Monday, October 19, 2020

बहिर्जी नाईक- एक अज्ञात थोरपण

 बहिर्जी नाईक- एक अज्ञात थोरपण



१०-१० दिस अन्नपाणी शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…!

धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!


तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…!

शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो…!


माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही,जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा..!

मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…!

खर सांगतो गड्यानो…हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..!


आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…!

गड्यानो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…!


पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक….!


महाराजांचा अभिषेक सुरु होता,महाराज मुक्त हस्ताने गरीब फकिराना ओंजळ भरभरून द्रव्य दान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता…!

जक्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता…..महाराजांनी जेव्हा त्या फकिरला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला…!

ओठावर मिशा नव्हत्या तेव्हा पासून या बहिर्जी आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले….आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे,राज्य आनंदात आहे,आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे…!

काय बोलावे या प्रकाराला….कसली वेडी माणस असतील ती…!

एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का ?

स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हते की ज्याच्या सोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे….तो खुद्द स्वराज्याच्या गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक आहे….इतकी कमालीची गुप्तता…!

आणि एवढा विलक्षण त्याग करुन राजे त्यांना देत तर काय होते ओ …?

काहीच नाही….उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न…माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती…!

हि वेडी खुळी माणसे अशी का जगली असतील ??

बस्स…एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नव्हते….!

(Copy Paste)....

      

           

संपूर्ण आयुष्यातील एक एक क्षण स्वराज्यासाठी अर्पण करणारे शिलेदार बहीर्जी नाईक यांचे समाधी स्थळ .....

 बानुरगड . ता : खानापूर . जि : सांगली.

🚩🚩 जय जिजाऊ , जय शिवराय , जय महाराष्ट्र....🚩🚩

   शाहिस्तेखानाने चाकणच्या भुईकोटाचा ताबा पंचावन्न दिवसांच्या तिखट प्रतिकारानंतर मिळवला (१४ ऑगस्ट १६६०) आणि या कोटाचे हवालदार काहीसे हताश होउन राजगडाच्या पायर्‍या चढत होता, आता राजे काय शिक्षा सुनावताहेत या चिंतेने ग्रासलेला हा किल्लेदार राजांसमोर उभा राहिला आणि राजांनी त्यांना शिक्षा सुनावली, आदिलशाही सरहद्दीवरच्या भुपालगडाची किल्लेदारी. हे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. राजांना अश्याच ह्ट्टी किल्लेदाराची आदिलशाही सरहद्दीवर आवश्यकता होती.शिवाजी राजांनी हा गड अफजलखानाच्या वधानंतर १५ नोव्हेंबर १६५९ ते मार्च १६६० या दरम्यान ताब्यात घेतला असावा.

पुढे मात्र याच फिरंगोजींवर आणि भुपालगडावर एक बिकट प्रसंग ओढावला. स्वराज्याचे युवराज संभाजी राजे शत्रुला मिळाले. सातार्‍याजवळच्या संगम माहुलीजवळ नावेने नदी ओलांडून ते दिलेरखानाच्या छावणीत सामील झाले. कडव्या दिलेरखानाच्या मनात मात्र शंका असावी. हा संभा खरेच आपल्याला मिळालाय कि हि बाप-बेट्यांची एखादी चाल याची पडताळणी त्याने करायची ठरविले. आणि स्वारीसाठी गड निवडला, "किल्ले भुपाळगड". दिलेरखान आणि संभाजीराजांच्या फौजा भुपाळगडावर चालुन आल्या. ( २ एप्रिल १६७९) सुरवातीला फिरंगोजीनी तिखट प्रतिकार केला. मोघलांची प्रचंड हानी झाली. अल्प शिबंदी असुन हा मराठा लढतोय हे पाहून दिलेरखानाने संभाजी राजांना पुढे केले. स्वामीभक्त फिरंगोजींपुढे मोठा पेच पडला. युध्द करावे तर समोर साक्षात युवराज आणि शरणागती पत्करावी तर दिलेरसारखा कट्टर शत्रु उभा ठाकलेला. संभाजी राजांनी किल्ला खाली करायचा हुकूम केला अन्यथा मोठा हल्ला होईल असा निरोप दिला. अखेरीस फिंरगोजी ,किल्ल्याचे सबनीस विठ्ठलपंत भालेराव यांच्यासोबत रातोरात गड सोडून रायगडाला निघून गेले. किल्लेदारच निघुन गेल्यावर हा गड पडायला किती वेळ लागणार? (१७ एप्रिल १६७९) पण पठाणी डोक्याच्या दिलेरखानाचे ईतक्यावर कसले समाधान होणार होते. त्याने शरण आलेल्या सातशे मावळ्यांचा एक हात कलम करायची आज्ञा दिली. बाकीच्यांना कैद तरी केले गेले किंवा गुलाम तरी केले. संभाजी राजांना हा साराच प्रकार असह्य झाला, पण निमुटपणे पहाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. रायगडावर महाराजांना हे समजतातच ईतर गडांना पत्रे पाठ्विली गेली, "गड लढवावा, अणमान करो नये". याचे वर्णन बसातीनुस्सलातीन, तारीखे दिल्कुशा या मुघल ग्रंथकारांची आणि मल्हार रामराव चिटणीस यांच्या बखरीत आहे.

हा गड ताब्यात घेतल्यानंतर दिलेरखानाने त्याची तटबंदी पाडून टाकली असे जे सांगितले जाते ते चुकीचे असावे. अर्थात या घटेनेनंतर हा गड मोघलांच्या ताब्यात फार काळ राहिला नसावा. कारण सभोवतालचा प्रदेश आदिलशाही आणि मराठ्यांच्या ताब्यात होता. आणि मोघलांचा सगळीकडे पराभव होत होता.

यानंतर मात्र एका वेगळ्याच कारणासाठी या गडाचा उल्लेख येतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रयत्नात सुरवातीपासून साथ दिलेले जोडीदार, बहिर्जी नाईक. अफजल वध असो, लालमहालातील कामगिरी असो, सुरतेवर स्वारी असो किंवा आग्र्याहून सुटका या सर्वच थरारक घटनांमधे बहिर्जींचे योगदान मोलाचे होते. या बर्हिंजींचा शेवट या भुपालगडावर झाला. यामधे तीन मतप्रवाह आहेत.

काहीजणांच्या मते भुपाळगडावर हेरगिरी करताना ते पकडले गेले आणि शत्रुने त्यांना मारुन टाकले.

तर दुसरा मतप्रवाह सांगतो कि बहिर्जी लढाईत जखमी होउन ईथे आले आणि ईथे त्यांनी प्राणोत्क्रमण केले.

तर काही बखरींच्या मते, इथे बर्हिजी झाडीत लपलेले होते, शत्रुने भाल्याने झाडी तपासताना, भाला लागून त्यांचा मृत्यु झाला.

ईतिहास काहिही असला तरी बहिर्जी नाईकांच्या अस्थी भुपालगड आज शिरावर मिरवतोय. 'बुसातिन-उस-सलातिन' या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायांनी मांजर्‍या नजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिले.तर एका लोककथेनुसार भूपालसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव पडले, "भुपाळगड". शिवाजी महाराजांना विजापूरवर लक्ष ठेवण्यासठी एका किल्ल्याची आवश्यकता होती. बाणुरगडाचा हा डोंगर शिवरायांच्या मनात भरला व तेथे किल्ला बांधण्याचा निर्णय शिवरायांनी घेतला. सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी व कवठे महांकाळ तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा चार तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळ्गड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमरक्षेच्या दृष्टीने भूपाळगडास अनन्यसाधारण असे महत्व होते.

या ईतिहासप्रसिध्द परंतु काहीशा दुर्लक्षित किल्ल्यावर जायचे  मार्ग 

१) पुणे-बेंगळुरू महामार्गावरील कराडहुन विटा-खानापुर-भिवघाट-पळशी-भुपालगड असे येता येईल. विट्यावरून दिवसाला तीनवेळा थेट भुपालगड साठी सकाळी ८.३०,११.३० व ४.०० अश्या तीन बसही आहेत.वाटेत रेवणसिध्दाचे मंदिरही पहाता येईल.

२ ) सांगली-तासगाव-भिवघाट-पळशी-भुपालगड असा पर्यायही आहेच.


Credtis:-

Unknown facebook


No comments:

Post a Comment