Friday, June 11, 2021

आई कुठे काय करते...

 आई कुठे काय करते...


२०१७ साली झालेल्या ' Miss World ' contest  मधे  "हरियाणा" ची डॉक्टर मानुषी छिल्लर हिने विजेते पद पटकाविले होते .

शेवटच्या  निर्णायक राऊंड मधे तिला प्रश्न विचारण्यात आला होता की सर्वात जास्त पगार कोणत्या क्षेत्रातील लोकांना मिळाला पाहिजे ?? तेंव्हा तिचे ' winning '  उत्तर हे होते की   "सर्वात जास्त पगार " आई " ला मिळाला पाहिजे ". आईच्या कामाचे मोल नाही.

तिच्या या उत्तराने  तिने ती स्पर्धा तर जिंकलीच .बरोबर, जगात  एक नवीन विषय चर्चेला  दिला .त्यानंतर  फोर्ब्स  व्दारे  संचालित वेब साईट ' Salary • com  'वर research सुरू झाला . की एक आई जेवढं काम करते ,त्या कामांसाठी जर वेगवेगळी माणसे ठेवली ,तर त्यांना किती पगार द्यावा लागेल  ?? तेंव्हा सर्व गोष्टी लक्षात घेता , एका भारतीय आईला ७१,०००/ अंदाजे 

एवढा पगार मिळाला पाहिजे दरमहा.••••.असा निष्कर्ष निघाला.

 तिच्या  उत्तराने ही  गोष्ट जगासमोर उजागर झाली. जगासमोर भारतीय परिवार व त्यात आईची  भूमिका समोर आली. आदि काळापासून आई हेच  काम  करते आहे रोजच, वर्षानुवर्षे, न  थकता ,   न  थांबता  आनंदाने. कुठेही उपकाराची भावना  नाही. अहंपणा नाही .कंटाळा नाही. ती सुखी  घराची  किल्ली आहे .एकाच वेळी ती  असंख्य  departments  सहज सांभाळते. सकाळ ते संध्याकाळ असंख्य काम सहज करते.अगदी काटेकोरपणे बिनबोभाट . ती घरची   Administrative officer  आहे. वेळ पडली तर डॉक्टर,  टीचर , counsellor आहे आणि कधी कधी हिटलर ही होते. जवळ जवळ  सर्वळ मंत्रालय  तिच्या कडेच असतात . घराची गृहमंत्री , वित्त मंत्री  आहे  ती. थोडक्यात घराचा भक्कम आधारस्तंभ  आहे . 

       तज्ञ, कोणत्या तरी एकाच क्षेत्रात perfect असतात. तज्ञ असतात व त्यांच्या या expertise चे भरपूर पैसेही  मिळतात त्यांना .येथे प्रत्त्येक घरची आई प्रत्येक department किती कुशलतेने सांभाळते .

                  I   think she is The Best CEO in the world .

       जगाची रीतच आहे ही .  जून्या काळापासून चालत आलेली. कुठे न लिहीलेले नियमच आहेत ते .ही सर्व कामे करण्यात तिला आनंद आहे.  समाधान आहे .एखादं काम जरी नीट झालं नाही तर ती disturb होते‌ .म्हणजे  अगदी भरलेला डबा शाळेत जाताना मुलगा विसरला, तरी ती अस्वस्थ होते .माझी कुठे चूक झाली ?? याचा विचार करते .व पुन्हा असे होणे नाही .याची काळजीही  घेते.

       या सर्व कामाचा मला मोबदला मिळावा हा विचार तिच्या मनात ही येत नाही .

 काळ कितीही बदलू दे, आधुनिकता किती ही असू दे , "आई  "आईचं राहणार आहे तशीच कर्तव्यदक्ष. आपल्या घराला घरपण देणारी, जीव ओवाळून टाकणारी ,सांभाळणारी ती 

आई असते.❤️

No comments:

Post a Comment