Withdrawal होता आलं पाहीजे.....
सहज, 'मैत्रिणीशी बोलतांना निघालेलं वाक्य'
साधं उदाहरण घ्या ना ....
लग्न झाल्यावर मुलगी सासरी येते, ती कधीही माहेरच्यांना विसरू शकत नाही . नेहमीच तिचं मन आठवणीत रमलेलं असतं पण त्यासोबतच माहेरची अस्मिता आणि सासरची जबाबदारी पेलवावी लागते .
कमी जास्त होणारच म्हणून प्रत्येक गोष्ट माहेरी सांगून संतूलन बिघडवायचं नसतं, तर माहेरी जे मिळालं ते इथे मिळेलच असे नाही म्हणून तुलना करून दुःखी व्हायच नसतं. तर थोडं- थोडं withdrawal व्हायचं असतं........
बऱ्याचदा आपल्याला खुप संधी मिळतात आपण स्वतःचा असा ग्रह करुन घेतो की माझ्या शिवाय दुसरं हे करू शकत नाही .
अशीपण वेळ येते जेव्हा ती संधी दुसऱ्याला मिळते व आपण जळफडाट करतो पण आपण आपलं योगदान विसरून जातो, आपण केलेली कामगिरी विसरून स्वतःला केवळ त्रास करून घेतो ,आज आपण आहोत उद्या कोणीतरी असेल, बघुन स्वीकार करता आलं पाहीजे ...withdrawal होता आलं पाहिजे ..........
कधी-कधी असेही असते आपण पात्रं असूनही बऱ्याच गोष्टी आपल्या वाट्याला येत नाही याचा अर्थ असा नाही की , आपण त्या व्यक्तीचा द्वेष करायचा,ज्याला ते मिळाले त्याचं कौतूक करता आलं पाहीजे .withdrawal होता आलं पाहीजे ......
त्याची रेषा लहान करायची नसते तर आपली रेषा मोठी करायची असते .
" गुंत्यात पडुन आयुष्य रंगहीन करण्यापेक्षा गुंता सोडवून उमेदीन जगता येणं फार कठीण नाही ."
एखादया प्रसंगी आपल्याला कितीही बोलावसं वाटलं, राग व्यक्त करावासा वाटला तरी शांत राहायला जमल पाहीज, प्रत्येक वेळी बोलणचं महत्वाच नसतं तर Neutral पणं राहणं आलं पाहीजे.
त्यासाठी थोडं थोडं withdrawal होता आलं पाहीजे.......
आयुष्याचं प्रत्येक वळण खुप सुंदर आहे. त्या प्रत्येक वळणावर थोडं थांबता आलं पाहीजे , वयाचा प्रत्येक टप्पा भरभरून जगता आला पाहीजे तरच आपण आनंदी राहू.
"आपलं व्यक्तीमत्व घडवणं आपल्याच हातात असतं" जगावे असं की तुम्हाला बघून इतरांना तुमच्यासारख जगावं वाटेल, तुमच नाव निघताच तुम्हाला भेटायची, तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा होईल , तुम्हाला कुणाला सोडुन जायची ईच्छा होणार नाही.....
आणि हो गेला तरी दुःख करत बसायचं नाही, काही नात्यांचं आयुष्यही तेवढचं असतं , पण त्यासाठी थोडं थोडंwithdrawal होता आलं पाहीजे........
Connect होता आलं पाहीजे, अगदी मनापासून , शिकलं पाहीज, मिळणारे रिटर्न गिफ्ट पण खुप समाधान देणारे असते.
"मला सांगा सुख म्हणजे काय असते?"चेहऱ्यावर आनंदी भाव असणे , सुंदर हास्य म्हणजे तुम्ही खुप सुखी किंवा आनंदी आहात असे नव्हे ,तर आनंदी भाव जगण्याचं बळ नक्कीच देतात.
आयुष्यभर खुप वाचन करायचे implementation साठी वेळच ठेवायचा नाही,
वाचन कमी असलं तरी चालेल ,कृतीत आणायला वेळ राखुन ठेवायला शिकता आलं पाहिजे. withdrawal होण म्हणजे राहून गेलेल्या गोष्टीसाठी वेळ देणं, स्वतः जगण्यासाठी मुद्दाम सवड मिळविणे ......
चला तर मग बघुया, जमतयं का तर!!!!

No comments:
Post a Comment