, म्हणुनच मुलगी झाली तर खुश व्हायला हवे ना की दुःखी.......

अशी प्रार्थना करा की प्रत्येकाला एक मुलगी मिळावी जी  वडिलांना नेहमी स्मरणात ठेवेल.



Special thanks
Unknown writer
Source:- WhatsApp
Image source:- drballitch.co.
फ्लॅटखरेदी करताना या गोष्टींची माहिती ठेवा.


01) Carpet area - (कार्पेट एरीआ - चटई क्षेत्र) - कार्पेट एरिया म्हणजे प्रत्यक्षात वापरात येणारी जागा. याचा अर्थ असा की फ्लॅट मधील जेवढी जागा आपण प्रत्यक्षात राहण्यासाठी वापरु शकतो ती जागा. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चार भिंतींमधील जागा ज्यावर तुम्ही गालिचा (Carpet) पसरवू शकता.

02) Built up Area - ( बिल्ट अप एरीआ) -कार्पेट एरीआ अधिक आतील व बाहेरील भिंतींची जाडी म्हणजे बिल्ट अप एरीआ. बिल्ट अप एरीआ हा साधारणपणे कार्पेट एरीआ पेक्षा १०% ते १५% जास्त असतो.

03) Super built up / Saleable area ( SBU - सुपर बिल्ट अप एरीआ) -बिल्ट अप एरीआ अधिक लिफ्ट, जिना यांसाठी वापरण्यात आलेली संयुक्त जागा म्हणजे सुपर बिल्ट अप (SBU). साधारणपणे Super built up area बिल्ट अप एरीआच्या २५% ते ३०% जास्त असतो. सध्याचे बिल्डर्स स्थावर मालमत्ता ४०℅ पर्यंत सुपर बिल्टअप एरीआच्या आधारे विकतात. ( मात्र प्रत्यक्षात खरेदी करारावर कार्पेट एरीआचीच नोंद असते.)समजा तुम्ही बिल्डर कडून खरेदी करणार असलेल्या फ्लॅटचा सुपर बिल्ट अप एरीआ १००० चौरस फूट इतका असेल तर प्रत्यक्षात वापरासाठी मिळणारा कार्पेट एरीआ ६५० ते ७०० चौरस फूट असेल.

04) Approved plans -(मान्यताप्राप्तआराखडा) स्थावर मालमत्तेचा आराखडा हा संबंधीत महापालिकेने मंजुर केलेला असतो. यामध्ये प्रकल्पाचा आराखडाआणि प्रत्येक फ्लॅटचा आराखडा समाविष्ट असतो.हा एक महत्त्वाचा दस्तऐवज (Document) असुन बांधकाम कायदेशीर रीत्या करण्यात आले असल्याचा एक मुख्य पुरावा असतो. घर खरेदीचा निर्णय घेण्यापुर्वी मान्यताप्राप्त आराखडा अवश्य तपासून पहावा.

05) Completion Certificate -Occupation certificate (OC) हा एक महत्त्वाचा दाखला असतो. हा दाखला महानगरपालिकेकडून बिल्डरला देण्यात येतो. ईमारतीमध्ये पाणी विजपुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे तसेच सुरुवातीस मंजुर केल्याप्रमाणे आणि मान्यताप्राप्त आराखड्याप्रमाणेईमारतीचे बांधकाम केले असल्याचा हा दाखला असतो. या दाखल्याद्वारे महानगरपालिकेने सदर ईमारत राहण्यायोग्य असल्याचेजाहीर केलेले असते.फ्लॅटची पुर्नविक्री करताना ह्या दाखल्याची आवश्यकता बैंकेला सर्वात जास्त असते त्याशिवाय लोन सॅक्शन होत नाही व पुढील व्यवहारात अडचणी येतात त्यामुळे हा दाखला लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा.

06) Mortgage (गहाणखत) - गृहकर्ज पुरविणारी बँक आणि खरेदीदार यांमध्ये झालेल्या करारानुसार गृहकर्जाची पुर्ण परतफेड होईपर्यंत विकत घेतलेल्या घराचा ताबा बँकेकडे ठेवला जातो. या करारास गहाणखत किंवा Mortgage deed / Agreement असे म्हणतात.मालमत्तेची सर्व कागदपत्रे कर्ज फिटेपर्यंत बँकेकडेच राहतात.

07) Possession letter - (मालकीपत्र) हे पत्रक बिल्डर कडून ग्राहकास देण्यात येते. यामध्ये असे लिहिलेले असते की मालमत्ता राहण्यासाठी पुर्णपणे तयार आहे आणि आता ग्राहकाकडे हस्तांतरीत करण्यात येत आहे. Possession letter (मालकीपत्र) मिळविल्याशिवाय ग्राहकास सदनिकेत राहण्यासाठी जातायेत नाही.

08) Registration of an agreement (करार नोंदणी) -बिल्डर आणि ग्राहकामध्ये जागेचा/घराचा जो करार झालेला असतो त्याची Indian registration Act खाली नोंदणी केली जाते. नोंदणी करण्यापुर्वी Stamp duty (मुद्रांकशुल्क) भरणे आवश्यक असते. स्थावर मालमत्ता विकत घेताना झालेला व्यवहार व करार यांची नोंदणी करणे अत्यावश्यक असते.सदर नोंदणी करण्यासाठी रजीस्ट्रेशन चार्जेस (Registration charges) द्यावे लागतात.

09) Sales deed (खरेदीखत) -जमिनीचा मूळ मालक/ बिल्डर यांनी ठराविक रकमेच्या मोबदल्यात मालमत्तेचा मालकी हक्क खरेदीदाराच्यानावे हस्तांतरीत करण्यासाठीचा जो करार केला जातो त्यास Sales deed असे म्हणतात. Sales deed ची नोंदणी करणे महत्त्वाचे असते.

10) Stamp Duty - (मुद्रांक शुल्क) नोंदणीकृत विक्री मुल्याच्या (Transaction Value) काही टक्के रक्कम मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात सरकारला द्यावे लागतात. ग्राहकाने Stamp duty भरलेली आहे आणि त्याच्या/ तिच्या नावावर मालमत्तेची नोंदणी झालेली आहे. Stamp duty विक्री मुल्याच्या५% ते १४% पर्यंत असते. हे दर वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे असतात.

घरखरेदीसाठी उपयुक्त ठरणारी ही माहिती आपल्याला नक्कीच आवडेल .




Special thanks

Image source:- Freepik.com
मोबाईल पॅटर्न लाॅक केल्यावर आपणांस Emergency calls only असे दिसते. त्यावेळी आपणांस लाॅक काढल्यावरच काॅल करता येतो.
अपघात समयी आपणांस अडचण येऊ शकते  .....


हो पण आता नाही येणार. कारण हा थोडासा बदल आपणास करायला हवा....
1) आपल्या contact मधे जा
2) Group मधे जा 
3) ICE-Emergency contacts मधे जा
4) तिथे आपले महत्वाचे घरचे फोन नंबर save करा... झाले.

आता लाॅक करून Emergency call आल्यास diler च्या उजव्या बाजूला टच केल्यावर आपण save केलेले नंबर दिसतात. म्हणजे आता अपघात समयी आपणांस अडचण न येता काॅल करता येईल.
खुप महत्वाची माहिती आहे.

Image:- FoneLab
Source:- internet
यूरिक एसिड लक्षण-कारण-उपाय uric acid

Uric Acid / यूरिक एसिड का बढ़ने की समस्या बडी तेजी से बढ़ रही है। आयु बढ़ने के साथ-साथ यूरिन एसिड गाउट आर्थराइटिस समस्या का होना तेजी से आंका गया है। जोकि लाईफ स्टाईल, खान-पान, दिनचर्या के बदलाव से भोजन पाचन प्रक्रिया के दौरान बनने वाले ग्लूकोज प्रोटीन से सीधे यूरिन एसिड में बदलने की प्रक्रिया को यूरिन एसिड कहते हैं। भोजन पाचन प्रक्रिया दौरान प्रोटीन से ऐमिनो एसिड और प्यूरीन न्यूक्लिओटाइडो से यूरिक एसिड बनता है। यूरिक एसिड का मतलब है, जो भोजन खाया जाता है, उसमें प्यूरीन पोष्टिकता संतुलन की कमी से रक्त में असंतुलन प्रक्रिया है। जिससे Purines टूटने से यूरिक एसिड बनता है। यूरिक ऐसिड एक तरह से हड्डियों जोड़ों अंगों के बीच जमने वाली एसिड़ क्रिस्टल है। जोकि चलने फिरने में चुभन जकड़न से दर्द होता है। जिसे यूरिक एसिड कहते हैं। शोध में यूरिक एसिड को शरीर में जमने वाले कार्बन हाइड्रोजन आक्सीजन नाइट्रोजन सी-5, एच-4, एन-4, ओ-3 का समायोजक माना जाता है। यूरिक एसिड समय पर नियत्रंण करना अति जरूरी है। यूरिक एसिड बढ़ने पर समय पर उपचार ना करने से जोड़ों गाठों का दर्द, गठिया रोग, किड़नी स्टोन, डायबिटीज, रक्त विकार होने की संभावनाएं ज्यादा बढ़ जाती है। Uric Acid Control करना अति जरूरी है।


यूरिक एसिड़ लक्षण  Uric Acid Symptoms



पैरो-जोड़ों में दर्द होना।पैर एडियों में दर्द रहना।गांठों में सूजनजोड़ों में सुबह शाम तेज दर्द कम-ज्यादा होना।एक स्थान पर देर तक बैठने पर उठने में पैरों एड़ियों में सहनीय दर्द। फिर दर्द सामन्य हो जाना।पैरों, जोड़ो, उगलियों, गांठों में सूजन होना।शर्करा लेबल बढ़ना।इस तरह की समस्या होने पर तुरन्त यूरिक एसिड जांच करवायें।


यूरिक एसिड नियत्रंण करने के आर्युवेदिक तरीके / Ayurvedic Treatment for Uric Acid

1. यूरिक एसिड बढ़ने पर हाईड्राॅलिक फाइबर युक्त आहार खायें। जिसमें पालक, ब्रोकली, ओट्स, दलिया, इसबगोल भूसी फायदेमंद हैं।

2. आँवला रस और एलोवेरा रस मिश्रण कर सुबह शाम खाने से 10 मिनट पहले पीने से यूरिक एसिड कम करने में सक्षम है।

3. टमाटर और अंगूर का जूस पीने से यूरिक एसिड तेजी से कम करने में सक्षम है।

4. तीनो वक्त खाना खाने के 5 मिनट बाद 1 चम्मच अलसी के बीज का बारीक चबाकर खाने से भोजन पाचन क्रिया में यूरिक ऐसिड नहीं बनता।

5. 1 चम्मच शहद और 1 चम्मच अश्वगन्धा पाउडर को 1 कप गर्म  दूध के साथ घोल कर पीने से यूरिक एसिड नियत्रंण में आता है।

6. यूरिक एसिड बढ़ने के दौरान जैतून तेल का इस्तेमाल खाने तड़के-खाना बनाने में करें। जैतून तेल में विटामिन-ई एवं मिनरलस् मौजूद हैं। जोकि यूरिक एसिड नियत्रंण करने में सहायक हैं।

साभार सौजन्य.
Unknown writer
Source:- WhatsApp.
तस्वीर:- middleeasrmedicalportal.com

Saturday, April 25, 2020

आये दिन हम सभी लोग शुद्ध हिन्दी बोलने के बजाय कम मालूमात के चलते उर्दू का उपयोग करते हैं|


तो आओ चलें शुद्ध हिन्दी बोलने का प्रयास करें...

इन शब्दों का प्रयोग करें...

      उर्दू                हिंदी
01 ईमानदार       - निष्ठावान
02 इंतजार         - प्रतीक्षा
03 इत्तेफाक       - संयोग
04 सिर्फ            - केवल, मात्र
05 शहीद           - बलिदान
06 यकीन          - विश्वास, भरोसा
07 इस्तकबाल    - स्वागत
08 इस्तेमाल       - उपयोग, प्रयोग
09 किताब         - पुस्तक
10 मुल्क            - देश
11 कर्ज़             - ऋण
12 तारीफ़          - प्रशंसा
13 तारीख          - दिनांक, तिथि
14 इल्ज़ाम         - आरोप
15 गुनाह            - अपराध
16 शुक्रीया          - धन्यवाद, आभार
17 सलाम           - नमस्कार, प्रणाम
18 मशहूर           - प्रसिद्ध
19 अगर             - यदि
20 ऐतराज़          - आपत्ति
21 सियासत        - राजनीतिम
22 इंतकाम          - प्रतिशोध
23 इज्ज़त           - मान, प्रतिष्ठा
24 इलाका           - क्षेत्र
25 एहसान          - आभार, उपकार
26 अहसानफरामोश - कृतघ्न
27 मसला            - समस्या
28 इश्तेहार          - विज्ञापन
29 इम्तेहान          - परीक्षा
30 कुबूल             - स्वीकार
31 मजबूर            - विवश
32 मंजूरी             - स्वीकृति
33 इंतकाल          - मृत्यु, निधन
34 बेइज्जती         - तिरस्कार
35 दस्तखत          - हस्ताक्षर
36 हैरानी              - आश्चर्य
37 कोशिश            - प्रयास, चेष्टा
38 किस्मत            - भाग्य
39 फै़सला             - निर्णय
40 हक                 - अधिकार
41 मुमकिन           - संभव
42 फर्ज़                - कर्तव्य
43 उम्र                  - आयु
44 साल                - वर्ष
45 शर्म                 - लज्जा
46 सवाल              - प्रश्न
47 जवाब              - उत्तर
48 जिम्मेदार          - उत्तरदायी
49 फतह               - विजय
50 धोखा               - छल
51 काबिल             - योग्य
52 करीब               - समीप, निकट
53 जिंदगी              - जीवन
54 हकीकत            - सत्य
55 झूठ                  - मिथ्या, असत्य
56 जल्दी                - शीघ्र
57 इनाम                - पुरस्कार
58 तोहफ़ा              - उपहार
59 इलाज               - उपचार
60 हुक्म                 - आदेश
61 शक                  - संदेह
62 ख्वाब                - स्वप्न
63 तब्दील              - परिवर्तित
64 कसूर                 - दोष
65 बेकसूर              - निर्दोष
66 कामयाब            - सफल
67 गुलाम                - दास
68 जन्नत                -स्वर्ग
69 जहन्नुम             -नर्क
70 खौ़फ                -डर
71 जश्न                  -उत्सव
72 मुबारक             -बधाई/शुभेच्छा
73 लिहाजा़             -इसलीए
74 निकाह             -विवाह/शादि
75 आशिक            -प्रेमी
76 माशुका             -प्रेमिका
77 हकीम              -वैध
78 नवाब               -राजसाहब
79 रुह                  -आत्मा
80 खु़दकुशी          -आत्महत्या
81 इज़हार             -प्रस्ताव
82 बादशाह           -राजा/महाराजा
83 ख़्वाहिश          -महत्वाकांक्षा
84 जिस्म             -शरीर/अंग
85 हैवान             -दैत्य/असुर
86 रहम              -दया
87 बेरहम            -बेदर्द/दर्दनाक
88 खा़रिज           -रद्द
89 इस्तीफ़ा          -त्यागपत्र
90 रोशनी            -प्रकाश
91मसीहा             -देवदुत
92 पाक              -पवित्र
93 क़त्ल              -हत्या
94 कातिल           -हत्यारा
95 मुहैया             - उपलब्ध
96 फ़ीसदी           - प्रतिशत
97 कायल           - प्रशंसक
98 मुरीद             - भक्त
99 कींमत           - मूल्य (मुद्रा में)
100 वक्त            - समय
101 सुकून        - शाँति
102 आराम       - विश्राम
103 मशरूफ़    - व्यस्त
104 हसीन       - सुंदर
105 कुदरत      - प्रकृति
106 करिश्मा    - चमत्कार
107 इजाद       - आविष्कार
108 ज़रूरत     - आवश्यक्ता
109 ज़रूर       - अवश्य
110 बेहद        - असीम
111 तहत       - अनुसार

हिन्दी हमारी राजभाषा एवं मातृभाषा हैं इसका सम्मान करें।

भाषा बचाईये, संस्कृति बचाईये...

साभार सौजन्य.
Unknown writer
Source:- WhatsApp.
तस्वीर:- दैनिक भास्कर. 
मधमाश्यांची बदलती जीवनशैली – काळानुसार करतायेत अधिवासात बदल – जगण्याची लढाई

मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल अस म्हटलं कि लोक विचारतात कस बर... हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं,

 ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.* अश्या अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत.
 विशेष म्हणजे जे अन्न परागीभवन होऊन येत नाही ते खाण्यासाठी सुद्धा जास्त पौष्टिक नसते.
      हायब्रीड अन्न खाऊन आपली शाररीक क्षमता विकास व मानसिक क्षमता विकास होत नाही हे जगासमोर आल आहे.
 मात्र जगण्याच्या स्पर्धेत आपण हरवून बसलोय. मात्र पुढील पिढीला अतिशय कुमकुवत करीत आहोत. शाररीक क्षमता नसल्याने मानव आपली पुढील पिढी वाढवू सुद्धा शकणार नाही असे भाकीत होत आहेत. भूतान सारखा देश धनुर्विद्या शिकताना शाळा सुद्धा शिकत नाहीत मात्र आवडीनुसार जगतात आणि आनंदी व समाधानी जगतात हे विशेष.
आपण बारकाईने पाहिल्यास अलीकडील काळात अनेक डाळिंब बागायतदार मधमाश्याच्या पेटांच्या शोधात असतात कारण कि डाळींब असे झाड आहे कि याचे परागीभवन फक मधमाश्याच करू शकतात. जर मधमाश्या नसतील तर डाळिंब फुलांचे रुपांतर फळात होतच नाही कारण याची नर व मादी फुले वेगवेगळी असतात आणि मग मधमाश्या एका फुलामधील नर उचलून मादी फुलावर सोडण्याचे महत्वाचे काम करतात. आणि फक्त माधामाश्याच हे काम करू शकतात, हे आजच्या जगाला समजले आहे. मात्र मधमाश्यांना काय आवडते हे आपण शिकत नाही, तिला पोळे करायला कुठली झाडे आवडतात, पराग व मकरंद गोळा करायला कुठली झाडे आवडतात.

आपल्यापैकी बहुतेकजन हिमालयात जातात मात्र हिमलायात मनालीच्या पायथ्याशी अनेक गावे आहेत कि जिथ अगदी २०० वर्षेपूर्वी पासून मधमाशी पालन करीत आहेत, मात्र हे कधीच पाहत नाहीत, खरतर आपल पर्यटन हे शाश्वत व ग्रामीण भागाला उर्जा देणार असले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही. अर्थात मधमाशी पालन २०० वर्षपूर्वी ते पण शास्त्रीयदृष्ट्या पालन केल्याचे आढळून येते. आपल्या राहत्या घरात मधमाश्या पालन करीत आहेत आणि दरवर्षी १० किलो मध विकतात आणि ३ किली  मध स्वतःसाठी ठेवतात. मात्र खरतर हे करण्यापाठीमागे उद्धेश परागीभवन हा असून अनेक पिके यावर अवलंबून आहेत. आणि हे सगळ त्या मधमाश्यांनी सुद्धा स्वीकारले आहे. यात ही माणस त्यांना अति थंडीत गुळाचा व साखरेचा पाक करून ठेवतात काहीजण तर गोळा केलेला मधसुद्धा ठेवतात. 

आपल्याला वाटत आपणच शेती करतो मात्र मुंग्या, मधमाश्या, कीटक, गांडुळे, वटवाघळ, साप, पक्षी असे सर्वच जीव शेतकऱ्याला शेती करण्यासाठी मदत करीत असतात. यात सर्वात आघाडीवर मधमाश्या आहेत हे विसरून चालणार नाही कारण फुलांचे फळात रुपांतर करण्यात मधमाश्या पटाईत असतात, त्यांच्याशिवाय दुसरे किटक हे काम करूच शकत नाहीत, अगदी डाळिंब, काकडी, सफरचंद अशी अतिशय महत्वाची फळे. आपण फक्त जगात मधमाश्या आहेत तोपर्यंतच करू शकतो हे वेळीच जगाने लक्षात घेणे गरजेचे आहे.
  मधमाश्याची बदलती जीवनशैली यावर अनेक बाबी समोर येत आहेत, अगदी लहानपणापासून यावर मी काम करीत आहे, यात १९९० मध्ये साध मधमाश्यांच पोळ हे फक्त काटेरी झाडावर बसायची यात साधी बाभूळ, बोर ही झाड महत्वाची होती, मात्र आजच्या काळात हीच पोळी काटेरी झाड सोडून जांभूळ, आंबा अश्या सहज शिकार होईल अश्या झाडांवर शिवाय घरात, भिंतीवर दिसू लागली, हा अतिशय महत्वाचा बदल दिसून येत आहे.  हा बदल करण्यापाठीमागे कारण सुद्धा असेच आहे की, आजकाल बोरी व बाभळी तोडण्याचे प्रमाण भयानक वाढत गेले आणि वास्तवात तर आता बोरी व बाभळी दुर्मिळ होत गेल्या, पर्यायाने त्यांनी आपल्या मूळ नैसर्गिक अधिवासात बदल करीत नवे पर्याय स्वीकारला केवळ माणसांच्या चुकामुळेच...

 आगी मधमाश्या तर जंगलातील उंच झाड कमी होत गेली शिवाय, नैसर्गिक पाणवठे कमी होत गेले, ज्यात या मधमाश्या सहज मातीत उतरून गाळात पाणी पिऊ शकत होत्या, आता हे पाणवठे नष्ट झालेत, यात काही वन अधिकाऱ्यांनी तर पर्यटकांना वाघ दिसावा म्हणून जंगलातील नैसर्गिक पाणवठे नष्ट केले आणि आता नवीन पाणवठे रोडलगत तयार करून वाघ दिसावा अशी व्यवस्था निर्माण केली. मात्र यात सिमेंटच्या टाक्या बांधल्याने त्यात मधमाश्या पाणी प्यायला उतरतात आणि बुडून मरतात. असे हे व्यवस्थापन कसे जंगल वाढविणार.
  यात या माश्यांनी आपला नैसर्गिक अधिवास बदलून इमारती, मंदिरे अश्या जागा निवडून लोकवस्तीत प्रवेश केला. कारण पाणी सहज मिळू लागले शिवाय उसाची रसवंती हे सुद्धा महत्वाचे आहे कारण यात त्यांना उन्हाळ्यात गोड रस मिळत असतो.

   आजकाल शिकलेल्या लोकांना मधमाशी काय करू शकते याच महत्त्व राहिलेले नाही. मात्र शेतीत अडचण आली की मग आपण सर्व पर्याय शोधत असतो. अगदी कालची गोष्ट आहे की, माझा मित्र बंड्या याने सांगवी गावात ४ एकर जमीन घेतली असून, गेली अनेक वर्षे शेती हा व्यवसाय म्हणून करीत आहे. यात त्याने पॉली हाऊस करून आधुनिक शेती करण्यास सुरुवात केली. अर्थात शेती घेतली त्यावेळी शेतीच्या बांधावर बोर, बाभूळ, जांभूळ, आंबा, शेवगा, भोकर, रुई अशी विविध झाड बांधावर होती. मात्र इतरांचे ऐकून सर्व झाडे तोडली आणि जास्त पाणी पिणारी नारळाची झाडे बांधावर लावली, यात शेतीची जैव विविधता झपाट्याने कमी झाली हे लक्क्षा आलेच नाही.
आता खरी गंमत अशी आहे की, परवा त्याचा फोन आला की, पॉली हाऊसमध्ये काकडी लावली आहे आणि खूप मोठी पिवळी फुल येत आहेत, आणि जळून जातायेत शिवाय काकडी अंगठ्या एवडीच राहतेय, काय कराव लागेल, मग आम्ही प्रत्यक्ष जाऊन चर्चा करून ठरवले, की या काकडीचे परागीभवन होत नाही कारण या फुलात आत शिरून परागीभवन कोणीही करत नाही, त्यामुळे त्याचे पराग फुटत नाहीत आणि मग फुल जळून जात आहेत, मग यावर उपाय म्हणजे मधमाश्याच जगात हे काम करू शकतात, मग बंड्याने खटपट करून मधमाश्यांच्या पेट्या अकलूजवरून घेऊन आला. आणि त्याच रात्री दोन पेट्या पॉली हाऊसच्या तोंडाजवळ ठेवल्या. सकाळी लवकर मधमाश्यांनी आपले परागीभवनाचे काम सुरु केले. मनाला खूप बरे वाटले, मग ७ दिवसांनी बंड्याने आनंदाने मला फोन केला की १ क्रेटऐवजी आता ६ क्रेट काकड्या तोडल्या आणि शिवाय टवटवीत माल सापडला, २० किलोची वाढ १५ पटीने उत्पन्न वाढले. याचा टक्केवारीत अर्थ काढायचा असेल तर १५०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले. सचिन शिर्के म्हणजे बंड्या हा माझा मित्र सहज म्हणाला शिक्षणात कधी अस शिकवलं जात नाही, यापुढे मात्र पर्यावरण पूरक वृक्षारोपण करणार असल्याचे स्पष्टपणे बोलून दाखविले. अगदी शेतीच्या बांधावर बोरी, बाभळी, करंज, भोकर, उंबर, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ
अशी जैव विविधता पूरक झाडे लावणार असे कबूल केले. अनेकजण सांगतात झाडांची सावलीमुळे पिकांना फटका बसतो मात्र हे खोटं असून आपली स्थानिक झाडांच्या पानांचे खतात लवकर रुपांतर होते, शिवाय सावलीमुळे काही फरक पडत नाही, मात्र यात परदेशी निलगिरी, गुलमोहर आणि नारळ झाडे बांधावर असल्यास भूजल पातळी झपाट्याने खोलवर जाते आणि यांची पाने जमिनीवर पडल्यास जमीन नापीक होत असते. त्यामुळे फक्त स्थानिक झाडेच शेतीच्या बांधावर लावली पाहिजेत.
  काकडीचे परागीभवन करताना मधमाशी फुलात शिरून परागीभवन करीत असते. आणि मग काकडीचे वेलींची वाढही झपाट्याने होत असते, याचा अर्थ वेलीची वाढ जोरात होते आणि उत्पादन क्षमता वाढते ती पण कित्येक पटीने...काहीजण दिवसा कीटकनाशक फवारतात आणि मग मधमाश्या मारतात. यावर उपाय म्हणजे रात्री मधमाश्यांनी आपले परागीभवन काम थांबविले की फवारणी करावी जर गरज असेल तरच..
अगदी ज्येष्ठ निसर्गतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी नागझिरा येते सांगितले की, जंगलात अस्वले मधमाश्यांची पोळी व मध आवडीने खातात, त्याच्या भाकरी करतात त्या करताना झाडांची पाने टाकतात आणि मग त्या सर्व भाकरी गुहेत ठेवतात कारण त्यांच्या पिल्लांसाठी उपयोगी येतील, मात्र काहीवेळा या भाकरी चोरायला आदिवासी लोक येतात आणि मग अस्वले हल्ले करतात मात्र अस्वलाचा हल्ला म्हणजे जगात सर्वात वाईट चेहरा होतो, कारण त्याची एक चापट म्हणजे चेहरा विद्रुपीकरणच. मात्र एकदा त्यांनी एक अस्वल झाडावर चढत असल्याचे पहिले, ते झाडावर मधमाशी पोळे खाण्यासाठी झाडाच्या शेंड्यावर गेले आणि वरून खाली पडले आणि मेले याचा अर्थ असा आहे की , त्या मध्यामाश्याच्या पोळ्यावर अनेकदा अस्वल हल्ले झाले होते आणि मग त्या पोळ्यातील राणीने आपल्यात बदल करीत झाड फांदी ऐवजी अस्वल आल्यावर फांदी सहज तुटेल अश्या फांदीवर आपले पोळे केले आणि यावर कायमस्वरूपी आगी माश्यांनी उपयायोजना केली. ज्या प्रजाती बदलायला शिकतात त्याच निसर्गात टिकतात आता वेळ आहे मानवाला बदलायची, जर आपण आपल्या जीवनशैलीत बदल केला नाहीतर आपणसुद्धा संपणार यात शंकाच नाही, हे विशेष लकक्षात घेणे आवश्यक आहे.
आपण सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे की यापुढील काळात स्थानिक वृक्षलागवडीला प्राधान्य दिले पाहिजे. जेणेकरून आपली स्थानिक जैवविविधता वाढेल आणि जगण्यातील आनंद व समाधान वाढेल. मधमाश्या जगात टिकून राहण्यासाठी बदल करीत राहतील मात्र त्यांना आपणही साथ दिली पाहिजे. आता नाही तर पुन्हा कधीच नाही असं बोलण्याची वेळ आली आहे.  सर्वांनी शाश्वत शेतीकडे वळावे वेळीच, अन्यथा आपणही संपणार हे आता नक्कीच..

साभार सौजन्य....
डॉ. महेश गायकवाड
निसर्ग जागर प्रतिष्ठान
द्वारा:- whatsapp
Image:- vectorstock

Tuesday, April 21, 2020

|| ईश्वरीय गणित ||

                         

एक बार दो आदमी एक मंदिर के पास बैठे गपशप कर रहे थे । वहां अंधेरा छा रहा था और बादल मंडरा रहे थे ।

थोड़ी देर में वहां एक आदमी आया और वो भी उन दोनों के साथ बैठकर गपशप करने लगा ।

कुछ देर बाद वो आदमी बोला उसे बहुत भूख लग रही है, उन दोनों को भी भूख लगने लगी थी ।
पहला आदमी बोला मेरे पास 3 रोटी हैं, दूसरा बोला मेरे पास 5 रोटी हैं, हम तीनों मिल बांट कर खा लेते हैं।

उसके बाद सवाल आया कि 8 (3+5) रोटी तीन आदमियों में कैसे बांट पाएंगे ??

पहले आदमी ने राय दी कि ऐसा करते हैं कि हर रोटी के 3 टुकडे करते हैं, अर्थात 8 रोटी के 24 टुकडे (8 X 3 = 24) हो जाएंगे और हम तीनों में 8 - 8 टुकड़े बराबर बराबर बंट जाएंगे।

    तीनों को उसकी राय अच्छी लगी और 8 रोटी के 24 टुकडे करके प्रत्येक ने 8 - 8 रोटी के टुकड़े खाकर भूख शांत की और फिर बारिश के कारण मंदिर के प्रांगण में ही सो गए ।

सुबह उठने पर तीसरे आदमी ने उनके उपकार के लिए दोनों को धन्यवाद दिया और प्रेम से 8 रोटी के टुकड़ों के बदले दोनों को उपहार स्वरूप 8 सोने की गिन्नी देकर अपने घर की ओर चला गया।

उसके जाने के बाद दूसरे आदमी ने  पहले आदमी से कहा हम दोनों 4 - 4 गिन्नी बांट लेते हैं ।

पहला आदमी बोला नहीं मेरी 3 रोटी थी और तुम्हारी  5 रोटी थी, अतः मैं 3 गिन्नी लुंगा, तुम्हें 5 गिन्नी रखनी होगी।

इस पर दोनों में बहस होने लगी।

इसके बाद वे दोनों समाधान के लिये मंदिर के पुजारी के पास गए और उन्हें  समस्या बताई तथा  समाधान के लिए प्रार्थना की ।

पुजारी भी असमंजस में पड़ गया, दोनों  दूसरे को ज्यादा  देने के लिये लड़ रहे है ।  पुजारी ने कहा तुम लोग ये 8 गिन्नियाँ मेरे पास छोड़ जाओ और मुझे सोचने का समय दो, मैं कल सवेरे जवाब दे पाऊंगा ।

पुजारी को दिल में वैसे तो दूसरे आदमी की 3-5 की बात ठीक लग रही थी पर फिर भी वह गहराई से सोचते-सोचते गहरी नींद में सो गया।

कुछ देर बाद उसके सपने में भगवान प्रगट हुए तो पुजारी ने सब बातें बताई और न्यायिक मार्गदर्शन के लिए प्रार्थना की और बताया कि मेरे ख्याल से 3 - 5 बंटवारा ही उचित लगता है।

भगवान मुस्कुरा कर बोले- नहीं, पहले आदमी को 1 गिन्नी मिलनी चाहिए और दूसरे आदमी को 7 गिन्नी मिलनी चाहिए ।

भगवान की बात सुनकर पुजारी अचंभित हो गया और अचरज से पूछा- *प्रभु, ऐसा कैसे  ?*

भगवन फिर एक बार मुस्कुराए और बोले :

इसमें कोई शंका नहीं कि पहले आदमी ने अपनी 3 रोटी के 9 टुकड़े किये परंतु उन 9 में से उसने सिर्फ 1 बांटा और 8 टुकड़े स्वयं खाया अर्थात उसका *त्याग* सिर्फ 1 रोटी के टुकड़े का था इसलिए वो सिर्फ 1 गिन्नी का ही हकदार है ।

    दूसरे आदमी ने अपनी 5 रोटी के 15 टुकड़े किये जिसमें से 8 टुकड़े उसने स्वयं खाऐ और 7 टुकड़े उसने बांट दिए । इसलिए वो न्यायानुसार 7 गिन्नी का हकदार है .. ये ही मेरा गणित है और ये ही मेरा न्याय है  !

ईश्वर की न्याय का सटिक विश्लेषण सुनकर पुजारी  नतमस्तक हो गया।

उपरोक्त का सार ये ही है कि हमारी वस्तुस्थिति को देखने की, समझने की दृष्टि और ईश्वर का दृष्टिकोण एकदम भिन्न है । हम ईश्वरीय न्यायलीला को जानने समझने में सर्वथा अज्ञानी हैं।
 
हम अपने त्याग का गुणगान करते है, परंतु ईश्वर हमारे त्याग की तुलना हमारे सामर्थ्य एवं भोग तौल कर यथोचित निर्णय करते हैं।

यह महत्वपूर्ण नहीं है कि हम कितने धन संपन्न है, महत्वपूर्ण यहीं है कि हमारे सेवाभाव कार्य में त्याग कितना है।

साभार सौजन्य
Story:- WhatsApp
Image:- Internet.