मित्रांनो जवळपास सर्वच देश आपल्या देशात काहीतरी उत्पादन घेतात आणि जगभरात निर्यात करतात. पाकिस्तानात बनतात आणि त्या भारत देशात आवडीने खाल्या जातात किंवा भरपूर खपतात सुद्धा. भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे पारंपारिक शत्रू असले तरी व्यापाराच्या बाबतीत सर्व संबंध बाजूला ठेऊन आपली आर्थिक परिस्थिती सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. ज्या देशाची निर्यात जास्त आणि आयात कमी त्या देशाची आर्थिक स्थिती चांगली मानली जाते.
- सिमेंट :- भारत हा विकसनशील देश असल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी सिमेंट ची आयात केली जाते. मोठ्या मोठ्या इमारती, पूल, मेट्रो ची कामे, इंडस्ट्रीज सेटअप करण्यासाठी पाकिस्तानपेक्षा भारतातच सिमेंट चा वापर सर्वात जास्त केला जातो आणि हे सिमेंट आपल्याला पाकिस्तानातच निर्यात करतो आणि भरपूर नफा कमावतो. भारतातील कंपन्यांपेक्षा पाकिस्तानातील सिमेंट हे स्वस्त मिळते त्यामुळे कंपन्या पाकिस्तानच्या सिमेंटलाच जास्त पसंती देतात.
- सैंधव मीठ :- सैंधव मीठ किंवा काळे मीठ आपण सर्वांनीच खाल्लं असेल. हे मीठ व्रत चालू असताना खाल्ले जाते. हे मीठ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले मानले जाते. सैंधव मीठ हे रक्तदाब, ऍनिमिया आणि पचनामध्येही फायदेशीर ठरते. हे सैंधव मीठ आपल्याला पाकिस्तानच निर्यात करतो.
- चामडे :- चामड्याचा उपयोग भारतात भरपूर प्रमाणात केला जातो. चामड्याच्या बॅगा, कंबरेला लावायचा पट्टा, पाकिटं, जॅकेट ह्या सर्व गोष्टी चामड्याच्या बनतात. आपल्या देशात चामड्याचे उत्पादन भरपूर होते. पण काही प्रकारचे चामडे पाकिस्तानातून निर्यात केले जाते.
- मुल्तानी माती :- मुल्तानी मातीच्या चेहेऱ्यावर होणाऱ्या वापराबद्दल सर्वांनाच माहिती आहे. मुल्तानी मातीचा उपयोग चेहेऱ्यावर तेज आणण्यासाठी केला जातो. सौंदर्यप्रसाधनांमध्ये केल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये मुल्तानी मातीचा वापर केला जातो जी पाकिस्तानातून निर्यात केली जाते आणि भारतात भरपूर आयात केली जाते.
- सल्फर :- सल्फर चा उपयोग आरोग्यासाठी अनेक कारणांसाठी होतो. सर्वात जास्त ह्याचा उपयोग केसांच्या उत्पादनासाठी आणि त्वचेवरील फंगल इन्फेक्शन घालवण्यासाठी केला जातो. सल्फर च्या दगडाचा चुना आणि सिमेंट ची निर्यात सुद्धा पाकिस्तानातूनच होते.
No comments:
Post a Comment