Tuesday, February 11, 2025

नकळत घडले ते

ऐका नं....


आम्ही पाचजणी पश्चिम महाराष्ट्रातील...बाळबोधी
घरातील मुली.घरातील वडीलधाऱ्या नी सांगितले
त्याच्या गळ्यात माळ घातली...मग सासुरवास
सहन केलेल्या....अशा टिपीकल काकू हं....

एक सुप्त इच्छा...आज सगळ्यांनी हाॅटेलमध्ये जायचे.मस्त चायनीज खायचे... खूप गप्पा ,धमाल
मस्ती करायची....भेटायचेच ठरले.
तशा आंम्ही फारशा हाॅटेलमध्ये गेलो नाही.
कधीतरी नवरा किंवा मुलाबरोबर...ते पण
मसाला डोसा,इडली असे साऊथ  इंडियन पदार्थ
खाल्ले असतील....पण चायनीज खायचे...ते पण
मैत्रिणींच्या बरोबर... आॅर्डर आपण करायची...
वेगळेच थ्रिल अनुभवायचे होते...

 मुलगा  एकदा बोलताना ऐकण्यात होते.
ते हाॅटेल....तिथे खास चायनीज मिळते..
तिथेच गेलो.

आता खरी गंमत सुरू.,..

आंम्ही सगळ्यांनी जीन्स...टाॅप...पायात शूज
अगदी पाॅश मध्थे तयार झालो...आम्ही काकू
असलो तरी सगळ्या ग्रॅज्यूएट,वर्किंग वुमेन
पूर्वीच्या हिराॅईन साधना,शबाना,वहिदा
अशाच हो आम्ही ..!!!!

हाॅटेल मध्ये आंम्ही **चिकन नुडल्स**
मागवले.....ते इतके प्रचंड आले...त्यातून
खूप आॅईली होते....या वयात अॅसिडिटीचा
त्रास....मग काकू लोकांनी...
** लॉंग आयलंड आईस  टी**
मागवला...
आता धमाल बघा....  यामध्ये virgin मागवले
असते तर ???.....पण,,,, इथे माहिती कुणाला????
आता त्या ** लॉंग आयलंड आईस टी *** मध्ये
व्होडका असते....हे काकूंना माहिती नाही...
काकू लोकांनी ते पिऊन घेतले..
आता मजा...
काकूंना आता नावेत बसल्यासारखे वाटायला
लागले.... खूप सुखद ,,अदभुत असे काहीतरी
वाटायला लागले....मग
सीमाकाकू रडायला लागल्या....त्यांना देवानंद
आवडायचा....पण आई-वडिलांनी त्यांना
चांगला नवरा नाही मिळवून दिला....वगैरे बोलायला
लागल्या.... थोड्याफार फरकाने प्रत्येकीचे हेच
दु:ख असल्याने सगळ्यांनी नवरे लोकांना
शिव्या घातल्या....आता त्या नावेतून विमानात
बसल्या...विमान टेक आॅफ झाले होते.....
वीणाकाकूंना  तिथे आलेली एक ख्रिश्चन स्री
त्यांच्या नवऱ्याची स्टेनोटायपिस्ट वाटली....त्यांनी
दंगा सुरू केला...त्या तिच्याशी भांडायला लागल्या.
तिच्या झिंज्या उपटल्या...नीताकाकूंना शम्मीकपूर
खूप आवडायचा...त्या " या...हूsss"चाहे कोयी मुझे
जंगली कहे...असे ओरडत होत्या...मी मनसोक्त
सासूबाई,नणंद यांना शिव्या घालत होते...
आता मॅनेजर आमच्या जवळ आला....
वेटरला विचारले..." तु काकूलोकांना काय दिलेस..???'
पण आॅर्डर काकू लोकांनी दिली होती....तो हतबल
झाला...

मग मॅनेजर माझा फोन उचलतो...त्यावर
My son...लिहिलेल्या आयकाॅनवर क्लीक करतो...
पलिकडून मुलगाच बोलत असतो... मॅनेजर घडलेला
प्रकार सांगतो....मुलगा धावत येतो....आधी बिल पे
करतो.... आमच्याकडे येतो....
मेंटल हॉस्पिटल बरे एवढी आमची अवस्था...
आंम्ही धडपडत मुलाच्या मदतीने ऊठत....
दारापर्यंत येतो....pull,,,push च्या गोंधळात
अडकतो.....मुलाला पण आवरत नव्हतो...
मग मॅनेजर ला  शिव्या घातल्या.....

मग मुलाने आम्हाला धरून कारमध्ये बसवले...
त्यातून काही काकू लोक पलिकडचे दार ऊघडून
बाहेर जात होत्या.तोंडाने अखंड बडबड....पण
मुलगा शांतच...त्याने काकू लोकांना परत कारमध्ये
बसवून दरवाजे लाॅक केले...
अशाप्रकारे बरगळत...कारण कोण काय बोलते
कुणालाच पत्ता नाही...अशा प्रकारे वरात घरी आली.

सुनबाई गुणाची हो ...तिने सगळ्यांना लिंबूपाणी दिले.
आणि झोपवले....

खूप वेळाने मी जागी झाले...डोके जाम जड झाले होते.
ऊठून बाहेर च्या खोलीत गेले...
पतीराजांनी हसत विचारले...
" काय मग विमान लॅड झाले का..???"
ते  व मुलगा जोरात हसायला लागले...
बोलले...तुझ्या मैत्रीणी घरी पोचल्या गं...त्यांना ऊबर
करून दिली....
मग
त्यांनी वरील सगळा प्रकार सांगितला....
आंम्ही सगळे जाम हसत होतो,.....
पण
एक थ्रील अनुभवले....नाहीतर काकू लोकांना
असले काही जमणार होय....जे आमच्याही
नकळत घडले ते...???
समाप्त.....

Credit:-

Unknown writer

No comments:

Post a Comment